भामा आसखेड धरणग्रस्तांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा

 भामा आसखेड धरणग्रस्तांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा
खेड तहसील कार्यालयावर मोर्चा ; सर्वपक्षीय सहभागी
चाकण:
 खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्त व धरणाचे लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्‍न गेल्या २० वर्षांपासून जैसे थे असताना शासनाने व राज्यकर्त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह उपनगरांना धरणातून पाणी देण्यासाठी निर्णय घेतल्याने धरणग्रस्त शेतकरी पेटून असून आज  (दि..८) खेड तहसील कचेरीवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता .  पाणी नेण्यासाठी टाकण्यात येत आलेल्या जलवाहिनीचे कामाला प्रखर विरोध गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला होता त्यामुळे या मोर्चात कोहिंडेवाघूअनावळेटेकवडीवहागाव,देशमुखवाडीवाकी तर्फ़ेवाडाकरंजविहिरेरौंधळवाडीआसखेडशेलूकोरेगाव आदी विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
   न्याय हक्कांसाठी आता संयमी शेतकरी पेटून उठल्याने शासनविरोधी वातावरण आहेयाचा आता आणखी मोठा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत. खेडच्या पश्‍चिम भागातील करंजविहिरे येथे भामा नदीवर बांधण्यात आलेले भामा आसखेड धरण मातीचे आहे. धरण बांधण्याचा मुळ मुद्दा कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणणे व पिण्याच्या पाण्यासाठी होता. जलसाठयासाठी एकूण जवळपास २०९९  हेक्टर जमीन संपादीत झाल्याने त्यामध्ये एकूण १४१४ खातेदार शेतकरी बंधिस्त झाले. वाकी अनावळेपराळे ही गावे पूर्ण बाधित झाली. रौंधळवाडीशिवेपाईटवाघूकासारी ही गावे अंशतः बाधित झाली. या मोर्चाच्या वेळी संतप्त भावना व्यक्त करताना धरण ग्रस्त शेतकरी म्हणाले कि,  धरणासाठी आमच्या जमिनी घेतल्या आणि धरण बांधले. आमच्या जमिनी घेतल्या आणि धरण बांधले. आमच्या जमिनीला पाणी नाही. पाणी मात्र कंपन्यांना आणि आता पुणे व पिंपरी चिचंवड शहराला पाणी नेण्याचे नियोजन झाले. हा अन्याय आता सहन करायचानाहीम्हणुन धरणग्रस्त आक्रमक बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांना आणि लाभक्षेत्रांतील शेतकर्‍यांना न्यायासाठी शासनाबरोबर संघर्ष करावा लागत आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरदराव बुट्टे पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरेकालिदास वाडेकरविजय डोळस सोमनाथ दौंडकर आदींसह सर्वपक्षीय नेते ,शेतकरी व प्रकल्पग्रस्त मोठ्या संखेने उपस्थित होते. 












अविनाश दुधवडे,चाकण, ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)