आई, तू होतीस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे....
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
या जगातली माझी पहिली ओळख झाली ती आई तुझ्या बरोबर . बाकीच्या एकूण एक ओळखी त्यानंतरच्या. नंतर झालेल्या ओळखीतली बहुतेक माणसं आजही माझ्या आसपास, अवतीभवती आहेत; आई मात्र नाही! एखाद्या विस्तृत वृक्षाला पारंब्यांच्या आधारानं उभं राहण्याची वेळ यावी आणि ज्यानं सांभाळलं, वाढवलं, आधार दिला, ते मात्र आज अस्तित्वात नसावं, ही परिस्थिती अत्यंत अत्यंत अवस्थ करणारी आहे.
सोमवार २२ ऑक्टोबर २०१२ ला वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी आई तू जगाचा निरोप घेतलास ...
आणि जीवनातल्या सगळ्याच मोठ्या सत्याची प्रचीती दिलीस. माझा मात्र यावर विश्वासच बसत नाही.जीवनातला आनंद संपल्या सारखा झालाय .आता फक्त कर्तव्य म्हणून जगतो आहे. पुण्यातल्या ज्या बुधराणी रुग्णालयात तू माझ्या कडे कटाक्ष टाकत माझा हात हातात घेवून
या जगाचा निरोप घेतला त्या बुधराणी हॉस्पिटल मध्ये मी आजही तुला शोधण्यासाठी जातो ,माझी खात्री आहे तू मला एक ना एक दिवस भेटशिलच ......
तुझा आवड्या ......

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा