दरोड्याच्या तयारीतील टोळी बोरदरा येथे जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी बोरदरा येथे जेरबंद
नागरिकांची सतर्कता
चाकण:  
बोरदरा (ता.खेड) येथे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या
 स्वाधीन केलेली दरोड्याच्या तयारील टोळी . 
 
 चाकण एमआयडीसीतील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या उत्तरप्रदेशच्या तिघांसह पाच जणांच्या टोळीला बोरदरा (ता.खेड,जि.पुणे) येथील नागरिकांनी सोमवारी (दि.७) पाहटे पकडून चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले.  त्यांच्याकडून एक लोखंडी रॉड मिरचीपूड,  नायलॉन दोऱ्या,घातक शस्त्रांसह एक मालवाहू टेम्पो व सुमो जीप  असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांच्या हाती लागलेली ही आणखी एक मोठी टोळी असून मागील काही दिवसांपूर्वी अशीच एक उत्तर प्रदेश मधील टोळी या भागात ताब्यात घेण्यात आली होती . 
  संजय रामभाऊ भालसिंग रमेश रामभाऊ भालसिंग (दोघेही रा. भालसिंग वाडी कोळीये,ता,खेड )  साकीर आली सिद्दिकीतेहीत मकसूद अन्सारी ,राजेश बैद्यनाथ चौरासिया (  (सर्व सध्या रा. वासुलीफाटा ता.खेड मुळ  रा. उत्तरप्रदेश ) अशी या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.  बोरदरा (ता.खेड ) येथे संशयास्पदरित्या यातील पाच जन दरोड्याच्या तयारीत असताना गावातील नागरिकांना दिसले . त्यानंतर गावातील बाबाजी पडवळ,दतात्रेय पडवळ,संतोष पडवळरमेश पडवळताज अल्लाउद्दीन शेखमारुती पडवळ,तुकाराम पडवळपरशुराम पडवळ आदींसह नागरिकांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलसांनी त्यांच्याकडून लोखंडी रॉड मिरचीपूडनायलॉन दोऱ्या एक मालवाहू टेम्पो व सुमो जीप  असा ऐवज हस्तगत केला असून त्यांच्याकडून या भागात झालेल्या अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. यामध्ये पकडण्यात आलेले भालसिंग हे दोन भाऊ खेड तालुक्यातील कोळीये गावच्या माजी सरपंचांचे पुतणे आहेत. या बाबत मारुती अमृतर पडवळ ( रा.बोरदरा ता.खेड )  यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहे.
--------------



अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)