...अन कार्यक्रम स्थळाहून सटकले संयोजन


...अन कार्यक्रम स्थळाहून सटकले संयोजन 

लहान मुलं असो की मोठी माणसं सर्वांना कोणाचा ना कोणाचा धाक असावा लागतो. धाक असला की सर्व जण शहाण्यासारखे  वागतात आणि धाक नसला की मोकाट सुटतात.घरात लहान मुलांना मोठ्यांचा, शाळेतविदयार्थ्यांना शिक्षकांचा तर कार्यालयात कर्मचारयांनासाहेबांचा धाक असावा लागतो. काही नवरयांना त्यांच्याबायकांचा धाक असतो.मात्र राजकीय कार्यकर्त्यांना कोणाचाच धाक नसतो. आपल्या नेत्यांनाही अनेक  वेळा कार्यकर्ते जुमानत नाही. त्यामुळे आपल्या कडून केली जाणारी कामे चांगली आहेत का ,
या कामांचा लोकांना खरोखर उपयोग होईल का , अशा असंख्य लहान सहान बाबी दुर्लक्षून ही मंडळी वागत असल्याची स्थिती नागरिकांच्या समोर येत आहे. चाकण जवळील एका वाडीतही असाच प्रकार समोर आला आहे. कामाचे श्रेय स्वतः लाटण्यासाठी गावातील एका माजी सरपंचाने अचानक गावातील अपूर्णावस्थेत असलेल्या अर्धवट पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आयोजित केले .ही  टाकी अपूर्णावस्थेत असल्याने उद्घाटन कसे काय होते? याचा उलगडा या भागातील रहिवाशांनाही झाला नाही. आत्ता या अपूर्ण टाकीचे
उद्घाटन करून आपला काहीही फायदा होणार नाही  हा प्रकार म्हणजे श्रेय लाटण्याचा फंडा असल्याचे परिसरातील नागरिकांच्याही लक्षात आले आणि मोठा गाजावाजा करून आयोजित केलेल्या त्या उद्घाटन समारंभाकडे खुद्द नागरिकांनीच पाठ फिरविल्याने त्या पदाधिकाऱ्याची आणि त्याच्या तालावर नाचणाऱ्या पंचायतीतील ठराविक कारभाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. शिवाय कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यां समोर रिते रिते कार्यक्रम स्थळ पाहून घाईने कार्यक्रम पार पडून या माजी सरपंचांसह संयोजक आणि कार्यकर्तेही बाहेर सटकले.
                                                         ..................अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)