अंधश्रध्देला गाडायला विज्ञानवादी दृष्टीकोन हवा

अंधश्रध्देला गाडायला विज्ञानवादी दृष्टीकोन हवा
मुक्ता दाभोलकर यांचे मत  
 Displaying chakan mukta dabholar.jpg
चाकण:
 बुरसटलेल्या अंधश्रध्देला गाडायचे असेल तर त्यावर विवेकवाद आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच परिणामकारक उपाय ठरू शकेलअसे मत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यां मुक्ता दाभोलकर यांनी चाकण (ता.खेड,जि.पुणे ) येथे बोलताना मांडले .
  चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन समिती चाकण व वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित परिसंवादात महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर त्या बोलत होत्या . पुढे  अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये महिलांचे शोषण अधिक होत असल्याच्या मुद्यावर 'अंनिस'च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगितलेकी आर्थिक आणि कौटुंबिक अशा दोन स्तरावर महिलांचे तथाकथित बुवाभगतांकडून शोषण केले जात असल्याचे दिसून आले आहे. यात पैशांचा पाऊस पाडतोपैसे दुप्पट करून देतो किंवा कुंडली दोषमुलाचा जन्मसासरच्या व्यक्ती किंवा पतीचे सुखअशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला अंधश्रद्धेत अडकत असल्याचे दिसून आले आहे. मुळात स्त्रीचा स्वत:च्या आयुष्यावर ताबा नसतो. तिच्याकडे स्वत:ची अशी साधनसंपत्ती नसतेकुटुंबात तुलनेने दुय्यम स्थान असते. अशा अगतिकतेच्या परिस्थितीत ती भोंदूबाबांच्या जाळ्यात सहज सापडते. जितकी तिची अ‌गतिकता अधिक तितके महिलाचे बळी जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही परखड मत त्यांनी यावेळी मांडले .यावेळी अनिसंचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, ,भास्कर सदाफळे ,डॉ.नितीन शिंदे, , प्रा.अतुल सावाखंडे,  मनोहर शेवकरीप्रतापराव खांडेभराडसुरेशभाऊ गोरे संजय राऊत ,अनिसंचे चाकणचे अध्यक्ष धृव कानपिळे ,ज्योती बनकरअमर शिंदे,महेश शेवकरीरामदास जाधवमहेश घाडगे प्रमोद बचुटेधनंजय शेवकरी राजेंद्र जगनाडे पल्लवी सवाखंडे रमाताई हुलावळे छाया परदेशी आदींसह चाकणकर नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

महिलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे :
समाजात अनेक अनिष्ट प्रथा असून त्यामुळे महिलांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवाया भावनेमुळे सासरी सुनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मानसिक छळापासून मुक्तता मिळावी म्हणून महिला अंधश्रद्धेच्या मार्गाला लागतात. आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याची क्षमता आपल्यातच असल्याची जाणीव मुली आणि महिलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी मुलींनी अधिक शिक्षण घेतलेपाहिजे,  असे स्पष्ट मत 'अंनिस'च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी मांडले.
----------
अविनाश दुधवडे,चाकण .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)