चाकण जवळ दहा लाखांचा गुटखा जप्त
----------------------------
चाकण जवळ चिंबळी फाटा (ता. खेड) येथे एका वेअर हाउस मध्ये तब्बल दीडशे बॉक्स मधील 10 लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा पोलिसांनी आज (दि.7) सायंकाळी साडेसहा
वाजनेचे सुमारास ताब्यात घेतला. गुटखाबंदी जाहीर झाल्यानंतर दोन महिने होत आल्यानंतर गुटख्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध साठा सापडल्याने अद्यापही या प्रकारात
उत्तर पुणे जिल्ह्यात मोठे जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाकण पोलिसांनी आज केलेल्या या धडक कारवाईत हा मोठा साठा मिळून आला आहे. चिंबळी फाटा येथील गणराज वेअर हाउस मध्ये आज (दि.7) सायंकाळी उशिरा पोलिसांनी
मारलेल्या छाप्यात गोवा ,विमल आदी नामांकित कंपन्यांचा दहा लाख रुपयांचा गुटखा दीडशे बॉक्स मध्ये मिळून आला. येथे गुटख्याचा मोठा साठा आहे, अशी माहिती आजच
चाकण पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाचे राजू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना समजल्यावर खेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व चाकण चे पोलीस निरीक्षक
सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांच्या पथकाने हा छापा मारला असता वरील दहा लाखांचा गुटख्याचा साठा मिळून आला. गणेश उद्धव बोराटे (रा. मोशी ता. हवेली) यांस या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे .
------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५४

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा