...तरच विमानतळाचे टेक ऑफ
-----------------------------------
चाकण विमानतळासाठी अर्थात खेड तालुक्यातील विमानतळासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत .
येथील जागेसाठी हवाई दलाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाचा हिरवा झेंडा अपेक्षित आहे. त्यानंतर
वन खात्याची परवानगी आणि नंतर पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. या साऱ्या बाबींसाठी आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार
आहे.भूसंपादनासाठी कायदेशीर आधार घेण्याची कणखर भूमिका घेण्याचे सुतोवाच शासनाकडून दिले गेले असल्याने ,या दरम्यान शेतकरी आंदोलनाला कशी धार
देतात यावरच खेड तालुक्यातील बहुचर्चित विमानतळाचे टेक ऑफ अवलंबून आहे.
पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावावरील धूळ झटकण्याचा निर्णय एमएडीसी च्या अहवाला नंतर राज्य सरकारने अखेर नुकताच घेतला आहे .यासाठीची जागा
कोठे निश्चित करायची याचा घोळ सुद्धा संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या चाकण भागातील आणि राजगुरुनगरजवळील शिरोली-चांदूस
येथील जागा भूसंपादनाला स्थानिकांचा बागायती शेती मुळे तीव्र विरोध होत होता .तदनंतर आधी ठरविलेल्या चाकण परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे
सरकारने ठरविले होते, मात्र चाकणची जागा हवाई दलाने यपूर्वीच फेटाळली असल्याने खेड तालुक्यातील नवीन जागा यासाठी निश्चीत करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यालगतच्या चाकण जवळील अंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न गाजत आहे. पुण्यापासून जवळ व चाकण, राजगुरुनगर, राजंणगाव एमआयडीच्या
दृष्टीने सोयीसकर म्हणून चाकण येथे विमानतळ करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु
स्थानिक लोकांनी विरोध केल्याने सर्व प्रक्रियापूर्ण झाली असताना येथील विमानतळाचा प्रकल्प गुडाळण्यात आला. त्यानंतर आता खेड तालुक्यातीलच राजगुरुनगर जवळील कोये, धामणे,
पाईट, रौंधळवाडी व आसखेड बुद्रुक या पाच गावांतील सुमारे सव्वा चार हजार एकर जमीन विमानतळासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव देण्याचे गाजर दाखवीत गरज पडल्यास भूसंपादनासाठी कायदेशीर आधार घेण्याची कणखर भूमिका घेण्याचे दडपशाहीचे सुतोवाच
शासनाकडून दिले गेले असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही धार येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकाच तालुक्यात चार जागेवर होते प्रस्ताव ....
चाकण हे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथील धावपट्टी हवाई दलाच्या लोहगाव येथील विमानतळाला समांतर ठेवणे अवघड होते. त्यामुळे
हवाई दलाच्या विमानांचा मार्ग सुरक्षित राहणे शक्य नव्हते. चाकण येथून जवळ असलेल्या भामचंद्र डोंगराचाही उड्डाणासाठी अडथळा होणार असल्याचे मत
हवाई दलाने व्यक्त केले होते. त्यामुळे चाकणपासून आठ किलोमीटरवर शिरोली-चांदूस परिसर नव्याने निवडण्यात आला होता. तेथे विरोध होऊ
लागल्याने उद्योजकांकडून तिसरा प्रस्ताव सरकारला देण्यात आला होता. भारत फोर्जच्या एसईझेडसाठी खेड तालुक्याच्या पूर्वेला भूसंपादन केली जाण्याची जोरदार
हवा येथे निर्माण झाली होती.प्रत्यक्षात मात्र खेड तालुक्यातीलच मात्र नवीनच कोये,धामणे,पाईट, रौंधळवाडी व आसखेड बुद्रुक परिसरातील जागेवर एमएडीसी आणि
शासनाचे एकमत झाले आहे.
अविनाश दुधवडे ,चाकण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा