-ई-सेवा केंद्रामार्फत मिळणार सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा


                                                                     
                                                                     
                                                                     
                                             

महा-ई-सेवा केंद्रामार्फत मिळणार सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा 
चाकण मध्ये योजनेचा शुभारंभ 

चाकण:

 महा-ई-सेवा केंद्रामार्फत नागरिकास सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा दिला जाणार आहे. या उताऱ्याच्या प्रतीवर तलाठ्याच्या सहीची आवश्‍यकता राहणार नाही.
महा-ई-सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सात-बारा आणि आठ अ उताऱ्याची सत्यता पडताळणी संकेतस्थळावरही  करता येणार आहे. या सेवेचा शुभारंभ खेड चे तहसीलदार 
जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते चाकण येथे करण्यात आला
माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने जनतेला विविध शासकीय सेवा जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी महा-ई-सेवा ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात येणार 
असल्याचे सांगण्यात येत होते. आता हि योजना प्रत्यक्षात आली आहे.   प्रत्येक सहा गावांकरिता एक या प्रमाणाने राज्यात 11 हजार 818 महा-ई-सेवा केंद्रे सुरू करण्याची
 कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
भारत सरकारच्या ई गव्हर्नन्स योजने अंतर्गत तसेच महाराष्ट्र सरकारच्या महा ऑनलाईन सेवे अंतर्गत महा ई सेवा केंद्रातून 7/12 व 8 अ उतारा ( संपूर्ण पुणे जिल्हा )
या सेवेचा शुभारंभ खेड चे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते चाकण येथे नुकताच करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड ,
मंडलाधिकारी राजाभाऊ मोराळे , तलाठी बंडेश औटी, लक्ष्मण जाधव ,अनुप बानाइत ,योगेश कुंटे, महा ई सेवा केंद्राचे प्रा. राजेंद्र खरमाटे, निलेश गाडे ,आदी उपस्थित होते. 
  या प्रंसगी अशोकराव खांडेभराड म्हणाले की, हि सेवा अत्यंत चांगली असून यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. या सर्व सेवांबरोबर झोन दाखले हि उपलब्ध 
व्हावेत यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत . प्रा. राजेंद्र खरमाटे यांनी प्रास्ताविक केले, तर निलेश गाडे यांनी आभार मानले. 
------------
                                                अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 
                                                Avinash Dudhawade 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)