अंधश्रध्देला गाडायला विज्ञानवादी दृष्टीकोन हवा
अंधश्रध्देला गाडायला विज्ञानवादी दृष्टीकोन हवा मुक्ता दाभोलकर यांचे मत चाकण: बुरसटलेल्या अंधश्रध्देला गाडायचे असेल तर त्यावर विवेकवाद आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच परिणामकारक उपाय ठरू शकेल , असे मत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यां मुक्ता दाभोलकर यांनी चाकण (ता.खेड ,जि.पुणे ) येथे बोलताना मांडले . चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन समिती चाकण व वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित परिसंवादात ' महिला आणि अंधश्रद्धा ' या विषयावर त्या बोलत होत्या . पुढे अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये महिलांचे शोषण अधिक होत असल्याच्या मुद्यावर ' अंनिस ' च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले , की आर्थिक आणि कौटुंबिक अशा दोन स्तरावर महिलांचे तथाकथित बुवा , भगतांकडून शोषण केले जात असल्याचे दिसून आले आहे. यात पैशांचा पाऊस पाडतो , पैसे दुप्पट करून देतो किंवा कुंडली दोष , मुलाचा जन्म , सासरच्या व्यक्ती किंवा पतीचे सुख , अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला अंधश्रद्धेत अडकत असल्याचे दिसून आले आहे. मुळात स्त्रीचा स्वत:च्या आयुष