पवार यांना खेड तालुक्यातून जाणार 5 हजार शुभेच्छा संदेश
समाजातील सर्वच घटकांकडून घेणार संदेश
चाकण:वार्ताहर
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातून त्यांना 5 हजार शुभेच्छा संदेश पाठविण्याचा संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते
पाटील व तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी केला आहे. चाकण येथे आमदार दिलीप मोहिते यांचा शुभेच्छा संदेश घेवून या उपक्रमाला सुरवात झाली.
5 हजार लोकांचे संदेश पवार साहेबांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न सर्वच कार्यकर्त्यांनी करावा असा सल्ला आमदार मोहिते यांनी यावेळी दिला.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्री. पवार यांना वाढदिवसानिमित्त 12 लाख 12 हजार 12 शुभेच्छा संदेश
पाठविण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. विधानसभेतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्रात या उपक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर खेड
तालुक्यात आमदार मोहिते यांचा संदेश घेवून या उपक्रमाला सुरवात झाली आहे .
चाकण मध्ये सुरुवात झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हा खजिनदार प्रतापराव खांडेभराड, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,पंचायत समितीच्या
सभापती कल्पना गवारी , उपसभापती सुरेश शिंदे , जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे , तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भगवान मेदनकर,युवा मंचचे संस्थापक
डॉ.शैलेश मोहिते-पाटील,शहराध्यक्ष संदीप परदेशी,खराबवाडीच्या सरपंच योजना सोमवंशी,बाजीराव जाधव,साळूबाई मांजरे,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
या वेळी आमदार मोहिते म्हणाले कि,कृषीमंत्री शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त 12 लाख 12 हजार 12 शुभेच्छा संदेश देण्याच्या अद्वितीय आणि अनोख्या
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय आणि सर्वांगीण सहकार्य करावे. पवारांना स्वाक्षऱ्यांतून मानवंदना देणे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे.
तालुकाध्यक्ष भोसले यांनी सांगितले की ,केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचे संदेश न घेता समाजातील वेगवेगळ्या घटकांचा यामध्ये सहभाग असावा
या कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावचे सरपंच, पोलिसपाटील, वकील, डॉक्टर, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आदींचे संदेश घेण्यात येणार आहे.
: अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा