माझी अदा खास ..अण्णा दिसतात झकास ...
---------------
राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील मंडळी यांच्यातील सलगी नवी नाही. दहीहंडी उत्सवासाठी अधिकाधिक गर्दी खेचण्याकरिता दहीहंडीचे आयोजक विविध शक्कल
लढवू लागले आहेत. भरघोस बक्षिसाच्या आकर्षणाबरोबरच आता विद्यार्थी, युवक आणि विविध गोविंदा पथकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आकर्षक आणि मनोरंजन
कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.
बॉलिवूडबरोबरच मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार विशेषतः तारका कार्यक्रमाला आणण्याची चढाओढ शहरां प्रमाणेच निमशहरी भागातही विविध ठिकाणी
पहावयास मिळते. अशा अभिनेत्रीच्या अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडणे आणि आपल्याच कार्यक्रमात येण्यासाठी भाग पाडणे हा खरा उद्देश असतो. मात्र चाकण मधील
एका दहीहंडी कार्यक्रमासाठी आलेल्या एका वाहिनीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क लोकप्रतिनिधींच्याच सौंदर्याची भुरळ पडली आणि तिने जाहीर पणे या बाबत भाष्य केले आणि
आधीच परकीयांसह स्वकीयांच्या टीका टीपण्यांचे लक्ष असणाऱ्या लोकप्रतिनिधींची पंचाईत करून टाकली.
वयाची फिफ्टी प्लस गाठूनही फिटनेस आणि राहानिमानाबाबत सतर्क असणाऱ्या लोकप्रतिनिधीं बाबत या अभिनेत्रीने बोलण्याच्या ओघात चक्क ध्वनिक्षेपकावरून आपले
अण्णा छान ,सुंदर दिसतात कि नाही ? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारीत अण्णांनी राजकारणा पेक्षा चित्रपट सृष्टीतच असायला हवे होते असा लाडीक सल्ला दिला.
अभिनेत्रीच्या या  स्तुती सुमनांनी प्रेक्षकांचे डोळे तर विस्फारले गेलेच पण खुद्द लोकप्रतिनिधींची पंचाईत झाली.त्यावर  हातातील माईक सावरीत मी अभिनेता नाही नेता आहे
,आणि येथेच आनंदी आहे अशी सारवासारव करून स्वतःचा बचाव केला. राजकारण आणि चित्रपट यांचे एक वेगळे आणि अतूट नाते आहे.  काही अभिनेते-अभिनेत्री राजकारणातही झळकल्या आहेत.अशीच राजकारणाची ओढ त्या अभिनेत्रीलाही तर लागली नसेल ना ? अशा विविध चर्चा चाकण भागात त्या नंतर झडत होत्या. ....................अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)