ऐश्वर्या आयकॉन मॉल सर्वोत्तम : सई ताम्हणकर

ऐश्वर्या आयकॉन मॉल सर्वोत्तम : सई ताम्हणकर
राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडूनही कौतुक   
चाकण मधील ऐश्वर्या आयकॉन मॉल मधील अनेक नामांकित ब्रँडचा शुभारंभ अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आला.  

चाकण: 
   गेल्या अनेक दिवसांपासून सर्व चाकणकरांच्या पसंतीस उतरलेल्या चाकण  मधील पहिल्या एकमेव व सर्वात मोठ्या 'ऐश्वर्या आयकॉन मॉल'मध्ये  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड चे सर्व प्रकारचे उत्कृष्ट कपडे उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज (दि.२९) सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते व राज्याचे पणन व महसूल राज्यमंत्री सुरेश धस खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील ,या मॉलचे संचालक व राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांसह चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 
   चाकण मधील ऐश्वर्या आयकॉन शॉपिंग मॉल’ या सर्वांत मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये चाकणकर नागरिकांच्या आग्रहानंतर हे सर्व नामांकित ब्रँड एकाच छता खाली उपलब्ध करून देण्यात आलेले असून खुद्द सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनीही येथे उपलब्ध असलेल्या सर्व ब्रँडची माहिती घेत या मॉलचे कौतुक केले. चाकणच्या या मॉल मध्ये अनेक रंगात,असंख्य व्हरायटी ब्रँड उपलब्ध असल्यामुळे चॉइसला प्रथमच भरपूर वाव करून देण्यात आल्याचे अभिनेत्री ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.  राज्यमंत्री सुरेश धस यांनी या मॉल मध्ये फिरून माहिती घेतली व शहरीकरणामुळे विस्तारत्या चाकण आणि संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यासाठी हा मॉल सर्वच समाजघटकांसाठी फारच उपयुक्त असल्याचे यावेळी सांगितले. पुणे- नाशिक महामार्गावर आंबेठाणचौका लगतच्या या सुसज्ज  मॉलमध्ये विविध किंमतीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड चे सर्व प्रकारचे उत्कृष्ट कपडे महिलांसाठी उत्तमोत्तम दर्जाच्या साड्या,बनारसी,सुरतच्या साड्यांपासून विविध राज्यातील प्रसिद्ध साड्या व कलात्मक दागिने (आर्ट फ़िशिअल ज्वेलरी) ,चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या मयूर डायनिंग हॉल या हॉटेलचाही समावेश असून  मुलांसाठी गेमिंग झोनचीतीनशे हून अधिक खाद्य पदार्थांच्या फूड कोर्टची वेगळी व्यवस्थाही आहेपुण्यातील मॉल मध्ये उपलब्ध नसणारे बहुतांश सर्वच ब्रँड येथे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात असल्याचे व आकर्षक सवलत योजना जाहीर करण्यात आल्याचे या मॉलचे संचालक व राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अशोक भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमास परिसरातील गावांचे सरपंच,राजगुरुनगर बँकेचे संचालक, जिल्हापरिषद सदस्य, राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्तेव चाकणकर नागरिक फार मोठ्या संखेने उपस्थित होते.                                                                                                  
--------------------

अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)