चाकण एमआयडीसीतील ड्रीम प्लास्ट कारखान्याला भीषण आग
चाकण एमआयडीसीतील ड्रीम प्लास्ट कारखान्याला भीषण आग
सहा तास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश
संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी
कोट्यावधी रुपयांचे नुकसान
चाकण औद्योगिक क्षेत्रातील ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा.लि. (खराबवाडी, ता.खेड) या प्लास्टिकची खेळणी व वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आज (दि.६) भल्या सकाळी सहा वाजनेचे सुमारास भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत ही आग विझविण्यासाठी सहा अग्निबंब व पाच पाण्याच्या टॅँकरच्या सहाय्याने अग्निशामान दलाचे जवान प्रयत्न करीत होते. या दुर्घटनेत कारखान्याच्या इमारतीसह कच्चा-पक्का माल , यंत्र सामुग्री , कार्यालय, फर्निचर संपूर्णपणे आगीत स्वाहा झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतील नुकसानीचा हा आकडा कोट्यावधी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
दुपारी बारा नंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानां यश आल्यानंतर सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र धूपनाऱ्या प्लास्टिकच्या धुराचे लोळ उशिरा पर्यंत निघत होते. कारखान्याचा संपूर्ण मोल्डिंग शॉप ,तयार पक्का व कच्चा माल, यंत्रसामुग्री,व कंपनीचे संपूर्ण शेड या दुर्दैवी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . सकाळी सात वाजता पहिली पाळी सुरु होण्यापूर्वी हि आग लागली , रात्री कुणीही कामगार कामावर नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ यांच्या मालकीचे हे कंपनीचे शेड व इमारत असून त्यांनी इटलीच्या ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा.लि. या कंपनीस भाडेतत्वावर दिली होती. चाकण पोलिसांनी दुपार नंतर घटनास्थळावर पंचनामा सुरु केला असून पुढील तपास सुरु आहे.
----------------------------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
Avinash Dudhawade ,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा