पोस्ट्स

जून, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणारे सात टॅंकर ताब्यात

इमेज
फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणारे सात टॅंकर ताब्यात चोवीस लाखांचा माल जप्त ; एक जन ताब्यात करंजविहीरे येथे एलसीबीची कारवाई चाकण:अविनाश दुधवडे कारखान्यांसाठी आवश्यक फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आज (दि.26)  पहाटे चार वाजता करंजविहीरे (ता. खेड,जि.पुणे ) येथे छापा टाकला. त्यामध्ये सात टँकर ,एक दुचाकी ,कॉस्टीक सोड्या सह सुमारे चोवीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे . या छाप्यात पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अनेक जणांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली असली तरी एकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. मागील दोन वर्षातील चाकण परिसरातील ही आणखी एक मोठीं कारवाई मानण्यात येत आहे.  इजाज अहमद महबूब अली (वय 34,  रा. चंगुरीया,ता.दुधारा ,जि.कबीरनगर खलीलाबाद ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एकाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार इजाज अहमद महबूब अली याच्यासह पापाशेठ , मेहता , व सादिक (तिघांचेही पूर्ण नाव

दैनिक पुढारी वृत्ते (Avinash Dudhawade)

इमेज
दैनिक पुढारी वृत्ते  अविनाश दुधवडे ,चाकण   Avinash Dudhawade,chakan 9922457475 

ग्राऊंड फ्लोअरवर अडकले चाकणचे सुसज्ज रुग्णालय

इमेज
ग्राऊंड फ्लोअरवर अडकले चाकणचे सुसज्ज रुग्णालय   चाकण: अविनाश दुधवडे  सातत्याने होणारे अपघात, लोकसंखेचे वाढते लोंढे ,यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक व नागरिकांची वारंवार होणारी मागणी यामुळे दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये चाकण ग्रामीण रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्यात आल्या नंतर काम सुरु करण्यात आलेले चाकण रुग्णालय पुढील कामासाठी निधीच्या तरतुदी अभावी ग्राऊंड फ्लोअर वरच अडकले असून सध्याच्या जुन्या रुग्णालयात पुरेशा सुविधांची वाणवा असल्याने अपघातग्रस्त रुग्णांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण किंवा पुण्याच्या ससून रुग्णालयात अथवा महागड्या खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे . त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे .  दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारणाऱ्या चाकणच्या उद्योगनगरीतील  चाकण ग्रामीण रुग्णालयात गेली पाच दशके असुविधा व समस्यांच्या शृंखलेने अडचणीत सापडले आहे. सन 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू झालेले चाकणचे प्राथमिक आरोग्य केंद्र नंतर या भागाचा उद्योगीकरण व विकास प्रकल्पांनी झालेल्या लोकसंख्यावाढीने अपेक्षित सेवा देण्यात नेह

चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

इमेज
चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर  ठरावाच्या बाजूने पंधरा तर विरोधात दोन मते चाकण: अविनाश दुधवडे चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर ठरावाच्या बाजूने पंधरा तर विरोधात दोन मते चाकण:वार्ताहर चाकण (ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे यांच्यावरील अविश्वास ठराव पंधरा विरुद्ध दोन अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीत एकूण सतरा सदस्यसंख्या असून, ठरावाच्या बाजूने तब्बल पंधरा सदस्यांनी मतदान केले. मनमानी कारभार करणे, विश्वासात न घेणे, तसेच बेकायदा नोंदी घालणे आदी कारणे अविश्वास ठरावात नमूद करण्यात आली होती . तहसीलदार नारायण शेळकंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.24) चाकण ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत हात उंच करून खुल्या पद्धतीने हा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच काळूराम गोरे ,उपसरपंच प्रीतम परदेशी, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, साजिद सिकीलकर ,सदस्य दतात्रेय बिरदवडे, सुधीर वाघ, दतात्रेय जाधव, कृष्णा सोनावणे, बानो काझी, पूनम शेवकरी, अनुराधा जाधव,चित्रा कदम ,ज्योती फुलवरे, रेश्मा लेंडघर,पांडुरंग गोरे, संतोष साळुंके, आदी

मुसळधार पावसांत सेवा रस्त्यांच्या होतात नद्या

इमेज
मुसळधार पावसांत सेवा रस्त्यांच्या होतात नद्या  पाण्याचा निचरा होण्यात अडचणी चाकण: अविनाश दुधवडे   "नेमेचि येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे पाच मिनिटे जरी पाऊस झाला तरी चाकण शहरातील मुख्य रस्त्यां लगतच्या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे . पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने काही भागात साठलेल्या पाण्याचा आठ-आठ दिवस पाण्याचा निचराच होत नसल्याची स्थिती निर्माण होत आहे. त्यातून पादचारी वाहनधारक आणि व्यापारी यांना अक्षरश कसरत करावी लागत आहे . आठ दिवसांच्या विश्रांती नंतर आज (दि.24) सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास चाकण पंचक्रोशीत सुरु झालेल्या पावसाने नागरिकांना याचा पुन्हा प्रत्यय आला. चाकण आंबेठाण चौकालगत उड्डाण पुला खालील भागात सेवा रस्त्यांना अक्षरश नदीचे स्वरूप आले होते.    पावसाळ्यात दिवसेंदिवस तुंबणाऱ्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नियोजनाअभावी आंबेठाणचौक , तळेगाव चौक भागात पावसाचे अन्‌ नाल्यांतील घाण पाणी कुठे गुडघ्याएवढे, तर कुठे कमरेइतके रस्त्यावरच साचते. त

पाण्याच्या प्रचंड दाबाने वाकी बंधाऱ्याजवळ खिंडार

इमेज
पाण्याच्या प्रचंड दाबाने वाकी बंधाऱ्याजवळ खिंडार वेगवान पाणी मिसळतेय भामा नदीत संततधार पावसात बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने नदीच्या पाण्याने फोडला किनारा चाकण: चाकण परिसरासह खेड तालुक्यातील पश्‍चिम भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर भामानदीवरील वाकी (ता. खेड) गावच्या हद्दीतील चाकणच्या बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने व बंधाऱ्यावरील पाण्याचा दाब प्रचंड वाढल्याने या पाण्याने किनाऱ्या लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पाडले आहे. रविवारी रात्री पडलेल्या या खिंडारातून अतिशय वेगाने हे पाणी भामा नदी पात्रात मिसळत असून भामा नदी अक्षरश दुथडीभरून वाहत आहे. संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने व बंधाऱ्याच्या फळ्या बंद असल्याने वेगवान नदीच्या पाण्याने किनारा फोडला आणि प्रकार घडल्याचे चाकणचे सरपंच काळूराम गोरे व ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले. मात्र या मुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे. या बंधाऱ्याच्या फळ्यांना सुद्धा काही ठिकाणी मोठी लिकेज असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. बऱ्याच वर

खेड तालुका मराठी पत्रकार संघ

इमेज
खेड   तालुका   मराठी   पत्रकार   संघ अध्यक्ष- अविनाश दुधवडे (दै.पुढारी ,सम्राट ) चाकण ( ९९२२४५७४७५)  उपाध्यक्ष -रामचंद्र सोनवणे(दै. पुण्यनगरी), राजगुरुनगर उपाध्यक्ष -एम.डी.पाखरे (दै. पुण्यनगरी), आळंदी कार्याध्यक्ष -तुकाराम बोंबले (दै.सामना पुढारी, लोकसत्ता, ) राजगुरुनगर ,कडूस सचिव -संजय शेटे (दै. लोकमत), पाईट सहसचिव- सुनील थिगळे (दै. प्रभात), निमगाव खजिनदार -सुनील बटवाल (दै. प्रभात), चिंबळी कायदेशीर सल्लागार- ऍड. विलास काटे (दै. सकाळ),आळंदी सल्लागार -एकनाथ सांडभोर (दै. सकाळ), भीमाशंकर सल्लागार-राजेंद्र सांडभोर (दै. लोकमत ,लोकसत्ता), राजगुरुनगर सल्लागार-कोंडीभाऊ पाचारणे (दै. पुढारी), राजगुरुनगर सल्लागार- विद्याधर साळवे (दै. लोकमत,प्रभात ) कडूस ------------ किशोर भगत ( दै. सकाळ), राजगुरुनगर शिवाजी आतकरी, (-----) सुनील ओव्हाळ, (दै. प्रभात) शेलपिंपळगाव संजय बोथरा, (दै. केसरी) चाकण कल्पेश भोई, (दै.सामना) चाकण दत्ता भालेराव, (दै.पुढारी) भामा आसखेड संजय बोरकर, (दै. लोकमत) वनिता कोरे, (दै. सकाळ) पाईट ए.पी.शेख, (दै.पुढारी,संध्या ) शेलपिंपळगाव संदीप मिरजे, (दै.पुढारी)

शाळेच्या पहिल्या दिवशी चाकण गजबजले

इमेज
शाळेच्या पहिल्या दिवशी चाकण गजबजले  स्वागताने भारावले विद्यार्थी अन पालक  चाकण: अविनाश दुधवडे  नवा गणवेश... नवी पुस्तके ... नवे दफ्तर... यामुळे उल्हासित झालेली मुले आज (दि.17) पहिल्याच दिवशी रुबाबात शाळेत आल्याचे चित्र चाकण परिसरात पहावयास मिळाले . प्रवेशद्वारावर या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी  व शिक्षकांनी स्वागत केले. या स्वागताने विद्यार्थी व त्यांचे पालक भारावून गेले होते.  चाकण परिसरात शाळा सुरु होणार म्हणून दोन-तीन दिवस अगोदरच विविध शाळांनी आपला परिसर स्वच्छ केला होता. अनेकांना शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आली होती. शाळेतील शिक्षक शाळा सुरु होण्याअगोदर शाळेत हजर होते. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थी येताच शिक्षक अन मुख्याध्यापक आदींनी तर कांही ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी मंडळीनी प्रसन्न वातावरणात गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवो दोस्त, नवे शिक्षक, नवीन शाळा असल्यामुळे जी मुले पहिल्या वर्गात गेली त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि रडूही आले.

चाकण मध्ये अंगणवाडी प्रवेशासाठी रांगा

इमेज
चाकण मध्ये अंगणवाडी प्रवेशासाठी रांगा  चाकण: अविनाश दुधवडे  प्रवेशाच्या प्रश्नावरून प्रत्येक वर्षी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकण मधील जनता शिक्षण संस्थेच्या  श्री शिवाजी विद्यालयाने मागील वर्षापासून प्ले ग्रुप (अंगणवाडी) मध्ये  लकी ड्रॉ पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहेत . मात्र शहराच्या मध्यवर्ती व घरापासून अगदी जवळ असणाऱ्या याच प्रशालेत परिसरातील सर्व मुलांना मिळावेत यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पालकांनी प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.    चाकण सारख्या सुसाट लोकसंखेने विस्तारत्या भागात मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांचा  आग्रह कायम असून  पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची अन्यत्र धावाधाव सुरू असताना येथे मात्र विपर्यस्त चित्र प्रत्येकच वर्षी पहावयास मिळत आहे. चाकण मध्ये औद्योगीकरण आणि त्या पाठोपाठ आलेल्या लोकसंखेच्या सुसाट लोंढ्यांनी येथील शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या मराठी माध्यमाच्या प्रशालेतच प्रवेश मिळावा यासाठी नागरिकांना आटापिटा करावा लागत आहे. मान्यते पेक्षा अधिक विद्यार्थ्यां

भामा नदी वाहतेय दुथडी भरून

इमेज
भामा नदी वाहतेय दुथडी भरून  भीमा नदीला पूर  चाकण: अविनाश दुधवडे    पुणे जिल्ह्याच्या  पश्चिमेकडील गावांमध्ये पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसाने येथील खेड तालुक्यातील भामा नदी दुथडी भरून वाहत आहे .दिवस भरात अधून मधून जोरदार पाऊस होत असल्याने बंधारे व धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.अन्य नद्यांचे पाणी भीमेत मिसळत असल्याने भीमेला पूर आला आहे.  पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.     संततधार पावसामुळे रविवारी रात्री पाण्याचा दाब वाढल्याने व बंधाऱ्याच्या फळ्या बंद असल्याने बंधाऱ्या वरून वाहणाऱ्या वेगवान नदीच्या पाण्याने चाकणच्या पाणी पुरवठ्याच्या भामा नदीवरील बंधाऱ्याचा किनारा फोडला व लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पाडले होते . त्या पार्श्वभूमीवर चाकण ग्रामपंचायतीने रोह्कल येथील बंधाऱ्याच्या बारा फळ्या काढल्या असून खुप मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने वाकी केटी बंधाऱ्याच्या फळ्या काढता आल्या नाहीत . रोहकल हद्दीतील एका बंधाऱ्याच्या 12 फळ्या काढल्याने अतिशय वेगाने पाणी भामा नदी पात्रातून वाहत असून पुढे भीमेच्या पत्रात पो

पाण्याच्या प्रचंड दाबाने वाकी बंधाऱ्याजवळ खिंडार

इमेज
पाण्याच्या प्रचंड दाबाने वाकी बंधाऱ्याजवळ खिंडार  वेगवान पाणी मिसळतेय भामा नदीत  संततधार पावसात बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने नदीच्या पाण्याने फोडला किनारा  चाकण: अविनाश दुधवडे  चाकण परिसरासह खेड तालुक्यातील पश्‍चिम भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर भामानदीवरील वाकी (ता. खेड) गावच्या हद्दीतील चाकणच्या बंधाऱ्याच्या फळ्या न काढल्याने व बंधाऱ्यावरील पाण्याचा दाब प्रचंड वाढल्याने या पाण्याने किनाऱ्या लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पाडले आहे. रविवारी रात्री पडलेल्या या खिंडारातून अतिशय वेगाने हे पाणी भामा नदी पात्रात मिसळत असून भामा नदी अक्षरश दुथडीभरून वाहत आहे.   संततधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने व बंधाऱ्याच्या फळ्या बंद असल्याने वेगवान नदीच्या पाण्याने किनारा फोडला आणि प्रकार घडल्याचे चाकणचे सरपंच काळूराम गोरे  व ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले.  मात्र या मुळे कोणत्याची प्रकारचा धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे. या बंधाऱ्याच्या फळ्यांना  सुद्धा काही ठिकाणी मोठी लिकेज असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जा

पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव

पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव खाजगी प्रशालांमध्ये विपर्यस्त चित्र चाकण: अविनाश दुधवडे  प्राथमिक-माध्यमिक शाळांचे वार्षिक निकाल जाहीर झाल्या पासूनच  पटसंख्या टिकविण्यासाठी जिल्हापरिषद शिक्षकांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र सर्वत्र  पहावयास मिळत  आहे.  जिल्हा परिषद शाळांचे पटसंख्या राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर खासगी शाळांकडे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत.  चाकण सारख्या सुसाट लोकसंखेने विस्तारत्या भागात शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांची शाळा सुरु होण्यापूर्वीच परीक्षा सुरु झाल्याचे विपर्यस्त चित्र पहावयास मिळत आहे.  गेल्या पाच-सात  वर्षांपासून चाकण भागात खासगी शाळांची विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली आहे. त्या शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, कपडे, वाहनाची व्यवस्था यामुळे शहरीसह ग्रामीण भागातील पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. खासगी शाळांचा निकालही चांगला लागत असल्याने त्या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी पालकांचे वर्षभरापासून प्रयत्न सुरू असतात. त्

चाकण एसटी स्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी

इमेज
चाकण एसटी स्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी  चाकण :  अविनाश दुधवडे  सव्वा कोटी रुपयांहून अधिक खर्च करून चाकण येथील एसटी बसस्थानक सुसज्ज करण्यासाठीचे काम कासव गतीनेच सुरु असून अनेक दिवस रेंगाळलेले या स्थानकाचे काम नक्की केंव्हा पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत. पावसाळ्या पूर्वी या बस स्थानकाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत होते .मात्र अद्याप पर्यंत काम पूर्ण होऊ न शकल्याने व पावसामुळे या स्थानकाच्या आवारात पाणी साचत असल्याने  प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून होत आहे . 'बांधा वापरा, हस्तांतरित करा' (बीओटी) या  तत्त्वावर चाकण एसटी बस स्थानकाचे काम करण्यात येत आहे.चाकण एसटी बसस्थानकाची सुमारे पन्नास  वर्षापूवीर्ची इमारत मोडकळीस आली होती. या बसस्थानकात स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी बसण्याची सोय, फलाट आदी काहीच सोयी, सुविधा नव्हत्या. पावसाळ्यात बसस्थानकाच्या आवारात पाणी साचत होते . तसेच मलमूत्राचे डबके आवारात साचल्याने प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत होती . त्यामुळे या आव

खेड तालुक्याला लालदिव्याची हुलकावणीच

इमेज
खेड तालुक्याला लालदिव्याची हुलकावणीच 'मेरा नंबर कब आयेगा' ? म्हणण्याची वेळ खेड तालुक्यासाठी लाल दिवा झाले दिवा स्वप्न चाकण: अविनाश दुधवडे  राज्यातील अनेक तालुक्यांना दुसऱ्यांदा -तिसऱ्यांदा लालदिवे मिळत असताना खेड तालुक्याला मात्र 'मेरा नंबर कब आयेगा' ? असे म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालट करताना भास्कर जाधव, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर, रामराजे नाईक निंबाळकर, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या मंत्र्यांना वगळण्यात आल्या नंतर त्यांच्या जागी ज्या मंत्र्यांची निवड होणार  त्यात खेड तालुक्यालाही प्रतिनिधित्व मिळणार अशी जोरदार हवा होती. मात्र खेडचे दिवंगत आमदार नारायण पवार यांच्या नंतर विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनाही तोच (अ) न्याय पक्षाने दिल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.    दोन दिवसांपूर्वी खेडच्या दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरही आमदार मोहिते यांनी तालुका मागासलेला असून विकासासाठी मंत्रीपदाची सुप्त इच्छा व्यक्त केली होती. त्यावर शरद पवार य

चाकण मध्ये सापडणाऱ्या प्राचीन वस्तूंकडे लक्ष देण्याची मागणी

इमेज
चाकण मध्ये सापडणाऱ्या प्राचीन वस्तूंकडे लक्ष देण्याची मागणी चाकण: अविनाश दुधवडे  चा कण जवळ चार महिन्यांपूर्वी इतिहासकालीन आठ किलो तेवीस ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आढळली होती. पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर ही नाणी दुसऱ्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले होते  .त्यामुळे चाकणचा संबंध थेट इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाशी जोडला गेला.  चार वर्षांपूर्वी येथे अतिप्राचीन यज्ञवराहाची मूर्ती आणि एका मूतीर्चे भग्न शिल्प ही सापडले होते. मात्र चाकण परिसरात सापडणाऱ्या अतिप्राचीन अवशेषांकडे दुर्लक्ष होत असल्या बाबत चाकणकरां मधून नाराजी व्यक्त होत आहे.   पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा संग्रामदुर्ग भूइकोट किल्ला  हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. औद्योगीकारणाने आणि शासनाच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित झाला असला तरी याच भुईकोट किल्ल्यामुळे प्राचिन व दैदिप्यमान इतिहास चाकणला लाभला आहे. त्यामुळे येथे सापडणाऱ्या या अवशेषांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक दुर्गप्रेमी करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी  (फेब्रुवारी 2013 मध्ये) आगरवाडी

खेड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार सलामी

इमेज
खेड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार सलामी चाकणच्या पंधरा ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड चाकण :अविनाश दुधवडे       मॉ न्सूनपूर्व पावसाने खेड तालुक्याच्या पूर्वभागातील आणि पश्चीम भागातील गावांमध्ये  आज (दि.4) खऱ्या अर्थाने दमदार हजेरी लावली. चाकण शहर आणि परिसराला सुमारे दीड तास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या या दमदार हजेरीने चाकणसह तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठाही दुपारी तीन नंतर खंडित झाला होता . काळूस रोडवर झालेल्या मोठ्या स्पार्किंग नंतर चाकण गावठाणातील तब्बल पंधरा ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाल्याने रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत टप्याटप्याने हा वीज पुरवठा सुरळीत केला .    चाकण पंचक्रोशीतील मेदनकरवाडी ,कडाचीवाडी,खराबवाडी, रासे ,भोसे, मोहितेवाडी,बहुळ ,साबळेवाडी ,कुरुळी,मोई, निघोजे,महाळुंगे,खालुंब्रे ,येलवाडी,वाकी,भाम, पश्चीम भागातील बिरदवडी ,आंबेठाण, वसुली, वराळे ,आदी भागातही या पावसाने हजेरी लावली. कुरुळी, मोई, चिंबळी, चाकण ,नाणेकरवाडी,खराबवाडी, कडाचीवाडी भागात दुपारच्या दमदार हजेरी नंतर सायंकाळी उशि

चाकणच्या प्रस्तावित नगरपरिषदेचा घोळ

इमेज
  चाकणच्या प्रस्तावित नगरपरिषदेचा घोळ चाकण नगर परिषदेचे घोंगडे पडणार भिजत ? नागरिक संघर्षाच्या पवित्र्यात चाकण: अविनाश दुधवडे एकीकडे चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर केल्या नंतर कुठल्याही क्षणी चाकणला नगरपरिषद अस्तित्वात येणार अशी जोरदार हवा निर्माण झालेली असतानाच चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्या संदर्भात मागील आठवड्यात मंगळवारी (दि.7) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकी मुळे चाकणशहरासह परिसरातील नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.खेडच्या लोकप्रतिनिधींनी पिंपरी चिंचवडमध्ये चाकणच्या समावेश करण्यास कडाडून विरोध केल्या नंतर आता सर्वपक्षीय कार्यकर्तेही चाकणचे स्वतंत्र अस्तित्व असावे यासाठी एकत्रित येवू लागले असून संघर्षाची भूमिका घेतली आहे . चाकण परिसराचा औद्योगिक विकास झाल्यानंतर चाकण शहर व परिसराचे स

सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ व्हावी : वळसे पाटील

इमेज
सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ व्हावी : वळसे पाटील चाकणला चाळीस जोडपी विवाहबद्ध सुरेश गोरे मित्र मंडळाचा विवाह सोहळा चाकण:अविनाश दुधवडे सध्या विवाह समारंभात अनेक अनिष्ठ प्रथा आल्या आहेत. राज्यात दुष्काळी स्थिती असताना वारेमाप केला जाणारा खर्च आणि अनिष्ठ प्रथामुळे अन्न, वेळ आणि इतर काही गोष्टींची नासाडी होते. हे जर थांबवायचे असेल तर वारेमाप खर्चाला फाटा देत सामुदायिक विवाहाची चळवळ समाजात रुजलीच पाहिजे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून अशा सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा समाजातील अधिकाधिक वधुवरांनी दर्शविल्यास मोठी क्रांती घडेल, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी चाकण येथे केले.   सुरेशभाऊ गोरे मित्र मंडळ , मानव विकास कल्याण ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे मार्केट यार्डच्या भव्य प्रांगणात आज (दि.30) मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  दिलीप वळसे-पाटील बोलत होते. या प्रसंगी भोसरीचे आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रेय भरणे, माजी सभापती शरद बुट्टे, पुणे जिल्हा राष्ट्रवाद

वनसंपदेला आग अन काळ्या कुट्ट टेकड्या

इमेज
वनसंपदेला आग अन काळ्या कुट्ट टेकड्या वन हद्दीतील वणवे थांबविण्याची गरज चाकण-आळंदी रस्त्यावरील चित्र चाकण: अविनाश दुधवडे चा कण- आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील गवताला  वणवा (आग) लावण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे होणारे प्रदूषण व निसर्गहानीकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. लगतच्या भागात लोकवस्ती वाढत असून नैसर्गिकरीत्या लागणाऱ्या आगीचे प्रमाण घटले आहे; मात्र जाणुनबुजून डोंगरावरील वाढलेल्या गवताला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या कृत्रिम वणव्यांमुळे होरपळलेली झाडे ,वन हद्दीतील जमीन व डोंगर काळेकुट्ट व भकास होत आहेत.    कधीकाळी चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाचे जंगल म्हटले की दूरपर्यंत गर्द वनराईने झाकलेल्या उंच टेकड्या, त्यातील ऐतिहासिक पाण्याचे तळे ,निसर्गरम्य वातावरण  असे काही वर्षांपूर्वीचे चित्र होते. या भागात औद्योगीकरण झाल्यानंतर गेल्या काही  वर्षात हे चित्र आता बदलू लागले आहे.  याचे प्रमुख कारण म्हणजे वन हद्दी लगतच्या भागात होत असलेले नागरीकरण व वेगाने झालेली जंगलतोड, सुकलेल्या गवताला लावले जाणारे वणवे हे असल्याचे दिसते. जाणीव पूर्वक होणाऱ्या दुर्लक्ष

पावसामुळे चाकण परिसरात नऊ तास वीजपुरवठा विस्कळीत

इमेज
पावसामुळे चाकण परिसरात नऊ तास वीजपुरवठा विस्कळीत   चाकण परिसरातील हजारो वीजग्राहक अंधारात पहिल्याच पावसात वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट चाकण: अविनाश दुधवडे    म हावितरणच्या महाढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना नाहक सहन करावा लागत असून ,वादळी वारे आणि फारशा विजांच्या कडकडाटा शिवाय तुलनेने शांततेत बरसलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसानेही वीज वितरणच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. आज (दि.3) पहाटे तीन वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी बाराच्या सुमारास म्हणजे तब्बल नऊ तासांनी पूर्ववत झाला. त्यानंतरही विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच होता. याचा फटका चाकण सह पंचक्रोशीतील हजारो वीज ग्राहकांना बसला ,चाकण सह लगतच्या गावांमधील वीज ग्राहक सकाळ पर्यंत अंधारातच होते.   चाकण भागात झीरो लोड शेडिंगचा दावा करूनही महावितरण अखंड वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.किरकोळ पावसातही विजेचा खेळ खंडोबा सुरू असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक,  लहान मुले, तसेच रुग्णांचे हाल वाढत आहेत. असे असूनही महावितरणची ढिसाळ यंत्रणा नुसतेच ढीम्मपणे या गंभीर प्रकाराकडे पाहात तांत्रिक दोषामुळे वीज

औद्योगिक भागात अनधिकृत प्लॉट विक्रीचा सुळसुळाट

इमेज
औद्योगिक भागात अनधिकृत प्लॉट विक्रीचा सुळसुळाट चाकण:  अविनाश दुधवडे  खेड तालुक्यातील महत्त्वाचे तिर्थक्षेत्र असलेल्या आळंदीकडे जाणार्‍या रस्त्यावर धोक्याची वळणे असलेल्या घाटात जमीन खेरदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बड्या बिल्डर मंडळींकडून अनधिकृतपणे गोरगरीबांची लाटलेली प्रॉपर्टीची विक्री व्हावी म्हणून जाण्यासाठी रस्ता आहे असा कांगावा करण्यासाठी घाटात ठिकठिकाणी  संरक्षक भिंतींना खिंडार पाडले आहे.  हजारो एकर जमिनी व डोगरांच्या विक्रीचे व्यवहार राजरोज होत असताना महसूल विभागाकडून कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात येत नसल्याने जमिनीच्या व्यवहारांत उच्चपदस्थांचे आर्थिक संबध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  मुंबई- पुण्यातील धनदांडग्या बिल्डर मंडळीनी तालुक्यातील जमिनी सर्व मार्गांचा वापर करून गिळंकृत करण्यास गेल्या दहाबारा वर्षांपासून  सुरुवात केली असून बहुतेक व्यवहार दांडगाई,बळजबरी,भूलथापा मारून केल्याचे सर्वश्रुत आहेच. या धनदांडग्यांना स्थानिक दलालांची मदत मिळत असल्याचा आरोप नागरिकां कडून  केला जात आहे. शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत जमीन माफियांनी खरेदीचे व्यवाहर सुरू