पोस्ट्स

जानेवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश दुधवडे

इमेज
खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश दुधवडे  राजगुरुनगर :वार्ताहर  खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश दुधवडे यांची तर उपाध्यक्ष पदी एम.डी.पाखरे व रामचंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडण्यात आलेली अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे - कार्याध्यक्ष -तुकाराम बोंबले, सचिव- सुरेश शेटे ,सहसचिव -सुनील थिगळे ,खजिनदार - सुनील बटवाल,यांची निवड करण्यात आली असून ,कायदेशीर सल्लागार पदी एड.विलास काटे,यांची निवड करण्यात आली आहे.तर सल्लागार म्हणून पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर,कोंडीभाऊ पाचारणे,एकनाथ सांडभोर ,विद्याधर साळवी यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

चाकण पोलिसांनी आवळल्या रोड रोमिओंच्या मुसक्या

इमेज
चाकण पोलिसांनी आवळल्या रोड रोमिओंच्या मुसक्या महाविद्यालयांच्या परिसरात धरपकड रोड रोमिओंना बसला वचक चाकण:अविनाश दुधवडे रस्त्याने चालताना एखाद्या शाळकरी - महाविद्यालयीन विद्यार्थिनीला कुणा तरुणाचा धक्का लागला... चौकातील टोळक्याने एखाद्या मुलीकडे पाहून कमेण्ट केली, तरी काय करणार ? टारगट मुले असतील ... शाळा कॉलेज मधून घरी निघालेल्या मुलीकडे पाहून कमेण्ट केली, तर तेही नेहमीचेच... अशी विद्यार्थिनी - तरुणींची झालेली मानसिकता .. त्याविरोधात वृत्तपत्रे वगळता क्वचितच उठविला गेलेला आवाज... कदाचित त्यामुळेच राजरोस धिंगाणा घालत दुचाक्या - चारचाक्या घेवून फिरणारे रोडरोमिओ ... अशी अवस्था शाळा महाविद्यालयांच्या आवारात चाकण परिसरात पहावयास मिळत होती. मात्र अशा घटना वारंवार चव्हाट्यावर आल्याने खडबडून जागे झालेल्या चाकण पोलिसांनी अखेर आज

चाकणच्या बंधाऱ्याला गळती;हजारो लिटर्स पाणी जातेय वाया

इमेज
चाकणच्या बंधाऱ्याला गळती;हजारो लिटर्स पाणी जातेय वाया चाकण:अविनाश दुधवडे चाकणला पाणी पुरवठा करणाऱ्या वाकी के.टी.बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून हजारो लिटर्स पिण्याचे पाणी बंधाऱ्याच्या फळ्यांच्या लिकेज मुळे वाया जात आहे. या बंधाऱ्याची देखभाल करण्याचं काम चाकण ग्रामपंचायती कडे आहे. पण आर्थिक चणचणी मुळे याचे कामकाज पूर्णपणे ढेपाळल्याचा अनुभव सध्या चाकण परिसरातील नागरिक घेत आहेत. चाकण शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाकी येथे भामा नदीवर हा वाकी के. टी.बांधला करण्यात आला आहे. यामध्ये लाखो दशलक्ष घनफूट पाणीसाचण्याची क्षमता आहे. या पाण्याचा चाकण परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी वापर होतो. पण सध्या या बंधाऱ्यात घातलेल्या फळ्यांमधून पाण्याची गळती होत आहे. फळ्या घातल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून त्यात रबरी पॅकिंग घातले

चाकणच्या पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा अखेर खंडित

इमेज
चाकणच्या पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा अखेर खंडित सोळा लाखांचा धनादेश दिल्याने काही दिवसांची मुभा चाकण:अविनाश दुधवडे गावपातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनांकडे कोट्यावधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी बाबत वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेतली असून याचा सगळ्यात पहिला झटका चाकण च्या पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. तब्बल 67 लाख रुपये थकबाकी पोटी सोळा लाख रुपये तरी भरा म्हणून गेले काही दिवस तगादा लावणाऱ्या वीज वितरणने आज (दि.24)दुपारी चाकण च्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत चाकण ग्रामपंचायतीच्या कारभार्यांनी ग्रामपंचायतीच्या तोजोरीतील शिलकीचा अंदाज न घेताच सोळा लाखांचा धनादेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करीत आडात नसतानाच पोहऱ्या सोडला आहे.खंडित वीज पुरवठ्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊन न

उत्तर पुणे जिल्ह्यात रक्तचंदनाचा मोठा साठा

इमेज
उत्तर पुणे जिल्ह्यात रक्तचंदनाचा मोठा साठा  उपसरपंचांसह अन्य तिघांवर गुन्हे; सर्व जन फरार  चाकण : अविनाश दुधवडे   चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे निर्यातबंदी असलेल्या व शासनाने संरक्षित केलेल्या रक्तचंदनाचा विक्री करण्यासाठी अवैध साठा केल्याप्रकरणी वाकीच्या उपसरपंचासह चौघांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील सर्वच जन फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश गबाजी नाळे यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादी वरून  वाकीचे उपसरपंच दतात्रेय संतू टोपे , कैलास गेनभाऊ टोपे ,रामभाऊ नारायण टोपे (सर्व रा.वाकी,ता. खेड,जि. पुणे ) व भारत प्रकाश काणे (रा.नेरूळ नवीमुंबई ) अशा चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आंध्रप्रादेशातून चाकण भागात आलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले सत्तावीस टन वजनाचा व अडीच कोटी रुपये किंमतीचा शासनाने संरक्षित केलेला निर्यातबंदी असलेल्या रक्तचंदनाचा अवैध साठा चाकण पोलिसांच्या पथकाने वाकी बुद्रुक (ता.खेड)येथून आज (दि.25) शिताफीने हस्तगत केला होता .   या भागात चंदनाची तस्करी होत असल्य

-ई-सेवा केंद्रामार्फत मिळणार सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा

इमेज
महा-ई-सेवा केंद्रामार्फत मिळणार सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा चाकण मध्ये योजनेचा शुभारंभ चाकण: महा-ई-सेवा केंद्रामार्फत नागरिकास सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा दिला जाणार आहे. या उताऱ्याच्या प्रतीवर तलाठ्याच्या सहीची आवश्‍यकता राहणार नाही. महा-ई-सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सात-बारा आणि आठ अ उताऱ्याची सत्यता पडताळणी संकेतस्थळावरही करता येणार आहे. या सेवेचा शुभारंभ खेड चे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते चाकण येथे करण्यात आला माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने जनतेला विविध शासकीय सेवा जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी महा-ई-सेवा ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. आता हि योजना प्रत्यक्षात आली आहे. प्रत्येक सहा गावांकरिता एक या प्रमाणाने राज्यात 11 हजार 818 महा

माथाडी ......

इमेज
माथाडीच्या कचाट्यातून सुटल्याची उद्योगांची भावना अस्थायी कामगारांना उद्योजक संरक्षण देणार का? चाकण: संरक्षित कामगार असलेल्या उद्योगांना माथाडी कायद्यातून वगळण्याची महत्त्वाची शिफारस माथाडी कामगार कायद्यामध्ये करण्याचा निर्णय मुंबईत झाल्यानंतर चाकणच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी त्यांच्या व्यवस्थापनांनी सुटकेचा श्वास सोडला आहे . औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये मालाच्या चढ-उतारासाठी माथाडी कामगारांनी घुसखोरी सुरू केल्याचा आरोप करीत गेल्या काही दिवसांपासून उद्योजक आणि माथाडी संघटना यांच्यांत संघर्ष निर्माण झाला होता. शासनाच्या या शिफारशी नंतर त्यावर तोडगा निघाला असल्याचे बोलले जात आहे. लघुउद्योगांतील कामगारांना भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना आदी सुविधा लागू असल्यास ते संरक्षित म्हणून ओळखले जातात. असे संरक्षित कामगा

मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी देणार संघटीत लढा

इमेज
मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी देणार संघटीत लढा महाराष्ट्र कामगार सभेची चाकणला स्थापना चाकण: शासनाच्या विविध योजना गावपातळीवर राबविणारे ग्रामपंचायत कर्मचारी स्वातंत्र्य काळापासून अगदीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे कर्मचारी गेल्या 40 वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थातील पहिला स्तर असणाऱ्या ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी त्यांना थेट निधी देऊ केला असताना दुसरीकडे ग्रामपंचायतचा कारभार पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्यामुळे ग्रामपंचायत तुपाशी तर कर्मचारी उपाशी असल्याची भावना व्यक्त करीत चाकण परिसरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या विरोधात लढा देण्याचा निर्धार करीत महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेची येथे आज (दि.20) स्थापना केली आहे . चाकण ग्रामपंचायतीच्या महिला स

चाकण औद्योगिक क्षेत्रातील मध्यम व लघु उद्योगांची चिंता वाढली

इमेज
चाकण औद्योगिक क्षेत्रातील मध्यम व लघु उद्योगांची चिंता वाढली टाटा मोटर्सचा आठवड्याभराचा ब्लॉक क्लोजर पथ्यावर चाकण - वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत वाहननिर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांची पाठ सध्या उद्भवलेली मंदीसदृश्य स्थिती सोडण्यास तयार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही मध्यम लघु उद्योग धडपडत असतानाच सलग सुट्या,'ब्लॉक क्लोजर 'व दुरुस्तीच्या कारणास्तव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने या उद्योगांवर अवलंबून असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारीचे हातपाय गळाले आहेत. मंदीसदृश्य फेऱ्यात अडकलेल्य

वाहन उद्योगांच्या उत्पादकतेत घसरण सुरूच

इमेज
वाहन उद्योगांच्या उत्पादकतेत घसरण सुरूच चाकण मधील स्थिती ऑटो सेक्टरमध्ये खुशी गमचा सिलसिला कायम चाकण: अविनाश दुधवडे चाकण औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या वाहन उद्योगाशी संबंधित विविध उद्योगांवर सहा महिन्यांपूर्वी आलेले अंशतः मंदीचे सावट कमी होईल असे वाटत असतानाच ,ही मंदी पुन्हा डोके वर काढीत असल्याचे चित्र चाकण औद्योगीक वसाहतीत पहावयास मिळत आहे . मागील काही काळापासून औद्योगिक उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. विशेषतः मोठ्या वाहन कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या लघुउद्योगांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक अस्थायी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. या गेल्या काही काळापासून मंदीच्या सिलसिल्यामुळे घटलेल्या उत्पादनाची गाडी पुन्हा रुळावर आणून त्याला गती देण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरत्या

कांद्याच्या बाजारभावाचे गणित निर्यातीवर अवलंबून

इमेज
कांद्याच्या बाजारभावाचे गणित निर्यातीवर अवलंबून   चाकण : अविनाश दुधवडे   कांद्याचा हंगाम सुरु झाल्याने शनिवार या आठवडेबाजाराच्या दिवसासह बुधवारच्या बाजारातही कांद्याची अशी मोठी आवक सुरु झाली आहे.  मात्र प्रत्येकच वर्षी या हंगामात मागणी पेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नाईलाजाने कांदा कवडीमोल भावाने द्यावा लागत असल्याच्या तक्रारीने यंदाच्या वर्षापासून या हंगामात कांद्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दैनंदिन पद्धतीने करण्यात येत आहेत.त्यामुळे केवळ आठवडे बाजाराच्या दिवशी कांद्याची मोठी आवक होऊन भाव गडगडण्याची नामुष्की ओढवणार नसल्याचा बाजार समिती प्रशासनाचा कयास आहे.याच पार्श्वभूमीवर चाकण मार्केट यार्डात कांद्याचे कामाल भाव अजूनही 1800 रुपयांवर वर स्थिरावले आहेत. प्रत्येक वर्षी या हंगामात चाकण सह सर्वच बाजारपेठेतील कांद्याचे भाव मोठ्या आवकेच्या पार्श्वभूमीवर कोसळत असल्याचा अनुभव असून असून, हे भाव जवळजवळ 400 रुपयांच्या सर्वसाधारण पातळीच्याही खाली  आल्याच्या नोंदी बाजार समित्यांकडे आहेत .कांद्याच्या लागवडी नंतर बाजार भावाचे गणित जुळवीत, लाखांचे आकडे जुळवीनाऱ्या शेतकऱ्य

भगिनींच्या सुरक्षेसाठी पोलीसदादांचा पुढाकार

इमेज
भगिनींच्या सुरक्षेसाठी पोलीसदादांचा पुढाकार चाकण पोलीस देणार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे चाकण: गेल्या वर्षात (2012) चाकण परिसरात 4 बलात्काराच्या घटना घडल्या , विनयभंग आणि महिला ,विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीचे अनेक प्रकार वेळोवेळी समोर येतच असतात. अशा घटना स्थानिक पातळीवरील दबावांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कसोटी लावणाऱ्या ठरतात. दिल्ली येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महिलांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला आणि तरुणींमध्ये लोकजागृती करून स्वसंरक्षणाचे धडे देवून ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम पोलिसांनी हाती घेतले असून,यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी महिला संघटनांनीही या मध्ये सक्रीय होण्याचे आवाहन पोलिसांनी केले

विजय चव्हाण मराठी चित्रपट आणि नाटकांचे वैभव

इमेज
    वि ज य च व्हा ण   मराठी चित्रपट आणि नाटकांचे वैभव  विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक  नाटकांत आणि चित्रपटांत काम केलेले असून,  प्रल्हाद केशव अत्रे  यांनी  लिहीलेल्या  मोरुची मावशी  या नाटकातील मावशीच्या भूमिकेमुळे ते  ओळखले जातात. विजय चव्हाण या अभिनेत्याने विनोदी ढंगाची  मावशी सादर केली ती सुद्धा जवळ जवळ दोन हजार प्रयोगांत.  त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने  एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला  त्यांच्याशी  बातचीत करण्याचा योग आल्याने त्यांच्या बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्वा बाबत  जाणून घेण्याची संधी मिळाली....  एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात शोभावा असा विजय चव्हाण यांचा नाट्यसृष्टीत प्रवेश झाला. एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितलं गेलं आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर ते रंगमंचावर उभे राहिले ते कधीही न बसण्यासाठीच . नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले

छुप्या खाजगी सावकारांचा पाश आवळ्तोय ...

इमेज
छुप्या खाजगी सावकारांचा पाश आवळ्तोय ... चाकण:अविनाश दुधवडे वर्तमानातील गरज भागवण्यासाठी माणूस सावकाराच्या उंब-यावर जातो त्याक्षणी तरी गरज भागते मात्र भविष्यात अनेक गरजाचे धन सावकाराच्या घशात जाऊ लागल्यानंतर माणूस भिकेकंगाल झाल्याशिवाय रहात नाही.याचा प्रत्यय आता चाकण सह खेड तालुक्यातल्या अनेकांना येत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. शासनाच्या विविध विकास प्रकल्पांमुळे चाकण सह खेड तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकत असल्याचे अभिमानाने सांगण्यात येत असले तरीही येथे छुपी खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे.हि खाजगी सावकारी एवढी वाढली आहे की, प्रशासनाने या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याला 75 हजार रुपये दिल्यानंतर त्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत असल्या

प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

इमेज
प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून खून केल्यानंतर मृतदेह टाकला जाळून चाकण जवळील घटना चाकण :वार्ताहर शुक्रवारी (7 डिसेंबर 12) सकाळी तोंडात बोळा कोंबून युवकास जाळण्यात आलेल्या थरारक खुनाचा छडा चाकण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत लावला असून ,अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.संपूर्ण पणे जळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या नातेवाईकांपर्यंत पोहचण्याचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि संशयीतांना बोलते करण्याचे दिव्य पोलिसांनी पार पाडीत पत्नी आणि प्रियकर या दोघांना आज(दि.12) गजाआड केले आहे. संतोष बबन जाधव (वय 33,सध्या रा,लेंडघर वस्ती,नाणेकर वाडी,चाकण मूळ रा.उदापूर,ता.जुन्नर जि.पुणे ) असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव

गर्भवती बौद्ध विवाहितेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

इमेज
गर्भवती बौद्ध विवाहितेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा  गर्भपात झाल्याने प्रकार उघडकीस  चाकण: ( अविनाश दुधवडे )  एकोणीस वर्षीय बौद्ध गरोदर विवाहितेवर पाशवी बलात्कार केल्याचा धक्कादायक घृणास्पद प्रकार संबंधित विवाहितेचा गर्भपात झाल्याने उघडकीस आला असून   याप्रकरणी आज (दि. 23) चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित पिडीत विवाहितेवर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या प्रकरणी किशोर मधुकर जाधव (रा.वाकी खुर्द ,ता.खेड,जि .पुणे ) या नराधामासह  त्याला या दुष्कृत्यात मदत करणाऱ्या पूजा शिवाजी जाधव या दोघांवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुळची हवेली तालुक्यातील असलेली संबंधित विवाहिता सध्या वाकी खुर्द (ता. खेड )  येथे आपल्या पतीसह राहण्यास आहे . तिचा पती चाकण येथील औद्योगिक वसाहतीत व्होक्स वेगन या बहुराष्ट्रीय कंपनीत  नोकरीत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित विवाहिता भाजीपाला खरेदी करण्यासाठी चाकण येथील बाजारात आली असताना पूजा जाधव हिने तिला फसवून चाकण मधील एका लॉज वर नेले . लॉज वर गेल्या नंतर  आधीच खोलीत असणाऱ

चाकण मागोवा 2012

इमेज
चाकण मागोवा 2012 भाग 1 चाकण:अविनाश दुधवडे मावळते वर्ष चाकण करांना जमीन व्यवहार वगळता अन्य क्षेत्रात फलदायी ठरले नाही. लहरी पावसामुळे शेती क्षेत्रात निरुत्साह, उद्योगक्षेत्रात काही नव्या कारखान्यांच्या आगमनानंतरही व मंदी सदृश्य स्थिती झाल्याने निर्माण झालेली चिंता, गुन्हेगारी क्षेत्राची झालेली पळापळ ,अतिक्रमणांवरील बुलडोझर ,वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांचा धुराळा ,चाकण नगरपालिकेचा शासन स्तरावरील निर्णय मात्र हद्दीच्या निर्बंधांमुळे नागरिकांम
इमेज
चाकण शहर मनसे अध्यक्षपदी योगेश आगरकर चाकण : वार्ताहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या पुनर्बाधणीला सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण भागांमध्ये पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांकडे तरुण वर्ग आकर्षित झाला असून स्थानिक तरुणांचा ओढा पक्षाकडे वाढत आहे, यासाठीच चाकण मधील युवा कार्यकर्ते योगेश आगरकर यांची चाकण शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्यांना निवडीचे पत्र आमदार बाळा नांदगावकर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हा संघटक अभय वाडेकर, समीर गवारे , श्रीकांत जाधव, राजाभाऊ वाव्हळ , खेड तालुकाध्यक्ष रोहिदास गाडगे, वाहतूक सेलचे अल्ताफ शेख , आदींसह खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण

महाळुंगे मध्ये श्रामणेर शिबिराची सांगता.

इमेज
महाळुंगे मध्ये श्रामणेर शिबिराची सांगता. चाकण : वार्ताहर महाळुंगे मध्ये बुधवारी (दि.2) भव्य मिरवणूक ,पंचशील व विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांनी दहा दिवसीय श्रामनेर शिबिराची सांगता करण्यात आली .महाळुंगे गावातून दुपारी दोन वाजता धम्म रॅली काढण्यात आली होती . या रॅलीचा समारोप बुद्ध विहाराजवळ झाला. यानंतर सामुहिक धम्मवंदना व महापुरुषांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.या वेळी खेड तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने आवर्जून हजेरी लावली होती . भारतीय बौद्ध महासभेच्या खेड तालुक्याच्या शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन महाळुंगे (ता. खेड) येथील राजगृह या बुद्धविहारात करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षकांनी मार्गदर्शन