मायेची छाया
आई, तू होईस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे....
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....
या जगातली माझी पहिली ओळख झाली ती आई तुझ्या बरोबर . बाकीच्या एकूण एक ओळखी त्यानंतरच्या. नंतर झालेल्या ओळखीतली बहुतेक
माणसं आजही माझ्या आसपास, अवतीभवती आहेत; आई मात्र नाही! एखाद्या विस्तृत वृक्षाला पारंब्यांच्या आधारानं उभं राहण्याची वेळ यावी आणि
ज्यानं सांभाळलं, वाढवलं, आधार दिला, ते मात्र आज अस्तित्वात नसावं, ही परिस्थिती अत्यंत अत्यंत अवस्थ करणारी आहे.
सोमवार २२ ऑक्टोबर २०१२ ला वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी आई तू जगाचा निरोप घेतलास ...
आणि जीवनातल्या सगळ्याच मोठ्या सत्याची प्रचीती दिलीस. माझा मात्र यावर विश्वासच बसत नाही.जीवनातला आनंद संपल्या सारखा झालाय .आता
फक्त कर्तव्य म्हणून जगतो आहे. पुण्यातल्या ज्या बुधराणी रुग्णालयात तू माझ्या कडे कटाक्ष टाकत माझा हात हातात घेवून
या जगाचा निरोप घेतला त्या बुधराणी हॉस्पिटल मध्ये मी आजही तुला शोधण्यासाठी जातो ,माझी खात्री आहे तू मला एक ना एक दिवस भेटशिलच ....
आम्ही लहान असताना सायंकाळी तू शुभंकरोती कल्याणम् म्हणत मला आणि मयुला भरवायचीस.रात्री आम्हाला झोपविण्यासाठी तुझ्या गोड गळ्यातून गायले जाणारे
आजीच्या जावळी घड्याळ कसले ... आहे चमत्कारिक ... हे गीत अजूनही जशेच्या तसे कानात घुमते आहे.शाळेचा अभ्यास ,वर्गात मी शी केल्या नंतर
तू पदरात लपवून घरी घेवून जाणारा तो क्षण आजही जसाच्या तसा डोळ्या समोर येतो आहे.चिंचेच्या झाडावर चढलो म्हणून तू मला शिमटीने मारत घरापर्यंत
ओढत आणलेला तो एकमेव क्षण,आणि घरातल्या पितळेच्या परातीवर पडल्यानंतर माझ्या कपाळाला झालेली जखम आणि रक्ताची धार पाहून तुझा मला उराशी
धरून किंचाळलेला आवाज आजही कानात घुमतो आहे. एम ए पर्यंतची प्रत्येक परीक्षा पास झाल्या नंतर तुझ्या चेहऱ्या वरून ओसंडून वाहणारा आनंद ...
ते अगदी मयुच्या आणि माझ्या लग्नात संध्या मावशीला घट्ट मिठीमरून तू आनंदाश्रूंना करून दिलेली वाट सारखी डोळ्या समोर तरळतेय आई .
दिवसभर घरल्या कामात तू स्वतःला गुरफटून ठेवायचीस . सुनांनी कितीही नको म्हटलं तरी त्यांच्या पेक्षा दुप्पट काम करायचीस .दररोज संध्याकाळी
भाजी आणायची,दर शनिवारी आठवडे बाजाराला भाजी तरकारी आणायची,महिन्याचे खाते भरायचे ,बम्बासाठी लाकड आणायची,सोन्या ,दीदी,आणि भोल्याचा
आभ्यास घ्यायचा ,दादाच्या जेवणाच्या वेळा सांभाळायच्या,वडगावला शेताकडे लक्ष द्यायचे ,आणि विशेष करून दररोज माझ्या आणि दादाच्या जेवणाची
खातरदारी ठेवायची . कामावरून घरी जेवण्यासाठी यायला उशीर झाला कि 'आरे बाबा तू कधी येतो जेवायला ... जेवण तयार आहे, असा सांगणारा
तुझा फोन ठरलेला.आता असा तुझा फोन येत नाही रे आई...
किती किती काम करायची आई तू . माणसान दणकट रहाव ,जे समोर येईल ते खाव,अन्न हे पूर्ण ब्रम्ह असत,राग मनात धरू नये,जेवणावर राग काढू नये,
असे किती किती सल्ले द्यायचीस आई तू.जुनी ११ वी शिक्षण असल्याने तुझा अभ्यासही चांगला होता.मयुचा आणि माझा अभ्यास घेण्यापासून सोन्या ,दीदी,
आणि भोल्याचा अभ्यासही तू त्याच तडफेने घायची . आयुष्यात कधीही कुणाशीही भांडणे केली नाहीस.कुठल्याच गोष्टीची हाव केली नाहीस .नवीन साड्या ,
दागिने,चप्पल,कश्याचाच तुला मोह नव्हता.सणासुदीलाही तुला साड्या घे म्हणून दादा आग्रह करायचा पण खुप साड्या आहेत कशाला पाहिजे नव्या साड्या
हे तुझं उत्तर ठरलेल.आम्हाला बहिण नसल्याने तू आई असूनही आम्हाला दोन्ही मुलांना प्रत्येक रक्षाबंधनाला राख्या बांधून बहिणीची कमतरता भासू दिली नाहीस .
सुना आल्यावर त्यांना कधी म्हणजे कधीही सासू असल्याची जाणीव होऊ दिली नाहीस .म्हणूनच त्या दोघींनी तुला आई म्हणूनच हक मारली.
माझा मयू लय साधा भोळा असे म्हणत तुझी आईची माया नेहमीच त्याच्या भोवती फिरत राहिली .कडक दादाला समजून घेणारी तुझ्या शिवाय या जगात
दुसरी व्यक्ती नव्हती.म्हणूनच कणखर दादा धाय मोकलून आजही रडतोय रे आई .
१२ जून २०१२ ला तुझ्या कर्करोगाच्या आजरा बाबत पुण्याच्या मिलेट्री हॉस्पीटला कळाले आणि त्या दिवशी पासून आज पर्यत एकही दिवस अश्रुनी माझी पाठ सोडली
नाही.बुधराणी ला सगळे उपचार केले.डॉक्टरमंडळीच्या म्हणण्यानुसार तू पूर्ण पणे ठीक होणार अशी खात्री असताना १० ऑक्टोबर (२०१२ )पासून तुझी प्रकृती खूपच ढासळली.
त्यानंतर तुला बुधारानीत दाखल केले.आणि तुझा सहवास खूप दूरवरचा नाही याची कल्पना आम्हाला दिली गेली.तू मात्र या सर्व बाबीं पासून अनभिज्ञ होतीस
आणि सगळ घर धाय मोकलून रडत होत.मी तर जिवंत पणीच मेल्या सारखा झालो होतो.त्यानंतर रविवारी दादा,मयू ,मी,मनीषावाहिनी,मीनाक्षी,
सोन्या ,दीदी,आणि भोल्या तुला भेटायला आलो.दादा ला त्यावेळी अनावर झालेले अश्रू पाहून दादा खचल्याची जाणीव पहिल्यांदाच मला झाली.
दवाखान्यात तुझ्या कॉट जवळ आलेली पोर पाहून तुझ्या तोंडातून आलेले माझा सोनू भाऊ,दिदिताई ,आणि माझं भोळ हे शब्द आजही कानात जशेच्या तसे
घुमताहेत आई .तुला जेवण जात नव्हत.आणि तुला पाहून मला जेवन करण्याची इछाच राहिली नव्हती.मी हि दिवस दिवस भर उपाशीच असायचो रे आई.
तुझ्या बद्दल डॉक्टरमंडळींनी सांगितल्यावर मला तुझ्या कुशीत शिरून रडण्याची खूप इच्छा होती ,पण तू खचशील म्हणून मी तुझ्या समोर कधीच रडलो
नाही.पण तू जेंव्हा झोपलेली असायची तेंव्हा तुझा हात डोक्यावर घेवून मी खूप खूप रडलोय रे आई.तुला रुग्णालयात त्या चाकांच्या खुर्ची वरून फिरवताना
तुझ्या सोबत काढलेले फोटो व्हिडिओ पाहून डोळे केंव्हा थपथपतात ते कळतच नाही.
शनिवार पासून तू घरी येण्याची इच्छा व्यक्त केली होतीस.पण सोमवारी डिशचार्ज मिळणार होता.रविवारीही तू घरी जायचंय घरी जायचंय म्हणत होतीस.
मीही तुला सोमवारी कुठल्याही परिस्थितीत घरी घेवून जाण्याचे वचन दिले होते. मात्र रविवार २१ ऑक्टोबर २०१२ चा तो रविवार ,ढगाळ वातावरण आणि
कोंदट हवा त्या दिवशी तुझी प्रकृती खूपच ढासळली.सायंकाळी पाच नंतर तू डोळे अर्धे मिटले.काहीतरी भयंकर घडणार याची दादाला आणि मला कल्पना आली होती.
मात्र मन मानायला तयार नव्हते.ब्लड प्रेशर दाखविणाऱ्या मशीनने तुझ्या शरीरातील हालचाली आम्ही समजून घेत होतो.मो आठ ते दहा आणि दादाने दहा
ते बारा वाजे पर्यंत तुला थोपटले.रात्री बारा नंतर सोमवार सुरु झाला होता.रात्री साडे बारा वाजण्याला एक दोन मिनिटे शिल्लक असताना मी तुझ्या कॉट समोरून
तुझ्या जवळ आलो आणि तू अर्धे मिटलेले डोळे उघडलेस .काय रे आई म्हणत मी तुझ्या उशा पाशी आलो .तू माझा हात हातात घेतलास एक उलटी झाली
आणि अवघ्या काही क्षणात तू जगाचा निरोप घेतलास.ती अख्खी रात्र बुधारानीत कशी घालवली ते शब्दात सांगणे कठीण ...
दिलेल्या वचना प्रमाणे सोमवारी मी तुला सकाळी साडेदहा वाजता घरी घेवून आलो .मी वचन पाळले होते.पण तू वचन पाळले नव्हते रे आई.
तुझ्या जाण्यानंतर दोनच दिवसांनी दसरा होता.आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्या नंतर दादा ढसाढसा रडत होता.दादा ला समजवायला गेलो तर
आज दसरा आहे..रे ..किती लगबग असायची तुझ्या आईची असे दादा म्हणाला आणि आम्ही तिघेही बापलेक एक मेकांना मिठ्या मारून ढसाढसा
रडलो रे आई.दाराकडे पाहत बसतो वाटत तू अचानक समोर येशील .मी दररोज तुझ्या फोटोशी मनोमन बोलत बसतो.दादा आणि मयू हि मनोमन रडत कुढत
असतात रे आई .आता तू दिलेल्या आदर्शांवर चालायचं ठरवलंय ,तुला जी गोष्ट आवडत नव्हती ती करायची नाही ,आणि तुला जस आमच्या कडून वागण
अभिप्रत होत तसच वागायचं अस पक्क ठरवलंय रे आई.
कालच पुण्याला जावून आलो, पुण्याची तुझ्या आई आणि आप्पांना भेटलो.तुझे आई आप्पा हि खूप रडताहेत रे आई. येताना बुधराणी ला जावून आलो,
तू हॉस्पिटलच्या ज्या खिडकीत खुर्चीवर बसायचीस तेथे पाहून आलो,तू काही भेटली नाहीस ...पण मला खात्री आहे तू एक न एक दिवस नक्की
नक्की भेटशिल रे आई ....
तुझा आवड्या ......

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा