चाकण शहर मनसे अध्यक्षपदी योगेश आगरकर     
चाकण : वार्ताहर  
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या पुनर्बाधणीला सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण भागांमध्ये पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत 
आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांकडे तरुण वर्ग आकर्षित झाला असून स्थानिक तरुणांचा ओढा पक्षाकडे वाढत आहे,  यासाठीच चाकण मधील युवा 
कार्यकर्ते योगेश आगरकर यांची चाकण शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्यांना निवडीचे पत्र आमदार बाळा नांदगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हा संघटक अभय वाडेकर, समीर गवारे , श्रीकांत जाधव, राजाभाऊ वाव्हळ , खेड तालुकाध्यक्ष 
रोहिदास गाडगे, वाहतूक सेलचे अल्ताफ शेख , आदींसह खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. 
निवडीनंतर योगेश आगरकर यांनी सांगितले की,  नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्ष पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 
चाकण शहरात  पक्षाचे असंख्य कार्यकर्ते काम करीत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असून येत्या काही दिवसांत पक्षाच्या वतीने समाजोपयोगी 
उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजामध्ये काम करताना राजकीय फायदा न घेता समाजाच्या फायदय़ाचा विचार करूनच आपण काम करणार 
असून शहरामध्ये पक्ष वाढविण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी चाकण  शहर आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते,
पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ: योगेश आगरकर यांना निवडीचे पत्र देताना आमदार बाळा नांदगावकर व पदाधिकारी (छाया: अविनाश दुधवडे ,चाकण) .

------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)