महाळुंगे मध्ये श्रामणेर शिबिराची सांगता.
चाकण : वार्ताहर
महाळुंगे मध्ये बुधवारी (दि.2) भव्य मिरवणूक ,पंचशील व विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांनी दहा दिवसीय श्रामनेर शिबिराची
सांगता करण्यात आली .महाळुंगे गावातून दुपारी दोन वाजता धम्म रॅली काढण्यात आली होती . या रॅलीचा समारोप बुद्ध विहाराजवळ झाला. यानंतर
सामुहिक धम्मवंदना व महापुरुषांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.या वेळी खेड तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने आवर्जून हजेरी लावली होती .
भारतीय बौद्ध महासभेच्या खेड तालुक्याच्या शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन महाळुंगे (ता. खेड) येथील
राजगृह या बुद्धविहारात करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. बुधवारी या शिबिराची
सांगता झाली .यावेळी विद्युत रोषणाईणे सजविलेल्या रथातून आंबेडकर व गौतम बुद्धांच्या च्या प्रतिमांची व श्रामनेर संघासह मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकी
मध्ये भन्ते महेंद्र बोधी,भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब रणपिसे, जिल्हा सरचिटणीस भगवान शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे ,
आदींसह तमाम बौद्ध महिला व पुरुष सहभागी झाले होते.
चाकण मधील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोहन रोकडे, बी एस गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, पी.एल. गायकवाड, राजरतन थोरात,
महाळुंगेचे भीम ज्योत मंडळाचे अध्यक्ष गौतम कांबळे, चोखोबा कांबळे, उमेश भालेराव, सागत सोनावणे संतोष गायकवाड, प्रशांत तुळवे, किसान लगड , आदीसह
सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली.या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे संघटक पी के. पवार, राजेंद्र भोसले,आर.डी.गायकवाड,
सिद्धार्थ गोतारणे,विशाल गायकवाड, आरपीआय चे तालुकाध्यक्ष संतोष जाधव , चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे,राहुल गोतारणे,नितीन जगताप,सतीश आगळे,
आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. तालुक्यात दहा दिवस चाललेल्या श्रामनेर वर्गातील अनुभव महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे , सिद्धार्थ गोतारणे यांनी
या वेळी व्यक्त केले.
------------------------------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ: महाळुंगे (ता. खेड) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रामनेर शिबिराची बुधवारी सांगता झाली.
-----------------------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा