छायाताई दुधवडे यांचे निधन  
              पुणे :प्रतिनिधी
येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी छाया लक्ष्मण दुधवडे (वय ५४ ) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील बुधराणी रुग्णालयात सोमवार दि.२२ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले.त्यांच्यावर चाकण येथील चक्रेश्वर स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.भारतीय बौद्ध महासभेचे खेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) यांच्या त्या पत्नी होत,तर खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक पुढारी व सम्राट चे पत्रकार अविनाश दुधवडे यांच्या त्या मातोश्री होत.
 छायाताई दुधवडे  यांच्या पुण्यानुमोदन व शोकसभेसाठी खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अशोक कडलक ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,चाकण शहराध्यक्ष संदीप परदेशी,पी.के. टेक्निकल चे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख रामदास धनवटे , शेतकरी कुणबी संघाचे संस्थापक अप्पासाहेब कड, शिवसेनेचे चाकण शहरप्रमुख पांडुरंग गोरे, भारतीय बौद्ध महासभेचे गुलाब ओव्हाळ सिध्दार्थ गोतारणे , रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अशोक गोतारणे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे, राजगुरुनगर बँकेचे संचालक पत्रकार  राजेंद्र सांडभोर, चाकण ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल घोगरे, दतात्रेय बिरदवडे, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)