*खेड तालुक्यातील जमिनीत काळ्या पैशाचे पीक
*विकास प्रकल्पांनी येथील जमिनींवर अनेकांच्या उड्या
*अनेक छोटे मोठे भूमाफिया सक्रीय
*भूमाफियांना गचांड्या देणार कोण?
-----------------------------
खेड तालुक्यातील गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांत तसा तालुक्यातीलच भूमिपुत्रांचा काही वर्षांपूर्वी तसा थेट फारसा संबंध नव्हता; परंतु एमआयडीसी ,सेझ ,प्रस्तावित विमानतळ आणि
शासनाचे विविध विकास प्रकल्प सुरु झाल्यानंतर विनासायास प्रचंड पैसे मिळवून देणाऱ्या ठेकेदारीसह जमिनींना सोन्याचा भाव आल्यानंतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या
लगतच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आश्रयाने उदयास आलेल्या गुंडांनी तालुक्यातील जमीन व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले. या जमिनींच्या भावामुळेच गुंडगिरीचे पीक चाकण सह
या तालुक्यात जोरात फोफावले. त्यातूनच मग एकमेकांचे गळे घोटण्याचे संघर्ष मागील काही कालखंडात सुरू झाले आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीची बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनाने वाढती ख्याती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली जबरदस्त हवा
यामुळे येथील जमिनींचे मोल वाढू लागले. सुरुवातीला चाकण लागतच्या परिसरात जमिनींना चांगला भाव मिळायला सुरवात झाली. नंतर विमानतळाची जागा जशी झुलत राहिली
त्या प्रमाणात संपूर्ण तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात सुरू होण्यास सुरवात झाली. दरम्यानच्या काळात औद्योगिकरणाने चाकण लगतची गावे वाड्या हा परिसर
भरभराटीस आला .
येथील वाहन उद्योगाची तुलना फोक्स वेगन ,मर्सीडीज बेंझ ,महिंद्रा, ह्युंदाई, फोटोन , अशा एक पेक्षा एका वाहन उद्योगातील कंपन्यांच्या आगमनाने थेट अमेरिकेतल्या डेट्रॉईटशी
होऊ लागली आणि चाकण सह खेड तालुका जगाच्या नकाशावर पोचला. त्यामुळे जमिनीचे महत्त्व गुंडांच्या नजरेत भरू लागले. पुण्या मुंबई सारख्या भागात बसून काडी-काडी गोळा
करण्यापेक्षा या भागात स्थानिक गुंडांना राजकारण्यांना हाताशी धरून जमीन व्यवहार करून तेथे खोऱ्याने ओढून मलिदा खाण्यास या प्रवृत्तींनी प्राधान्य दिले. त्यातून तालुक्यातील
विविध गावांत ग्रामपंचायत स्तरीय राजकारणातही अशा प्रवृत्तींचा दबदबा नकळत मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला .
या भागात विविध व्यवसायांच्या व्यवहाराच्या वादातून चाकण आणि राजगुरुनगर भागात खून झाल्याचे सर्वश्रुत आहेच . गुन्हेगारी पार्श्वभूमीची अनेक मंडळी परिसरातून आपली
सूत्रे हलवीत आहेत . ग्रामपंचायत स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये या प्रवृत्ती स्वतः किंवा आपल्या बगल बच्च्यांना अगदी सहजतेने बसवीत आहेत.
मग अनेक तरुणही या भाई मंडळींच्या माध्यमातून गुंडगिरी आणि जमीन व्यवहार करू लागले आहेत . गडबडीचे जमीन व्यवहार, जागा बळकावणे, इतरांच्या जागेत
कायदेशीर अडचण निर्माण करणे आणि त्यासाठी दहशत पसरविणे असा सर्रास 'उद्योग' बेमालूम पणे होत आहे
विविध भागातील गुंडांना जमिनींच्या भावाने चाकण आणि तालुक्यात खेचून घेतले आहे . त्यामुळे या भागाला गुंडगिरीचे ग्रहण लागले आहे . तालुक्यातील अनेक मंडळी या क्षेत्रात
"करिअर' करायच्या उद्देशाने उतरले आहेत. खेड सारख्या शांतताप्रिय तालुक्यासाठी हे घातक ठरणार आहे. गुंडाच्या या सहभागामुळे खेड तालुक्यातील व्यवहार भविष्यात घटण्याची
शक्यता नाकारता येणार नाही.
पूर्वी केवळ शेतीवर अवलंबून असलेला हा तालुका असल्याने येथील अनेक कुटुंबे नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबई येथे असून सुरुवातीला गावात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा
घेऊन जमीन विक्रीचे व्यवहार काही वर्षांपूर्वीपासून सुरू आहेत. जमीन विक्रीच्या व्यवहारात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक सर्रास होत आहे. शेतकरी ,शेतमजूर ,एवढेच काय
शासनाने भूमिहीन म्हणून ज्या गोर गरीब समाजातील बांधवांना जमिनी प्रदान केल्या होत्या त्यांच्या जमिनीही धाकदपटशाने ,कायद्यातील पळवाटा शोधून लाटल्या गेल्या आहेत.
खेड तालुक्यात जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दस्तऐवज करताना बोगस व्यक्ती उभ्या करून व्यवहारही होत आहेत . ज्यांची नावे सातबारा उताऱ्यावर आहेत,
त्या व्यक्ती मृत्यू पावल्या असतील, दुसऱ्या गावी राहात असतील तर त्यांच्या जमिनी परस्पर विकल्या जात आहेत. यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात.
त्यामुळे अशा प्रकरणांची पाळेमुळे खोदणे गरजेचे झाले आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. खेड तालुक्यात डोंगराळ भागात तसेच चाकण, राजगुरुनगर, आळंदी
परिसरात अनेक बोगस व्यवहार झाले आहेत.त्यातील काही उघडकीस आले आहेत तर अनेक व्यवहार उघडकीस आलेले नाहीत . त्यामुळे असे व्यवहार करणाऱ्यांचे चांगलेच
फावले आहे.बडे राजकारणी आणि खुद्द काही मंत्र्यांचे यात लागे बांधे असल्यानेच या बाबी दडपल्या जात आहेत हे ओळखण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही .
मोठे मासे जाळ्या बाहेर:
चाकण परिसरात ठिकठिकाणी भूखंड, जमीन, प्लॉट, फ्लॅट हडप करणाऱ्या टोळ्याच कार्यरत असल्या तरीही अद्याप यातील मोठे मासे गळाला लागलेले नाहीत. त्यामुळे
आता मोठ्या माशांच्या शोधासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे .
चाकण शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. विकास प्रकल्पांचा परिसर , पश्चिम भागात पर्यटनाचा वारसा आणि व्यवसायाच्या निमित्ताने या भागामध्ये देशाच्या
कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोंढ्यांमुळे या भागातील स्थावर मालमत्तेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळेच या परिसरामध्ये भूखंड माफियांच्या अनेक टोळ्या उदयास आलेल्या आहेत.
गोरगरीब, श्रमिक किंवा शहराच्या बाहेर राहणाऱ्यांच्या जागा हेरून त्याची माहिती काढणे, त्यानंतर बनावट कागदपत्रं तयार करून अशा प्रॉपर्टी हडप करण्याचा गोरखधंदा
राजरोसपणे सुरू आहे. बनावट कागदपत्रे तयार करून प्रॉपर्टीवर हक्क सांगायचा. त्यानंतर धमक्या देऊन किंवा थोडेफार पैसे देऊन अशा प्रॉपर्टी धनदांडग्यांना विक्री
करावयाचा धंदा गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांच्या दुर्लक्षामुळे फोफावला होता. जागेचा मूळमालक आणि बनावट कागदपत्रे तयार केलेला बनावट मालक असे दोघेही दाद मागण्यास
आले कि, सिव्हील मॅटरच्या नावाखाली पोलीस यंत्रणा त्याला सरळ न्यायालयाचा रस्ता दाखवत होते. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहत असतात.
सध्या भूखंड माफियांच्या टोळ्यांची एक-एक प्रकरणे चर्चेला येत आहेत.काही प्रमाणात कारवाया होत आहेत. मात्र असे असले तरीही आतापर्यंत मोठे मासे गळाला लागलेले
नाहीत. त्यामुळे येत्या काळात मोठ्या माशांचा शोध घेऊन त्यांना पोलिस कोठडीची हवा दाखवायची असा चंग प्रशासनाला बांधावा लागणार आहे . यापूर्वी एकच प्लॉट दोन
जणांना विक्री करून सामान्य व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या काही महाभागांचाही पर्दाफाश झाला आहे.
त्यांची राजकीय हद्दपारी गरजेची:
जमीन व्यवहारांसाठी राजकीय पक्षाचा शिक्का हा ग्रामीण भागातील या व्यवहारातील गुंडांना महत्त्वाचा वाटतो. कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या आश्रयाशी जाऊन
असे उद्योग करणे सोपे जाते. त्यामुळे राजकीय पक्षाशी नाळ जोडताना त्याचा आथिर्क गुन्ह्यांसाठीही उपयोग करून घेतला जात आहे. 'मनी आणि मसल पॉवर' असल्यास
लवकर 'भरभराट' होते, या समजातून खेड तालुक्यामध्ये गुंडागर्दी वाढू लागली आहे.गुंठेवाल्यांच्या जमिनींना सोन्यापेक्षा जादा भाव आल्याने बहुतांश मंडळी करोडपती
झाली आहेत. एकेकाळी शेती करणाऱ्या हातात नोटांची बंडले पडू लागल्याने अनेकजण वाममार्गाला लागलेच, पण त्याबरोबर गुंडगिरीकडे वळले गेले. महागड्या मोटारी
घेऊन गावात संपत्तीचे प्रदर्शन आणि पाच-पन्नास टाळकी घेऊन 'भाई' होण्याच्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत.
गळ्यातील सोन्यावरूनच ओळख :
गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून मिरवणारे, विविध नेत्यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने लाखो रुपये खर्च करून डिजिटल पोस्टर्स बॅनर्स लावणारे, महागड्या गाड्या
घेऊन फिरणारे, विविध कार्यक्रमांमध्ये भंपकगिरी करणारे अशा व्यवहारांमध्ये सहभागी असल्याची सामन्यांची भावना आहे.
सोनेरी किनार असलेले गॉगल, शॉर्ट शर्ट, गळ्यात चैनी, हातात ब्रेसलेट घातलेल्या या गुंडांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेती भावना आहे.
बडे राजकारणी आणि अधिकारी वर्गात उठबस असल्याने त्यांना 'संरक्षण' मिळते.
अडचण सामान्यांचीच :
औद्योगिकरण होत असलेल्या शहरात घरांचे दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने सामान्यजनांनी गुंठे , दोन गुंठे जमीन घेऊन त्यावर घरे बांधली आहेत. हा तुकडेबंदी कायद्याचा
भंग असल्याचे सांगण्यात येते .विहीर खोदाई व अन्य पळवाटांमार्गे काही मंडळींनी गुंठ्यांची खरेदीखते व त्याची नोंद केली आहे. या जमिनीचा नेमका वापर कशासाठी झाला
हे नोंदणी उपनिबंधक पाहू शकत नाही. अनेक मंडळींनी अशा पद्धतीने गुंठ्यात जमिनी घेऊन त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही नागरिकांनी दहा गुंठ्यांपर्यंतचे क्षेत्र
(जॉइन्ट प्रॉपर्टी) एकत्रित खरेदी केले आहे. त्यावर घरेही बांधली आहेत. अशा घरांनाही तुकडेबंदी कायद्याचा दंडक लागण्याच्या भीतीने अनेकांच्या तोंडचे पाणी पाळले आहे .
त्यामुळे धनाच्या राशी ओतून एकरांनी जमिनी खरेदी करणाऱ्या राजकारणी,बिल्डर ,बाहुबली विकसकांचेच फावत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
--------------- अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा