चाकण औद्योगिक क्षेत्रातील मध्यम व लघु उद्योगांची चिंता वाढली
टाटा मोटर्सचा आठवड्याभराचा ब्लॉक क्लोजर पथ्यावर
चाकण -
वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत वाहननिर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांची पाठ सध्या उद्भवलेली मंदीसदृश्य स्थिती सोडण्यास तयार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही मध्यम लघु उद्योग धडपडत असतानाच
सलग सुट्या,'ब्लॉक क्लोजर 'व दुरुस्तीच्या कारणास्तव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने या उद्योगांवर अवलंबून असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारीचे हातपाय गळाले आहेत.
मंदीसदृश्य फेऱ्यात अडकलेल्या उद्योगांच्या उत्पादन निर्मितीवर कमीत कमी 15 ते 25 टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होत असल्याचे
उद्योजक सांगत आहेत. मंदीचा परिणाम झाल्याचे विजेचा वापर चाकण औद्योगिक क्षेत्रातून 20 टक्क्यांनी घटल्याने स्पष्ट झाले आहे.मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या चाकणमधील विविध मध्यम व लघु कंपन्या व ऑटोमोबाईल कंपन्याही या मंदी सदृश्य परिस्थितीने गेल्या काही दिवसांपासून प्रभावित झाल्या आहेत.उत्पादनात पंचवीस टक्क्या पेक्षा अधिक घट झाल्याने ही चिंता अधिक वाढल्याचे कारखानदार आणि त्यांचे व्यवस्थापकां कडून व त्यांची संघटना चाकण चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर यांचे कडून स्पष्ट पणे सांगण्यात येत आहे.यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतानाच पिंपरी येथील
टाटा मोटर्स कंपनीत येत्या 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2013 या कालावधीसाठी ब्लॉक क्लोजर जाहीर झाला आहे. 28 पूर्वी 26 आणि 27 जानेवारी अशा सलग सुट्या आहेत. त्यामुळे एक आठवडाभर कंपनीतील काम बंद राहणार आहे. मागील महिन्यात डिसेंबर 2012 मध्येही 26 ते 28 या कालावधीत ब्लॉक क्लोजर जाहीर झाला होता. चालू आर्थिक वर्षातील हा दुसरा ब्लॉक क्लोजर असून पुढील दोन महिन्यांत आणखी एकदा तो होण्याची शक्यता आहे.याचा फटका या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या अनेक मध्यम व लघु कारखान्यांना त्यांच्या हजारो कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला बसणार आहे.
-------------
------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा