सेनाप्रमुखांच्या अस्थिकलशाचे दर्शनासाठी चाकणला गर्दी 

चाकण:

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थी कलश आज (दि.22) दर्शनासाठी चाकण येथे आणण्यात आला. त्या वेळी शिवसैनिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘भव्य फेरी’ काढली होती . या फेरीत शिवसैनिकांनी भगवे झेंडे घेतले होते. त्यानंतर अस्थी कलश येथील माणिक चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या वेळी असंख्य नागरिकांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.
 यावेळी झालेल्या भव्य शोकसभेत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा खजिनदार प्रतापराव खांडेभराड , माजी उपाध्यक्ष किरण मांजरे ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी,शिवसेनेचे
उपजिल्हा प्रमुख राम गावडे, माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड ,शरद सोनावणे ,विद्यार्थी सेनेचे जिल्हा संपर्क संघटक प्रमुख रामदास धनवटे,भारतीय कामगार सेनेचे गणेश पऱ्हाड,महिला आघाडीच्या विजया शिंदे,कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर,युवक अध्यक्ष अतिष मांजरे ,पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी,अमृता गुरव,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश सांडभोर,चाकण शहर प्रमुख पांडुरंग (बाप्पू)गोरे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी),भास्कर तुळवे,प्रीतम शिंदे, लक्ष्मण जाधव,मंगल शेवकरी,आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह चाकण कर नागरिक शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या चाकण मध्ये 20 एप्रिल 2004 साली झालेल्या त्या प्रचंड सभेला पुन्हा उजाळा दिला.खासदार आढळराव यांनी इतक्यात शिवसेनाप्रमुख सोडून जातील असे शिवसैनिकांना वाटले नव्हते अशी खंत व्यक्त केली तर ,प्रतापराव खांडेभराड यांनी महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली.रामहरी आवटे , रामदास धनवटे,अशोक खांडेभराड,संदीप सोमवंशी, यांनी शिवसेना हा जातीयवादी नव्हे तर बहुजनांचा पक्ष असल्याचे शिवसेनाप्रमुखांनी कृतीतून दाखवून दिल्याचे या वेळी बोलताना सांगितले.

शुक्रवारी अस्थींचे विसर्जन :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्थिकलश राज्यभरात दर्शनासाठी रवाना झाले आहेत.तब्बल 100 कलश हे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आलेल्या  अस्थिकलशांचं विसर्जन 23 नोव्हेंबरला आळंदी येथे करण्यात येणार असून उर्वरित सर्वच अस्थिकालशांचे
विसर्जन देशभरातल्या विविध नद्यांमध्ये शुक्रवारीच करण्यात येणार आहे.
                                                                              अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)