...तर विमानतळ खेड मधून हलवू : अजित पवार
सुवर्णयुग सहकारी बँकेच्या चाकण शाखेचे उद्घाटन
चाकण :
चाकण विमानतळासंदर्भात या भागातील लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे प्रशासन या सर्वांच्या सहकार्यातून खेड तालुक्यातच नवीन जागेची निश्चिती करून चांगला
निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे विमानतळाचा प्रश्न कुणीही ताणू नये या बाबत पुन्हा अडचणी निर्माण केल्या गेल्यास विमानतळ येथे होऊच देणार नाही
अशी गुगली या विमानतळासाठी सर्वात आग्रही असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.3)चाकण येथे टाकली .
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बँकेच्या चाकण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.खेड चे आमदार
दिलीपराव मोहिते पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.पुढे बोलताना पवार म्हणाले कि,या विमानतळासाठी अर्थसंकल्पात 250 कोटी व पुढील
अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येथील विमानतळाला जागेच्या मुद्द्यावर वेळोवेळी विरोधाची भूमिका
काही मंडळीं कडून घेतली गेली होती.आता पुन्हा नव्याने खेड सह लगतच्या भागातील लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढण्यात आला
आहे.यात कुणीही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये.पुण्यासह सोलापूर,सातारा,सांगली,नगर आदी भागासाठी हे सुसज्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ गरजेचे आहे.
कुणाला त्रास व्हावा ही आमची भूमिका नसून या भागाचा विकास हाच प्राधान्याने पहिला जात आहे.काही मंडळी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे
कैवारी असल्याचा दावा करीत स्वताची पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.व या विमानतळाला अडचणी आल्यास
हा प्रकल्प येथून हलविण्यात येईल व खाजगी जागांमध्ये उभा करण्यात येईल असे सांगितले.चाकण ,शिक्रापूर,न्हावरा,चौफुला या रस्त्याचे रखडलेले काम
लवकरच सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या भागातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांचा आढावा घेतला व सुवर्णयुग सहकारी
बँकेच्या कार्याचा गौरव केला.सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक अशोकराव गोडसे यांनी बँकेच्या पारदर्शी कारभाराबाबत आणि आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी भोसरीचे आमदार विलासराव लांडे ,जिल्हा राष्ट्रवादीचे प्रतापराव खांडेभराड ,माजी जिल्हा उपाध्यक्ष किरण मांजरे,तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,
चाकण शहराध्यक्ष संदीप परदेशी ,बाजार समितीचे सभापती विलास कातोरे,नाणेकर वाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई कुसाळकर ,सुरेश गोरे,काळूराम गोरे ,बँकेचे अध्यक्ष राहुल
चव्हाण,उपाध्यक्ष राजाराम घोडके,सर्व संचालक आणि चाकणकर मोठ्या संखेने उपस्थित होते.
म्हणूनच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा:
चाकण येथील कार्यक्रमात आल्या नंतर सुरुवातीलाच अजित पवार यांनी सांगितले कि,मी उपमुख्यमंत्रीपद सोडण्यामागे कुणाचाही दोष नाही.सदसदविवेकबुद्धी ला
स्मरूनच आपण राजीनाम दिला आहे.नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी,लोकांमध्ये जावून विकास कामे करता यावी हा यामागचा उद्देश होता.कुठल्याही
स्वरुपाची विकास कामे करताना ती कमीत कमी खर्चात व्हावी अशी आमचीही अपेक्षा असते.पाटबंधारे खाते सांभाळत असताना अनेक योजना राबविण्यात आल्या
त्यामधून नेमके किती क्षेत्र ओलीता खाली आले याचा व्हाईटपेपर (श्वेतपत्रिका ) काढण्यात यावी एवढीच आपली मागणी असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
--------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा