चाकणच्या पुरातन दत्त मंदिराचा विस्तार
मंदिराचे काम वेगात सुरु
-------------------------------
चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सर्वात जुन्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून मंदिराचा विस्तार करून भाविकांसाठी सुविधा करण्यात येत आहेत.
दत्त जयंती प्रमाणेच धार्मिक सण, उत्सव भक्तीभावाने येथे साजरे करण्याची पन्नास वर्षांची परंपरा आहे .
गेल्या पन्नास वर्षांपासून चाकण पंचक्रोशीतून या मंदिरात येणा-यांची संख्या लक्षणीय आहे. या मंदिराच्या बांधकामालाही सुमारे चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मंदिराचा
विस्तार करण्याचा निर्णय दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आला आहे .मंदिर दुरुस्त करण्याऐवजी नव्याने बांधून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंदिरात दरवर्षी दत्त जयंती आणि अन्य सर्व सण, उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘दत्तमंदिरदेवस्थान ट्रस्ट ’ यांच्यावर आहे.
मंदिरामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी केले जातात. ट्रस्टमार्फत मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यासाठी दुमजली इमारत, तसंच परिसरात
सुशोभित बालोद्यान, वृक्षारोपण, पथदिवे इत्यादी सोयी करण्यात येणार आहेत. भक्तांच्या सहकार्यातून सर्व कामे करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गुलाबराव आगरकर
व सचिव राजेंद्र राऊत यांनी सांगितले . अध्यक्ष आगरकर ,व सचिव राऊत यांच्यासह ट्रस्ट चे पदाधिकारी सदाशिव राऊत,नामदेव धाडगे,शांताराम गायकवाड, देवेंद्र परदेशी ,दत्तात्रय
जगनाडे, सुरेश कांडगे आदी मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.
--------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा