पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टोमॅटो,कोबी,वांगी,पालक,आदी भाज्यांचे भाव गडगडले

इमेज
टोमॅटो , कोबी , वांगी , पालक , आदी भाज्यांचे भाव गडगडले सणामुळे व्यापाऱ्यांची बाजाराकडे पाठ  ;  मालाला उठावच नाही भाज्या फेकून देण्याची वेळ  बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या फळभाज्या व पालेभाज्यांचा उत्पादन खर्चही भरून येवू न शकल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच टोमॅटो ,वांगी   व भाज्या फेकून दिल्या होत्या. (छाया:अविनाश दुधवडे , चाकण) चाकण:वार्ताहर   मागील पंधरवड्यात भाज्यांचे भाव गगणाला भिडलेले असताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे सर्व सामान्यांची कसोटी लागत होती.  मात्र आज (दि.२३) अचानक आवक वाढल्याने व दोन दिवसांपासून सणामुळे बाजारात व्यापारी वर्गाने बाजाराकडे पाठ फिरवल्याने शेती मालाला उठावच मिळाला नाही ,  आणि टोमॅटो , कोबी  ,  वांगी  , पालक  , आदी भाज्यांचे भाव अचानक गडगडले. टोमॅटो , कोबी  यांची  एक रुपया किलो प्रमाणेही  विक्री होत  नव्हती . भोपळा , वांगी ,  आदी फळभाज्यांची अवस्थाही अशीच झाली. काढणी खर्चदेखील वसूल होत नसल्याचे पाहून चाकण येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतकऱ्यांवर पालेभाज्यांच्या हजारो जुड्या व टोमॅटो  भोपळा  , वांगी रस्त्यावर फेकून देण्याची

दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!!

इमेज
दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!! विविध संघटनांकडून आंदोलनाचा इशारा.... चाकण:  अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात जवखेडे खालसा गावामध्ये दलित कुटूंबातील युवक व त्याचे आई-वडील अशा तिघांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या तिहेरी दलित हत्याकांडाचा चाकण सह तालुक्यातील दलित संघटनांनी तीव्र निषेध केला असून राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा ,  अशी जोरदार मागणी केली आहे.  नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव ,  तालुकाध्यक्ष संतोष जाधव ,  शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,  राहुल गोतारणे,   सतीश आगळे ,  नितीन जगताप ,  अक्षय घोगरे ,  अभिजित घोगरे ,  महेंद्र दुधवडे ,  यांनी या संदर्भात राज्यभरातील विभागीय आयुक्त कार्यालयांकडे निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले असून  या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा संघटनेतर्फेही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असू

दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का?

इमेज
दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का ?   उद्धव  ठाकरे  यांचा सवाल ... शिवसेनेची चाकणला विराट सभा चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना उद्धव  ठाकरे   (छायाचित्र :अविनाश दुधवडे , चाकण) चाकण:वार्ताहर -   शहेन शहा असो की बाद शहा ,  दिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणा ,  महाराष्ट्र झुकेल तो फक्त शिवराय  ,  जिजाऊ आणि जनते समोर   ,  केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे बोलण्यासाठी ठीक आहे.  दिल्ली हमारी ,  राज्यातही आम्हीच. अरे तुमचा मुख्यमंत्री कोण ?  कोण आहे तुमच्याकडे चेहरा  ?  दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का  ?  असा परखड सवाल उपस्थित करीत राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे  यांनी चाकण येथे विराट जाहीर सभेत व्यक्त केला.     खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.९ ) आयोजित वि

नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय

इमेज
नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय चाकण:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शब्द बारामतीप्रमाणेच एकमेव खेड तालुक्याने कधीही पडू दिला नाही . त्यामुळे येथे नेहमीच पवारांच्या विचारांचा आमदार निवडून गेल्याचा मागील अनेक वर्षांचा इतिहास आणि तालुक्यातील त्यांची मक्तेदारी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी मोडीत काढली. आणि त्यांनी १ लाख ३ हजार २०७ मतांसह राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्यावर ३२ हजार ७१८ मतांची आघाडी घेत मोठा विजय संपादन केला. त्यामुळे आपणच खेड तालुक्याचे बाजीगर असल्याचे गोरे यांनी दाखवून दिले आहे. नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेश नामदेव गोरे यांचा जन्म २७ डिसेंबर १९६३ ला चाकण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चाकणच्या शिवाजी विद्यामंदिरात पूर्ण झाले. त्यांनी बी.कॉम ची पदवी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून घेतली असून ,  पुण्याच्याच सिंबॉयसिस येथून डी.टी.एल. (डिप्लोमा इन टॅक्सेशन लाॅ) व डी.बी.एम पदवी संपादन केली आहे. १९९८ साली त्यांची सर्वात प्रथम चाकण विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर संचालक व अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. २००२ मध्ये सर्वात प्

तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य

इमेज
तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य नवनिर्वाचित आमदार गोरेंच्या समोर अनेक आव्हाने चाकण:      खेड तालुक्यातील प्रचंड टोकाची विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एकदाची संपली आहे. तालुक्यातील तमाम जनतेने पहिल्यांदाच सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपाने  एकूण मतदानाच्या ५२ टक्क्यापेक्षा अधिक मते म्हणजे तब्बल १ लाख ३ हजार २०७ मते पदरात टाकीत  शिवसेनेला संधी दिली आहे. सामान्यांना हवा असणारा आश्वासक विकास व भयमुक्त तालुका या  सुरेशभाऊ  गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आवाहनाला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेने जबरदस्त प्रतिसाद दिला.   नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांना दोनदा जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून असलेला अनुभव दांडगा यामुळे तालुक्यातील समस्यांशी ते अवगत आहेत . मात्र तरीही तालुक्याच्या संपूर्ण गावागावाची व संबंधित नागरिकांना अपेक्षित कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लाग णार आहे  .      खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे त . तालुक्यातील अनेक गावांना विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन बराच काळ ला

खेड तालुक्यात आता 'रामराज्य' सरू झाले ; आमदार गोरे

इमेज
सुरेशभाऊ गोरे ( आमदार : खेड आळंदी विधानसभा) खेड तालुक्यात आता  ' रामराज्य '  सरू झाले  ;  आमदार गोरे चाकण मध्ये विजयी सभा चाकण:    खेड तालुक्यातील  ' रावणराज '  संपून आता खऱ्या अर्थाने  ' रामराज्य '  सुरु झाले आहे  ,  माझ्या विजयामुळे तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला आता आपल्याच भूमीत मोकळा श्वास घेता येईल असा विश्वास देत  यापुढे आमदार हा राज्यकर्ता नव्हे तर जनसेवक असतो हे मी माझ्या कृतीतून तालुक्याला पटवून देईन असे प्रतिपादन खेडचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी चाकण (ता.खेड) येथे केले.   शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विजयामुळे त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चाकण पंचक्रोशीतील  सामान्य नागरिक  , शेतकरी ,  व्यापारी ,  कार्यकर्ते आदींनी रविवारी (दि.१९) रात्री उशिरा पर्यंत येथे त्यांच्या विजयी मिरवणुकीच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली होती. चाकणच्या महात्मा फुले चौकात हजारो चाकणकर नागरिकांच्या समोर पुढे बोलताना आमदार गोरे म्हणाले कि ,  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शब्द बारामतीप्रमाणेच एकमेव खेड तालुक्याने

खेड तालुक्यात दिवाळीचा अनोखा पायंडा

इमेज
खेड तालुक्यात दिवाळीचा अनोखा पायंडा खेड तालुक्यातील नागरिकांनी नवनिर्वाचित आमदारां समवेत अशी अनोखी दिवाळी साजरी केली. (छाया: अविनाश दुधवडे , चाकण) नवनिर्वाचित आमदारांचा उपक्रम चाकण:   संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांसोबत  दिवाळी साजरी करण्याचा अनोखा पायंडा  खेडचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी सुरु केला असून दिवाळी निमित्त खेड तालुक्याच्या विविध गावातील नागरिकांशी संवाद साधून विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांचा  आत्मविश्‍वास उंचावण्याचा प्रयत्न केला. या पुढे खेड तालुक्याचा आमदार हा जनसेवक बनून  तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबतच राहणार आहे , असा संदेश त्यांनी या निमित्त तालुक्यातील जनतेला दिला.      दिवाळीनिमित्त चाकण येथे ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी सात वाजले पासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमदार गोरे यांनी विविध गावांतून गटागटाने आलेल्या सुमारे पंचवीस ते तीस हजार नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी  अनेक  गावातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्नही आमदार गोरे यांनी  केला. या कार्यक्रमास खुद्द खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह