खेड तालुक्यातील विमानतळ विरोधी आंदोलकांत उभी फुट

खेड तालुक्यातील विमानतळ विरोधी आंदोलकांत उभी फुट

आंदोलन क्षीण करण्याचे प्रयत्न यशस्वी ?  

चाकण : अविनाश दुधवडे
  खेड तालुक्यातील (जि.पुणे) विशेष आर्थिक क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या विमानतळास दावडी आणि निमगाव येथील सेझबाधितांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे विमानतळाविरोधी आंदोलनाची धारच बोथट झाल्याची स्थिती निर्माण झाली असून दोन गावांतील आंदोलक एकाकी पडले आहेत. काही गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या पाठींब्याने  विमानतळ होण्याच्या दृष्टीने पहिले सकारात्मक पाऊल पडल्याची व्यापार उद्योग-व्यापार जगतात चर्चा असून विमानतळाचा सर्वात मोठा फटका बसणाऱ्या कनेरसर व केंदूर गावाचे शेतकरी या आंदोलनात एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. विस्थापित होणाऱ्या गावातील अनेक जणांनी दोनच दिवसांपूर्वी सेझ च्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्योगपती व सेझचे निर्माते बाबासाहेब कल्याणी यांना पत्र देऊन १५ टक्के परतावा मिळावा आणि विमानतळ होऊ नये,अशी मागणी केली होती.  
    खेड तालुक्यात गेली १५ वर्षे विमानतळ करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी तीन वेळा विमानतळाची जागा बदलण्यात आली. सुरुवातीला चाकणनंतर शिरोली-चांदूस परिसर नव्याने निवडण्यात आला होता. तेथे विरोध होऊ  लागल्याने नवीनच कोये,धामणे,पाईट,रौंधळवाडी व आसखेड बुद्रुक परिसरातील जागेवर एमएडीसी आणि शासनाचे  एकमत झाल्याचे सांगण्यात येत होते अखेरीस उद्योजकांकडून  तिसरा प्रस्ताव सरकारला देण्यात आला .व  सेझमध्ये प्रस्तावित असलेली ही चौथी जागा निश्चीत करण्यात आली. येथेही सेझबाधितांचा विमानतळास विरोध होता. विमानतळविरोधी आंदोलनेही झाली. या प्रकल्पासाठी मोठया प्रमाणात जमिनी संपादित होण्याच्या भीतीने संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पास तीव्र विरोध सुरु केला होता . माजी पंतप्रधान व्ही पी सिंगमेधाताई पाटकरप्रा.एन डी पाटीलउल्का महाजनमाजी न्या बी जी कोळसेपाटीलमारुती भापकर आदींनी शेतकऱ्यांच्या बाजूने सक्रिय सहभाग घेतल्यामुळे सेझच्या विरोधात झालेल्या आंदोलनांनी खेड तालुका अक्षरशः ढवळून निघालेला होता व आंदोलनाला मोठी उंची लाभली होती. आंदोलन क्षीण करण्यासाठी व आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचेही प्रयत्न करण्यात आले . नंतर हे आंदोलन काहीसे क्षीण होत गेले.
  सेझमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना १५ टक्के जमिनीचा परतावा मिळणार होता. त्या परताव्याऐवजी खेड डेव्हलपर्स कंपनी स्थापन करून परताव्याच्या किमतीचे भाग शेतकऱ्यांना देण्याचे त्या वेळच्या पॅकेजनुसार ठरले. पणगेली सात वर्षे या कंपनीचा काहीही फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ही कंपनी बरखास्त करून १५ टक्के जमीन मिळावीअसा आग्रह धरला होता. तसेच विमानतळाला विरोध असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते.
   खेड डेव्हलपर्स कंपनीमध्ये भारत फोर्ज कंपनीचे ५ आणि शेतकऱ्यांचे ४ प्रतिनिधी संचालक घेण्यात आले होते. सेझमध्ये जमिनी जात असलेल्या दावडीनिमगावकेंदूर,कनेरसर या गावांतून प्रत्येकी एक संचालक घेण्यात आला होता. त्यापैकी केंदूर गावाने आपला प्रतिनिधीच दिला नव्हता. दावडीचे चंद्रकांत भालेकरनिमगावचे संतोष शिंदेकनेरसरचे रमेश दौंडकर हे केडीएलचे संचालक आहेत. त्यांपैकी दावडी आणि निमगावच्या संचालकांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना यांना पत्र देऊन या दोन गावच्या भागधारकांची १५ टक्के जमीन विमानतळासाठी घेण्यास हरकत नाहीअसे सांगितले. त्याबदल्यात आम्हाला योग्य आर्थिक मोबदला आणि इतर सवलती मिळाव्यात,असेही लिहिले. यासंदर्भात शेतकऱ्यांना लेखी हमी द्यावीअशी विनंती केली आहे.या घडामोडींमुळे सेझमध्ये विमानतळ होण्यास वेग मिळाला आहे. त्याबरोबरच सेझबाधित शेतकऱ्यांमध्ये फूट पडल्याचेही दिसत असून शेतकऱ्यांच्या बाजूने 'सेझ'च्या विरोधात भांडणारी काही मंडळीनी कंपनीने दाखविलेल्या आर्थिक लालसेला बळी पडून तडजोडीची भूमिका स्वीकारल्याची यात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

१२६० हेक्टरवर विमानतळ उभारणीचा प्रस्ताव :
शासनाच्या सध्याच्या प्रयोजानानुसार खेडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भारत फोर्ज कंपनीचे "विशेष आर्थिक क्षेत्र' (एसईझेड) तसेच निमगावदावडीकेंदूर व कन्हेरसर या गावांतील १२६० हेक्टर (३१५० एकर) जमिनीवर विमानतळ उभारणीचा प्रस्ताव असून तेथे जमिनी संपादन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येथे  दोन स्वतंत्र धावपट्ट्यांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास विमान प्राधिकरणाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी खेड सेझची ८१० हेक्टर जमीन तसेच निमगावमधील सात हेक्टरदावडी गावची १७९ हेक्टर,केंदूरमधील ८२ हेक्टर व कन्हेरसर गावामधील १८२ हेक्टर जमीन संपादन प्रस्तावित आहे . या विमानतळासाठी नागुडसर वस्तीमाशेरे वस्तीदरा वस्तीकळमजाईची ठाकर वस्तीगव्हाणे वस्तीजाधवदराहजारे वस्तीजैद वस्तीवडाची वाडी सर्वाधिक प्रभावित होणार आहे त्यामुळे आम्ही कदापीही विरोधाची धार कमी होऊ देणार नसल्याचे विमानतळ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे व सर्वाधिक फटका बसणाऱ्या  भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
---------------------------------------
Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)