माशीने ठरविलेल्या उपसरपंच निवडीची जिल्हा प्रशासन करणार चौकशी

माशीने ठरविलेल्या उपसरपंच निवडीची जिल्हा प्रशासन करणार चौकशी
अखेर उपसरपंच निवडीत माशी शिंकली

चाकण:
 भारत हा सर्वांत मोठा लोकशाही देश आहे व इथे प्रत्येकाच्याच मताला किंमत आहेउघड्या अन्नपदार्थांवर घोंगावणाऱ्या माशीलाही. तिचा राजकारणातही 'प्रवेशकरून घेण्याची किमया खेड तालुक्यातील (जि.पुणे) सातकरस्थळ गावच्या कारभार्यांनी करून दाखविली.  व उपसरपंचांची निवड माशीच्या हाती सोपविली.
माशी ज्या चिट्ठीवर प्रथम बसेल त्यांना उपसरपंच होण्याचा मान मिळेल असे ठरले व चक्क माशी ज्या चिट्ठीवर बसली त्यांना उपसरपंच करण्यात आले. मात्र लोकशाहीला तिलांजली देत झालेल्या या प्रकारावर आता  कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून ही निवड प्रक्रिया अवैध असल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे  अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
 या बाबतचे वृत्त असे किपुणे जिल्ह्यातील सातकरस्थळ (ता.खेड) गावच्या उपसरपंचांचा कालावधी संपला व नव्या उपसरपंचांची निवड करण्याची गरज निर्माण झाली. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरपंचउपसरपंच ही पदं रोटेशन पद्धतीनं निवडली जातात व पहिल्याचा कार्यकाळ संपल्यानंतर इच्छुकांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक उचलण्याची आदर्श पद्धतीही अस्तित्वात आहे. सातकरस्थळच्या गावकऱ्यांनी मात्र चिठ्ठी उचलायची संधी एका माशीला देण्याचा निर्णय घेतला . आपल्या गावात माश्‍यांचंच साम्राज्य आहे आणि दर सेकंदाला तोंडावर बसणारी माशी हा निर्णयही अगदी फटक्‍यात घेऊन टाकणार याची त्यांना खात्री होती. टेबलावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि माशी ज्या चिठ्ठीवर आधी बसेल तो विजयी असे ठरले. निर्णय जाहीर व्हायला अवकाशएक माशी तिच्या आवडत्या चिठ्ठीवर येऊन बसली आणि त्यावर नाव असलेली महिला संजीवनी थिगळे उपसरपंच झाल्या .  माशीने दिलेल्या कौला नंतर त्यांनी आपला पदभारही सांभाळला इलेक्ट्रॉनिक माध्यमांना बोलावून हा अजब प्रकार चक्क कारभार्यांनीच बढाया मारत सांगितला. मात्र आता ही निवड प्रक्रियाच अवैध असल्याचा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे.
दरम्यान लोकशाहीत माश्‍यांचा शिरकाव कशासाठी  अशी तिखट प्रतिक्रिया सर्वच स्तरातूनया नंतर व्यक्त केली आहे.  

अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)