चाकण नगरपरिषद म्हणजे बडा घर पोकळ वासा ?
चाकणची सध्याची हद्दच कायम ठवल्याने संभ्रम
लगतच्या छोट्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न राहणार अधिक
--------------------
(अविनाश दुधवडे) : चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर करीत या बाबतचा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याने याबाबतच्या हरकती आणि अन्य तांत्रिक बाबी
विचारात घेवून चाकण साठी ग्रामपंचायती एवजी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था लवकरच अस्तीत्वात येणार आहे. मात्र चाकणची सध्याची जी हद्द आहे ती कायम
ठेवून नगरपालिकेची हद्द निश्चित करण्यात आली असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारी व अन्य मोठे महसुली क्षेत्र यातून बाजूला राहणार असल्याने भविष्यात अस्तित्वात
येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिक राहणार आहे .
त्यामुळे नगर परिषद अस्तित्वात येवूनही मोठी विस्तारत्या चाकण मध्ये किमान मुलभूत सुविधांपासून ते मोठी विकासाची कामे कशी मार्गी लागणार याबाबत नागरिकांमध्ये
संभ्रमाचे वातावरण आहे.चाकण नगरपरिषदेसाठी चाकण गावाचे गट क्रमांक 1 ते 2555 मध्ये असलेले संपूर्ण क्षेत्र पूर्व - नदी व कडाची वाडी गावची शिव,
पश्चिम -खराबवाडी गावची शिव उत्तर -वाकी खुर्द गावची शिव ,दक्षिण -मेदनकरवाडी व नाणेकरवाडी गावची शिव ,अशी सध्याची जी हद्द आहे ती कायम
ठेवून नगरपालिकेची हद्द निश्चित करण्यात आली आहे. या हद्दीत कारखानदारी येत नाही त्यामुळे सध्या असलेले सुमारे दीड कोटी रुपयांचेच उत्पन्न कायम राहणार आहे.
फार तर निरनिराळे अधिकीचे कर ,मोठे घर भला मोठा कर या माध्यमातून नागरिकांकडून वसुली होवूनही महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार नाही असा नागरिकांचा
नाराजीचा सूर आहे. शासनाकडून अशा नगरपालिकांना नेमका किती अधिकीचा निधी मिळतो याबाबतही संभ्रमावस्था आहे.
चाकण परिसराचा औद्योगिक विकास झाल्यानंतर चाकण शहर व परिसराचे स्वरूप बदलले. चाकण शहरा लगतच्या नाणेकर वाडी,खराबवाडी ,महाळुंगे.निघोजे,कुरुळी,मेदनकर
वाडी आणि आता नव्याने आंबेठाण लगतच्या परिसरात शासनाची सकारात्मक भूमिका आणि येथे जागेच्या उपलब्धतेने कारखानदारी मोठ्या प्रमाणात स्थापन झाली.
त्यामुळे चाकण परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे, लोकसंखेचे लोंढे चाकण भागात वास्तव्यास आले.त्यामुळे नागरी सुविधा अपुऱ्या पडून अनेक समस्या निर्माण
झाल्या आहेत.वाढत्या लोकसंख्येमुळे चाकण शहराला दिवसेंदिवस पाणी ,कचरा ,सांडपाणी ,अंतर्गत रस्ते, गटार, शौचालय व्यवस्था,अशा एकमेकांत गुंतलेल्या
समस्यांनी सर्वसामान्य नागरिकांना भंडावून सोडले आहे.पाण्याची समस्या अद्यापही संपूर्ण पणे सुटू शकली नाही.सध्या काही प्रभागात पूर्ण क्षमतेने पाणी
मिळते, तर काहींना पाणी मिळत नाही. मिळालेच तर कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे काही प्रभागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाणीप्रश्नावरून
ग्रामसभेत वारंवार महिला संताप व्यक्त करत असतात. औद्योगीकरण झाल्यामुळे चाकण ला लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याने एकमेकांशी संबंधित समस्यांच्या
शृंखलेत शहर पुरते अडकून पडले आहे .वाढत्या औद्योगिकीकरणामुळे चाकणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या दीड लाखावर पोचली आहे.
त्यामुळे येथे रस्ते, वीज, पाणी, अशा अनेक पायाभूत समस्या सातत्याने वाढत आहेत. एकीकडे कारखानदारी थाटायची आणि हजारो कोटी रुपयांचे कर रूपी उत्पन्न
मिळवायचे मात्र सुविधा द्यायच्या नाहीत असे अप्रामाणिक धोरण घ्यायचे यामुळे नागरिकही मेटाकुटीस आले होते .
त्यामुळे गेल्या चार -सहा वर्षांत वेळोवेळी येथील ग्रामसभेत चाकणला नगरपालिका करण्यात यावी, असा ठराव पुन्हा पुन्हा सर्वानुमते ग्रामसभेत मंजूर करण्यात आला
होता. मंत्रालयात मंजुरीसाठी असताना मंत्रालयाला लागलेल्या आगीत खाक झालेला चाकण नगरपरिषदेचा प्रस्ताव जळालेल्या कागद पत्रांचे पुनर्गठन कार्यक्रमांतर्गत मंत्रालयाने
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तां मार्फत मागवून घेतला होता. अन्य बाबींच्या पूर्ततेनंतर पुन्हा मागविण्यात आलेला हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी
मुख्यमंत्र्यांसमोर मागील महिन्यात दाखल करण्यात आला होता . मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता मिळाल्या नंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या बाबतची उद्घोषणा
जाहीर केली आहे. शासकीय स्तरावर कागदोपत्री पाठपुरावा करून शासनाचा पिच्छा पुरविल्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर चाकण, नगर परिषदेच्या प्रस्तावाला राज्याच्या
नगरविकास विभागाने मंजुरी देवून तसा अध्यादेश पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला खरा परंतु नगरपरिषदे साठी सध्या ग्रामपंचायतीची जी हद्द आहे तीच कायम
ठेवण्यात आली असल्याने भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असलेल्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिक राहणार असल्याने
नागरिकांमधून नाराजीचा सूर आळवला जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने इतर कार्यवाही करण्यात येणार असून त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अनेकांनी वाढविलाय जनसंपर्क :
चाकण नगर परिषदेच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी देवून तसा अध्यादेश पुण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी
या ठिकाणी नगर परिषद अस्तित्वात येईल,यामुळे अनेकांनी चक्क आत्ता पासूनच जनसंपर्क वाढविण्यास सुरुवातही केली असून नगरनगरपरिषदेबाबत च्या अधिसूचनेला आक्षेप
घेण्यासाठी ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात जाहीर झाल्या पासून तीस दिवसांच्या आतमध्ये जिल्हाधिकारी ,पुणे यांच्या कडे सादर करण्यासाठी मुदत ,त्यावर निर्णय
प्रशासक कार्यकाळ याबाबत संबंधितांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
---------- Avinash Dudhawade 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा