ऑनलाईन मुळे खरेदी विक्री व्यवहार प्रभावित


ऑनलाईन मुळे खरेदी विक्री व्यवहार प्रभावित 
सर्व्हरच्या समस्येने कर्मचारी आणि नागरिक त्रस्त 
खरेदी-विक्री व्यवहारांची होतेय निच्चांकी नोंद

चाकण:
 राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत तहसील, सबरजिस्ट्रार ऑफिस आणि उपाधीक्षक भूमिअभिलेख 
कार्यालयांची संगणकाशी जोडणी होत  आहे. जमीन, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार व फेरफार संगणकावरच होत आहेत.जिल्ह्यात 
सर्वच तहसील कार्यालयांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला  आहे. गेल्या पंधरवड्या पासून खेड तालुक्यातील जमीन, मालमत्ता खरेदी-विक्रीचे 
व्यवहार संगणकावरच होत आहेत. मात्र सर्व्हरच्या समस्येने ही प्रक्रिया तासंतास ठप्प होत असल्याने असे शेकडो व्यवहार प्रभावित झाले आहेत.

ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहार नोंदणी गेल्या आठवड्यापासून प्रभावित झाली आहे. प्रत्येक दिवशी विविध तांत्रिक कारणाने तर बऱ्याचदा ओं लाईन सर्व्हरच्या 
समस्येने सातत्याने  ही प्रक्रिया ठप्प होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे . त्यामुळे खेड तालुक्यातील व चाकण परिसरातील शेकडो व्यवहार प्रभावित होत आहेत .
सर्व्हरच्या समस्येमुळे चाकण येथील  सह. दुय्यम निबंधक  कार्यालयात मागील आठवड्यात खरेदी-विक्री व्यवहारांची निच्चांकी नोंद झाली . जिल्ह्यातील 
सर्व सह. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी ऑनलाईन होत आहे.चाकण परिसरात शासनाच्या विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर 
येथे जमिनी घेण्यासाठी बडे राजकारणी ,मोठ्या उद्योगपतींच्या उड्या पाहता येथील व्यवहारांची संख्या मोठी असून या यंत्रणेतील त्रुटी येथे अधिक स्पष्ट पणे जाणवत आहेत.
यामध्ये संपूर्ण नोंदी ऑनलाईन घेतल्या जातात. त्याची माहिती पुणे येथील सर्व्हरमध्ये सेव्ह केली जाते. ही यंत्रणा अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे 
गेल्या काही  दिवसांपासून ऑनलाईन काम ऑफ होत आहे. शुक्रवारी दुपार पासून सायंकाळ पर्यंत ऑनलाईन काम अतिशय धीम्या गतीने सुरु होते.
त्यानंतर आजचा शनिवार, रविवार, हे सुटीचे दिवस आले.असून सोमवारी एकच दिवस काम चालणार असल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. 
कधी स्थानिक कार्यालयांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत असून कधी सर्व्हरमध्ये समस्या निर्माण होते त्यामुळे हे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्पच 
अधिक राहत असल्याचा आरोप खेड बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ऍड .अतुल घुमटकर  यांच्या सह नागरिकांनी केला आहे.
  केंद्र शासनाने राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरची यंत्रणा पुरविली असून, देशपातळीवर 
एकच सर्व्हर राहणार आहे. प्रत्येक तालुक्यातील या तिन्ही कार्यालयांनी या उपक्रमाची पूर्ण माहिती देण्यात येणार आहे . संगणक जोडणीचेही काम झाल्यानंतर  
व्होरिजंटल आणि व्हर्टिकल यंत्रणेचे कामही पूर्ण करून , आतापर्यंतचे फेरफार, सातबारा संगणकावर अपडेट केले जाणार आहेत .जमिनीबाबत आणि मालमत्तेचे
सर्व व्यवहार या प्रणालीवरच करण्याचे  शासनाचे उद्दीष्ट यातील संभाव्य गैरप्रकारांना पायबंद घालणारे असणार आहेत,मात्र यातील त्रुटी मुळे वाया जाणारा मोठा 
कालावधी पाहता इलाजा पेक्षा औषध भयंकर अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 
  जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर पूर्वी तलाठय़ाला फेरफार घ्यावा लागत असे. हि यंत्रणा सक्षम पणे सुरु झाल्या नंतर तहसील आणि सबरजिस्ट्रार
कार्यालय तसेच भूमिअभिलेख कार्यालयातील संगणकावर त्याची नोंद होईल. संगणकातूनच तलाठय़ाला एसएमएस जाईल. शिवाय, या व्यवहाराबाबतच्या 
हरकती नोंदविण्यास पंधरा दिवसांची मुदत असेल. मुदतीत हरकती न आल्यास हा व्यवहार संगणक आपोआप ग्राह्य धरणार आहे . तलाठय़ाला वेगळा फेरफार घेण्याची 
गरज नाही. 
 तलाठय़ाला एसएमएस पोहोचल्यानंतर संबंधित पक्षकारास ते तामील काढतील. त्यानंतर हरकतींची मुदत असेल, असा हा आधुनिकीकरणाचा उपक्रम असणार 
आहे. जसा व्यवहार जमिनीचा आहे, तसाच मालमत्तेच्या खरेदी-विक्री व नोंदीचाही होणार आहे.याची लिंकिंग या तिन्ही कार्यालयांच्या संगणकांवर असेल. 
'नमुना 9'ची नोटीस, 'भाव नमुना 6'ची नोंद संगणकावर आपोआप होणार आहे.मात्र अद्याप नवीन आदेश प्राप्त झालेले नसून ते लवकरच प्राप्त होतील.
सध्या जुन्याच पद्धतीने काम सुरु असल्याचे चाकण चे मंडलाधिकारी श्री .मोराळे यांनी सांगितले.

                                                ...अविनाश दुधवडे चाकण ,९९२२४५७४७५ 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)