...म्हणून आमचे बुरे दिन ; राज्यमंत्री सुरेश धस

...म्हणून आमचे बुरे दिन राज्यमंत्री सुरेश धस
चाकण (ता.खेड) येथील व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना पणन राज्य मंत्री सुरेश धस व अन्य मान्यवर   

चाकण:वार्ताहर-
आम्ही केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरलो सोशल मिडीयाचा प्रभावी वापर आम्ही आणि आमचे कार्यकर्ते करू शकलो नाही म्हणूनच आमचे बुरे दिन आले अशी स्पष्ट कबुली राज्याचे पणन व महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी आज (दि.२९)  चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथे दिली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये आयोजित विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी वरील स्पष्टोक्ती दिली.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप मोहिते होते. पुढे बोलताना धस म्हणाले किराज्य शासनाचे धोरण हे शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेले निर्णय आम्ही घेत अहोत. शेतकरी जगाला पाहिजे या भूमिकेवर आमचे राज्य सरकार ठाम आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे . ग्राहकांवरही त्याचा अतिरिक्त भार पडू नये याचीही काळजी घेताना आम्हाला शेतकरी आणि खरेदीदार सामान्य नागरिक या दोघांच्याही बाजू पाहाव्या लागतात. शासनाने मागील काळात अनेक लोकहिताचे कल्याणकारी निर्णय घेतले मात्र त्याबाबत माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. माध्यमांनी केंद्र शासनातील अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरले. त्यातच भाजप कडून 'अच्छे दिनचा प्रचंड मारा करण्यात आला आणि आमचे बुरे दिन आले.  मात्र पुढील विधानसभा निवडणुकांपूर्वी मात्र हे चित्र बदलल्या शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार दिलीप मोहिते यांनी खेड बाजार समितीने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास कातरेउपसभापती कैलास गाळव माजी सभापती हिरामण सातकर ,रमेश राळेमाजी उपसभापती दतात्रेय भेगडे, रामदास ठाकूरचाकणचे सरपंच दतात्रेय बिरदवडेसुरेखा मोहितेकल्पना गवारीशांताराम भोसलेसंदीप परदेशीराम गोरेअमृत शेवकरीरेवणनाथ थिगळेबाळासाहेब गोरेरामदास मेदनकर, अशोक बिरदवडे, विजय खळदकर , जमीर काझी,  आदींसह नागरिक उपस्थित होते.

लोकांनी मेळच लागू दिला नाही :
या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कशाचाच मेळ लागू दिला नाही. सर्वच लोकसभा मतदार संघांमध्ये हाच अनुभव आला. जो मतदार हातात हात देण्यासाठी पुढे येत होता त्याने मतदान मात्र विरोधात केल्याचा विपर्यात अनुभव या निवडणुकीत आला . म्हणूनच मंत्री असतानाही मलाही लोकांनी १ लाख ३५ हजारांच्या मोठ्या फरकाने झोपविले . कशाततरी समाधान मानायचे म्हणून आम्ही आमच्यातील कोण कुणापेक्षा किती कमी मतांनी पडला यावर सध्या आकडेमोड करून समाधान मानीत आहोत असे खुद्द राज्यमंत्री सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत सांगितल्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला .
लोका सांगे ब्रह्मज्ञान :
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारातील व्यापारी गाळे व प्रशासकीय इमारतीचे  उद्घाटन राज्यमंत्री सुरेश धस  यांच्या हस्ते बाजार समितीच्या वतीने करवून घेण्यात आले . हे  बांधकाम अवैध असल्याचा आरोप होत असून  मंत्र्यांनी  अवैध कामाचे उद्घाटन करून कायदे पायदळी तुडविल्याचा आरोप शेतकरी व स्थानिकांनी केला आहे . मंत्र्यांची कृती म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून .मंत्र्यांनाच कायदेशीर व बेकायदेशीर यातला फरक कळत नसेल तर सर्वसामान्यांचे कायअसा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. 
--------


अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)