विजय चव्हाण मराठी चित्रपट आणि नाटकांचे वैभव
विजय चव्हाण
मराठी चित्रपट आणि नाटकांचे वैभव
विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत काम केलेले असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहीलेल्या मोरुची मावशी या नाटकातील मावशीच्या भूमिकेमुळे ते
ओळखले जातात.विजय चव्हाण या अभिनेत्याने विनोदी ढंगाची
मावशी सादर केली ती सुद्धा जवळ जवळ दोन हजार प्रयोगांत. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आल्याने त्यांच्या
बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्वा बाबत जाणून घेण्याची संधी मिळाली....
एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात शोभावा असा विजय चव्हाण यांचा नाट्यसृष्टीत प्रवेश झाला. एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितलं गेलं आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर ते रंगमंचावर उभे राहिले ते कधीही न बसण्यासाठीच . नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून हे नाटक बसविले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्र गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये त्यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला. अभिनेते विजय कदम त्यांचे वर्गमित्र त्याच्याबरोबर त्यांची मैत्री होतीच. विजय कदम, चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून "रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांतशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटुर' नाटक बसवत होते. लक्ष्मीकांतने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी अक्षरशः विक्रम केला. त्यानंतर मग "असे पाहुणे येती' ही मालिका मिळाली. मग मात्र चव्हाण यांची मालिका आणि चित्रपट यामधून घोडदौड सुरू झाली. "घोळात घोळ', "आली लहर केला कहर' यासारखे चित्रपट तर रानफूल, लाइफ मेंबर यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या.
त्यानंतर माहेरची साडी, येऊ का घरात हे चित्रपट आले. या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. त्याचबरोबर "येऊ का घरात'मधील त्यांच्या कामाची स्तुती थेट दादांनी केली. दादा कोंडके यांनी त्यांच्यातील अभिनयाला दाद दिली. हा सन्मान ते खूप मोठा मानतात. विनोदी अभिनेता हा शिक्का बसला असला तरी त्यांनी गंभीर भूमिकाही चांगल्याप्रकारे केल्या आहेत. "अशी असावी सासू'मधील भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा आणि स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. मालिका चित्रपट आणि नाटक यामध्ये विजय चव्हाण रंगले मात्र जास्त नाटकातच. त्यामुळे आजच्या पिढीच्या भरत जाधवबरोबरही ते लीलया भूमिका करतात. विनोदी भूमिका आणि नाटकाचा रंगतदार प्रयोग हे समीकरण चव्हाण यांच्याबाबतीत कायम आहे.
विजय चव्हाण यांचा परिचय
जन्मतारीख : 8 फेब्रुवारी
शिक्षण : शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये.
बालपण करीरोडच्या गिरणगाव भागात. त्यानंतर रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण व बी.ए.ची पदवी.
महत्त्वाचे चित्रपट : माहेरची साडी, येऊ का घरात, ताईच्या बांगड्या, बाळा जो जो रे.
नाटक : टुरटुर, मोरूची मावशी, कार्टी प्रेमात पडली, देखणी बायको दुसऱ्याची, श्रीमंत दामोदरपंत
------------------------------------------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा