चाकण मधील गणगे कंपनीत आग
कोट्यावधींची यंत्रसामुग्री आगीत स्वाहा
रात्री उशिरा पर्यंत आह विझविण्याचे प्रयत्न
चाकण : वार्ताहर -
चाकण औद्योगिक क्षेत्रातील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नाणेकरवाडीगावच्या (ता.खेड) हद्दीतील गणगे प्रेस प्रा. लि. या कंपनीतील आरटीएसपीएल या शॉप मधील
हायड्रोलिक मशिनच्या महाकाय ऑईल च्या टाकीला लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांची यंत्र सामुग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली . भूमिगत ओईल च्या टाकीनेच पेट
घेतल्याने तीन आग्निबंबानां सायंकाळी सहा वाजता लागलेली आग रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते.
पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे दोन व बजाज कंपनीचा एक अशा तीन अग्निबंबांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचत आग विझविण्यासाठी
शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. या बाबत प्रत्यक्षदर्शी कामगारांनी दिलेल्या माहिती नुसार या ऑईलच्या मोठ्या टाकी जवळ वेल्डिंगचे काम सुरु होते. त्याची ठिणगी
उडाल्याने हि आग लागली. सुरुवातीला कामगारानी हि आग विझविण्याचा प्रयत्न केला .मात्र आग नियंत्रणात येण्या एवजी वाढत असल्याचे लक्षात येताच अग्निबंब
घटनासाठी पाचारण करण्यात आले . मात्र तो पर्यंत आगीने संपूर्ण ऑईलची टाकी व हायड्रोलिक मशनरी काबीज केली होती. ऑईल च्या टाकीतील आग नियंत्रणात
आणण्यासाठी फोमच्या वापर करण्यात येत होता. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बाबत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. रात्री उशिरा पर्यंत आग आटोक्यात
आणण्याचे प्रयत्न सुरु होते. या आगीत कोट्यावधी रुपयांची यंत्रसामुग्री आगीत स्वाहा झाली असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही .
दरम्यान परिसरात गेल्या काही काळात अशा आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. सातत्याने होणारे हे प्रकार चटका लावणारे असून भविष्यातील आणखी धोक्यांची नांदी आहे.
चाकण परिसरातील घटन पाहता कंपन्यामधली सुरक्षा यंत्रणा सदैव 'हाय अलर्ट'वर असायला हवी अशी स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या वायूचे प्रमाण
वाढल्यानंतर त्याची माहिती देणारे अलार्म किंवा सेंसर लावणे क्रमप्राप्त आहे. आपण काय हाताळतोय, त्याचे धोके काय आहेत, आपत्कालीन परिस्थिती
उद्भवली तर त्याचा सामाना कसा करायचा, स्वत:च्या जीव कसा वाचवायचा याचे प्रशिक्षण कामगारांना द्यायला हवे. मात्र, बहुसंख्य कंपन्या कॉस्ट
कटींगच्या नावाखाली या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतात. उपकरणांचा आणि विषारी वायू आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या पाईपलाईनच्या
मेंटेनन्सकडेही लक्ष दिले जात नाही.चाकण औद्योगिक क्षत्रातील जवळपास 60 टक्के कंपन्यामध्ये सुरक्षा व्यवस्था धाब्यावर बसवली जाते. या कारखान्यांमध्ये
दुर्घटना घटत नाही ही केवळ देवाचीच कृपा. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर काय परिस्थती उद्भवेल याची कल्पना न केलेलीच बरी अशी अवस्था आहे.
----------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ: गणगे प्रेस प्रा. लि. या कंपनीतील आरटीएसपीएल या शॉप मधील हायड्रोलिक मशिनच्या महाकाय ऑईल च्या टाकीला लागलेली आग विझविताना
अग्निशमन दलाचे जवान ( छाया: अविनाश दुधवडे ,चाकण)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा