चाकण मध्ये हैदोस घालणाऱ्या चालकावर गुन्हा
पाच वाहनांचे नुकसान ;आठ जखमी
सहा किरकोळ तर दोन गंभीर --------------------
शनिवारी (दि.1)रात्री साडेनऊ वाजनेचे सुमारास मद्यधुंद अवजड ट्रक चालकाने चाकणच्या आंबेठाण चौक ते तळेगाव चौकादरम्यान हैदोस घालीत पाच वाहनांचे नुकसान करीत
पादचारी व प्रवासी अशा आठ जणांना जखमी केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी ट्रक चालकावर आज (दि.2) बेदरकार वाहन चालवून हैदोस घातल्या प्रकरणी गुन्हा
दाखल केला आहे.
शिवाजी बाबुराव सांगळे (रा.शेडगाव,ता.संगमनेर ,जि.नगर ) असे या बेदरकार ट्रक चालकाचे नाव आहे.प्रसाद व्यंकट सिसला (वय 31,रा.खराडी ता.हवेली
जि.पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. या अपघातात फियास्टा कार मधील प्रसाद व्यंकट सिसला,त्यांची पत्नी विजयालक्ष्मी (वय 28),मुलगी
कार्तिका (वय 2),मित्र रामगोपाल रेड्डी व त्यांची पत्नी मनसा रेड्डी (सर्व रा.खराडी ता.हवेली जि.पुणे),बेदरकार ट्रक चालक शिवाजी सांगळे, एक पादचारी महिला
व तवेरा वाहनातील एक इसम (नावे समजू शकली नाहीत )जखमी झाले आहेत.पादचारी महिला व ट्रक चालकाची प्रकृती गंभीर असून कार मधील सर्वच जन किरकोळ
जखमी झाले असले तरी आश्चर्य कर्क रित्या बचावले आहेत.या कारचा संपूर्ण पणे चुराडा होऊनही कार मधील पुढची आसने व मोटारीचा समोरचा भाग यात असलेल्या
पिशव्या ,फुगे (एअर बॅग )योग्य वेळी बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला .हे सर्व जन ओझर ,माळशेज घाट येथे सह कुटुंब देवदर्शन करण्यासाठी व धबधबे पहाण्यासाठी
गेले होते व पुन्हा घरी परतत असताना हा अपघात झाला. वाहनाचा संपूर्ण चुराडा होऊनही केवळ नशीब बलवत्तर हे सर्वच जन वाचल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शी मध्ये होत होती.
चालक सांगळेयाच्या ट्रकने (क्र.सी जि 15 ए 2863 ) सर्व प्रथम चाकणच्या आंबेठाण चौकात एका मारुती ओमिनी वाहनाला(क्र.एम एच
16 आर 5628) धडकून व पादचारी महिलेला ठोस देवून जखमी केले. आणि पुढे तळेगाव चौकापर्यंत पोहचताना अक्षरश: हैदौस घातला आणि एक बस (क्र.एम एच
12 एच बी 6111) मिनी बस(क्र.एम एच 12 एच बी 1213) ,तवेरा वाहन (क्र.एम एच 12 इ क्यू 384) आणि फोर्ड फियास्टा कार (क्र.एम एच 12
एच एल 4708)यांना धडाधड धडका देत अपघात ग्रस्त केले. फियास्टा कार या वाहनाचा यात अक्षरशः चुराडा झाला.दोन्ही खाजगी बसचा पुढील आणि मागील भागाचा
चक्काचूर झाला तर तवेराचा पाठीमागील भाग आत मध्ये जावून त्यातील एक जन जखमी झाला.सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.बेफाम झालेला हा ट्रक चालकही
अनेक वाहनांना धडका देल्याने ट्रक मध्ये अडकून पडला होता. त्याला पोलिसांनी व नागरिकांनी अक्षरशः ओढून बाहेर काढले, त्याचे दोन्ही पाय निकामी झाले असून
त्याच्यावर चाकण मध्ये उपचार करून अधिक उपचारांसाठी संगमनेरला हलविण्यात आले आहे. या अपघातातून येथील जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश गोरे बालंबाल बचावले.
ते रस्त्याच्या दुसर्या लेन मध्ये होते व त्यांच्या बाजूलाच हा अपघात झाला.गोरे यांनीच या अपघाताची माहिती सर्वप्रथम चाकण पोलिसांना दिली.
दरम्यान आंबेठाण चौकात पादचारी महिला व मारुती वाहनाला अपघात ग्रस्त केल्या नंतर मद्यधुंद अवस्थेतील भेदरलेल्या ट्रक चालकाने वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने
तळेगाव चौकातील सिग्नल जवळ हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा कयास आहे.
या बाबत अधिक तपास चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली के.बी.शिंदे,अमर वंजारी,व त्यांचे सहकारी करीत आहेत.
..................अविनाश ल.दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा