ह्युंदाई कंपनीत वायआयटीचे कामबंद आंदोलन सुरु

ह्युंदाई कंपनीत वायआयटीचे कामबंद आंदोलन सुरु
उत्पादन प्रक्रिया प्रभावित कामगारांचे गंभीर आरोप
 ह्युंदाई कंपनीच्या प्रवेशद्वारावर वायआयटीच्या विद्यार्थ्यांनी सोमवार पासून काम बंद करून धरणे आंदोलन सुरु केले 
चाकण:  
चाकण औद्योगिक क्षेत्रातील खालुंब्रे (ता.खेड) हद्दीतील ह्युंदाई कन्स्ट्रक्‍शन इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील वायआयटीच्या ( यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी आज (दि.७) सकाळी सात वाजल्या पासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने कंपनीची उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे.  'शिका व कमवायोजनेच्या नावाखाली अतिशय कमी मोबदल्यात भरती करून शिक्षणा एवजी चक्क वेठबिगार पद्धतीने काम करून घेतले जात असून गुंडांची दहशत व दादागिरीने विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची कैफियत विद्यार्थी कामगारांनी मांडली आहे. या माध्यमातून कामगार कायद्याची पायमल्ली होत असूनही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा दावा विद्यार्थ्यासह कामगार संघटनांनी केला आहे. हे सर्व विद्यार्थी कामगार सध्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसले असून कंपनीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण कंपनी परिसरात तणाव पूर्ण वातावरण आहे. 
  यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारी 'शिका व कमवा योजनाकेवळ शोषण करणारी असल्याचा थेट आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. आज (दि.७) सकाळी या कंपनीच्या कामगारांनी कामावर हजर न होता कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले. या बाबत त्यांनी सांगितले किसंबंधित संस्थेने आमचे कडून प्रवेश शुल्क आकारून आम्हाला डीएमई करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात महिन्यातून केवळ चार तास घेतले जात असून कंपनीतील संपूर्ण उत्पादन आमचे कडून कायम कामगारांप्रमाणे करून घेतले जात आहे. त्यासाठी ७ हजार ५०० ते १० हजार ५०० एवढे स्टायपेंड (मानधन) देण्यात येत आहे. त्यामुळे शिकविणे तर दूरच राहीले. परंतु,श्रमाच्या मोबदल्यात पुरेसे वेतनही दिले जात नाहीत्यामुळे एकप्रकारे पिळवणूक होत असल्याची भावना शिकाऊ विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. संबंधिताना कंपनीत प्रत्यक्ष उत्पादन करून घेत असताना कुठल्याही सोई सुविधा देण्यात येत नाहीत. असुरक्षित रित्या काम करणाऱ्या या विद्यार्थी कामगारांचा विमाही काढण्यात आलेला नाही.  या बाबत दोन दिवसांपूर्वी सुमारे ३०० विद्यार्थी कामगारांनी बैठक घेतली असता तिघांना दमबाजी करून काढून टाकण्यात आल्याचेही कामगारांनी सांगितले. या बाबत कामगारांमध्ये मोठा असंतोष खदखदत होता. अखेर सर्व विद्यार्थ्यांनी आज सकाळ पासून काम बंद केले असून त्याचा थेट परिणाम कंपनीच्या उत्पादकतेवर झाला आहे.    
  कमवा शिका योजनेच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या होत असलेली भरती थांबवाअशी आग्रही मागणी श्रमिक एकता महासंघाने केली आहे. त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष किशोर ढोकले यांच्यासह कार्याध्यक्ष दिलीप पवारकेशव घोळवे दतात्रेय येळवंडे अविनाश वाडेकर,आदींनी यांनी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही योजना शिकाऊ विद्यार्थी आणि कामगार चळवळीलाही अत्यंत धोकादायक असल्याचे नमूद करून त्याविरोधात आवाज उठविणार  असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीचे व वायआयटी अधिकारी म्हणतात... :
 ह्युंदाई कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी अजित ठाकूर यांनी सांगितले कि,कामगारांची कुठल्याही प्रकारे पिळवणूक होत नाही. त्यांच्याकडून करण्यात येणारे आरोप धादांत खोटे असून विद्यार्थांना शिक्षणापेक्षा पैशांमध्ये अधिक स्वारस्य असल्याचे प्रकार समोर येत आहेत. विद्यार्थांच्या शैक्षणिक हितासाठी आवश्यक असलेले निर्णय आमच्याकडून घेतले जात आहेत. संबधितांची दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न होत असून सकाळी आंदोलन करणारे काही विद्यार्थी पुन्हा कंपनीत परतले असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. तर वायआयटीचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले किवायआयटी च्या माध्यमातून सुमारे १६० कंपन्यांमध्ये विद्यार्थी शिका व कमवा योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. नुकतीच ३५० मुले इंजिनिअर म्हणून बाहेर पडली आहेत. मात्र हुंदाई कंपनीतील संबधित विद्यार्थी कायम कामगारांप्रमाणे काम करीत असले तरी त्यांना त्याचा पूर्ण मोबदला मिळत आहे. मात्र संबंधित विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवीत असून त्यांना या बाबत वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत.  विद्यार्थ्यांनी केलेले सर्व आरोपही कुलकर्णी यांनी  फेटाळून लावले आहेत.

कंत्राटी कामगार म्हणून वापर ? :
कमवा शिकायोजनेखाली अनेक राज्याच्या विविध भागातून संबंधित संस्थेच्या माध्यमातून पुण्याला गेल्या चार वर्षांपासून आणण्यात येत आहेत. त्यातील अनेक मुलांनी वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुन्हा घरचा धरला होता . हे सर्व कामगार प्रामुख्याने राज्याच्या मागासलेल्या भागातून तसेच परराज्यांतून आलेले आहेत . त्यामुळे ते कामगार कायद्याबाबत अनभिज्ञ असतात. त्याचा गैरफायदा काही राजकीय व्यक्तीसंघटना आणि कंपन्या घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ही योजना शिका व कमवा अशी मर्यादित राहिली नसूनकारखानदारांनी कंत्राटी कामगारांची जागा या विद्यार्थ्यांच्या रूपाने भरून काढली असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे. 


अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)