माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल
माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे आज (शुक्रवार) दुपारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे संसद स्थगित करण्यात आली आहे. गुजराल यांच्यावर उपचार करणारे डॉ. के. एल. सेहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्यामुळे आय. के. गुजराल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. आज दुपारी 3.31 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. डॉ. सेहगल यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम गुजराल यांच्यावर उपचार करीत होती. इंद्रकुमार गुजराल हे भारताचे १२ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१९ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. गुजराल यांच्यावर उपचार करणा-या एका डॉक्टरांने नाव प्र