भामा आसखेडचे पाणी पुण्याला देण्यास गावोगावी खो

भामा आसखेडचे पाणी पुण्याला देण्यास गावोगावी खो 
रासे येथे अधिकाऱ्यांशी झालेली ग्रामस्थांची झटापट 
रासे गावात ग्रामस्थांची अधिकाऱ्यांशी हमरीतुमरी
जलवाहिनीचे काम पाडले बंद
चाकण: 
  भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणे शहराला पाणी देण्यास चाकण परिसरातील गावांनीही आता विरोध सुरु केला आहे. परिसरातील गावकऱ्यांनी ठिकठिकाणी या बाबत आयोजित केलेल्या बैठकीत तीव्र विरोधाची भूमिका घेण्यात येत आहे. पुण्यात पाणी नेण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीचे कामही गावकऱ्यांकडून यावेळी बंद पाडण्यात येत आहे. रासे(ता.खेड,जि.पुणे) येथे आज (दि.४) अधिकाऱ्यांशी जोरदार हुज्जत घालीत या जलवाहिनीचे काम बंद पाडण्यात आले असून रासे ग्रामस्थांनी प्रथम गावाला पिण्यासाठी पाणी द्या मगच पाणी पुढे जावू देवू अशी भूमिका घेतली आहे.
 विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही पुढाकार घेत असल्याने या आंदोलनांनी भामा आसखेडचे पाणी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नेण्याच्या योजनेला विलंब लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी ज्या सत्ताधारी पक्षाचे नेते पाणी नेण्यासाठी आग्रही आहेत त्याच पक्षाचे तालुक्यातील कार्यकर्ते आंदोलनाला पाठबळ देण्याची भूमिका घेतल्याने पहिल्यांदाच तीव्र विरोधाची भूमिका घेतली असून या भागातील शेतकऱ्यांच्या असंतोषाचा लाव्हा या निमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षीय या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. आज जल वाहिनीचे काम बंद पडताना अधिकाऱ्यांशी स्थानिकांनी मोठा संघर्ष केला. यावेळी रासेचे माजी सरपंच रमेश शिंदेकडाची वाडीचे माउली कडबाळासाहेब कडप्रतिक मुंगसेमाउली गाडेअनिकेत केदारीकालिदास मुंगसे,मयूर मुंगसेहनुमंत कुटेगणेश झिंजूरकेसुर्यकांत मुंगसे आदी उपस्थित होते.
    पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातील २.६० टीएमसी पाणी पुणे शहराला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या'जेएनएनयुआरएमयोजनेतून निधीही मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या कामाने गती घेतली आहे. तसेच जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू झाले. परंतु जलवाहिनीच्या कामाला धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे. भामा आसखेड धरणामुळे सुमारे दीड हजार  शेतकऱ्यांचे विस्थापन झाले आहे . पुणे शहराला पाणी देण्यास गावकऱ्यांचा विरोध नाही. परंतु आधी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करूनच पाणी नेण्यात यावे अशी भूमिका असल्याचे प्रकल्पग्रस्त सांगत आहेत. रासे (ता.खेड) येथे गुरुवारी (दि.३) या बाबत बैठकही घेण्यात आली होती . पुनर्वसनासाठी रासे गावची जमीन हस्तांतरित करण्यात आली असून येथील जमिनीवर लाभक्षेत्राचे शिक्के पडले आहेत.  ज्याची जमीन त्यालाच पिण्यास पाणी नाहीहा कुठला न्यायअसा सवाल रासे ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला .   या वेळी जिल्हापरिषदेचे माजी गटनेते शरद बुट्टे रासेचे माजी सरपंच रमेश शिंदेवाल्मिक वाडेकर (गुरुजी) ,  बाळासाहेब डावरेबाळासाहेब वाडेकरशांताराम डावरेतुकाराम चौधरीसुरेश सुतारगुलाब शिंदेसूर्यकांत मुंगसेनामदेव मुंगसेअनिकेत केदारीराजू केदारीहनुमंत डावरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

..तर खरे लाभार्थी राहतील वंचित :
खेड तालुक्याला  "सुजलाम्‌-सुफलाम्‌करण्याची क्षमता असणाऱ्या  भामा आसखेड धरणातील पाण्याचा लाभ प्राधान्याने खेड तालुक्याला व गरज पडल्यास लगतच्या भागाला देणे न्याय आहे . मात्र भामा आसखेड धरणातील पाणी मोठ्या महानगरांना दिले तर या भागातील खऱ्या लाभार्थींना भविष्यात हे पाणीच मिळणे दुरापास्त होईल त्यामुळे प्रथम गावाला पाणी द्या मग खुशाल पाणी पुढे न्या अशी भूमिका रासे गावाचे शेतकरी मांडत आहेत.   

--------------------------------
 अविनाश दुधवडे,चाकण 
 Avinash Dudhawade, Chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)