माजी न्या. कोळसे-पाटील यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हे दाखल


                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
माजी न्या. कोळसे-पाटील यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हे दाखल 
महिंद्रा कंपनीच्या गेटवर जमाव जमवून फलक लावला 
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी न्यायमुर्तीसह माजी कामगार आयुक्त ,दोन वकिलांचा समावेश 

चाकण: वार्ताहर -
  चाकण औद्योगिक क्षेत्रातील महिंद्रा फोर्जिंग लि. या कंपनीच्या आवारात कंपनीच्या परवानगी शिवाय कामगार संघटनेचा फलक लावल्या प्रकरणी व जिल्हाधिकाऱ्यांचा 
जमावबंदीचा आदेश धुडकावून सभा घेवून घोषणाबाजी केल्या प्रकरणी लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष व  माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, निवृत्त कामगार आयुक्त 
सी.बी.डिंगरे यांच्या सह त्यांचे सहकारी व सुमारे दीडशे कामगारां विरुद्ध चाकण पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहेत. 
 या बाबत चे वृत्त असे की, चाकण आंबेठाण रस्त्यावर असलेल्या महिंद्रा फोर्जिंग लि. या कंपनीच्या कामगारांनी लोकशासन आंदोलन कामगार युनियनचे सदस्यत्व 
स्वीकारल्याने रविवारी (दि.6) लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष व  माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कंपनीच्या प्रवेश द्वाराजवळ 
एकत्रित होऊन  लोकशासन आंदोलन कामगार युनियनची सभा घेतली होती. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल दशरथ जगताप यांच्या 
फिर्यादीवरून जमाव बंदीचा आदेश धुडकावल्या प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील , निवृत्त कामगार आयुक्त सी.बी.डिंगरे , लोकशासन आंदोलन कामगार युनियनचे
सेक्रेटरी  ऍड. संतोष जाधव,  ऍड. संतोष म्हस्के, कामगार शैलेश येळवंडे , निलेश दिवेकर,काळूराम पवळे ,राजेश्वर रोकडे, संदीप साबळे, व अन्य 100 ते 150 कामगारांवर 
चाकण पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. तर  महिंद्रा फोर्जिंग लि. या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादी नुसार कंपनीला कुठलीही सूचना न देता कंपनीच्या 
गेटवर कामगार संघटनेचा फलक लावल्या प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या सह या संघटनेचे पदाधिकारी असलेल्या दहा ते पंधरा जणांवर आणखी 
एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली. या बाबत अधिक तपास चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 
सतीश साळवणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.  
 
हे रात्रीतून घडविलेले षड्यंत्र : माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील -
लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष व  माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी या संदर्भात सांगितले की,  महिंद्रा फोर्जिंग लि. या कंपनीच्या बहुसंख्य कामगारांनी 
लोकशासन आंदोलन कामगार युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे. संबंधित कंपनी मध्ये या पूर्वी राष्ट्रवादीचे सध्याचे मंत्री सचिन आहिर यांची (इंटक) कामगार संघटना होती. 
लोकशासन युनिअन चे सदस्यत्व कामगारांनी स्विकारल्याने संबंधित कंपनीच्या प्रवेश द्वारावर कामगार संघटनेचा फलक लावणे हा आम्हाला कायद्याने अधिकार आहे. 
त्याच प्रमाणे आम्ही सर्व कामगारांच्या समवेत त्यांच्या न्याय मागण्यांसाठी कंपनीच्या प्रवेश द्वारासामोरील रस्त्याच्या पलीकडील बाजूला सभा घेतल्याने कुठलाही 
जमावबंदीचा आदेश धुडकावला नाही. प्रचलित कामगार कायदे आणि कायदा सुव्यवस्था यांचे पालन करूनही आमच्यावर दाखल करण्यात आलेले हे गुन्हे म्हणजे राष्ट्रवादीच्या 
पुणे जिल्ह्यातील पवारांची पॉवरचा परिणाम आहे . कामगारांना संबधित कंपनी व राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून धमकावण्याचे प्रकारही सुरु असून या बाबत 
न्याय मार्गाने लढा दिला जाणार आहे.   
---------------------
फोटो मेल करीत आहे. 
फोटो ओळ: महिंद्रा कंपनीच्या गेटवर लावण्यात आलेला लोकशासन आंदोलन कामगार युनियनचा चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेला फलक ...........                               अविनाश दुधवडे,चाकण 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)