इंडस्ट्रीयल भागात वाढताहेत बेकायदा बांधकामे
पॉवर लेस ग्रामपंचायतीचे कानावर हात
चाकण:
औद्योगिक दृष्ट्या विस्तारत्या वाड्या वस्त्यांच्या परिसरात गेल्या दहाबारा वर्षांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे वाढत आहेत. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रालागत असणाऱ्या
ग्रामपंचायती सारख्या प्रशासनाच्या हातून बांधकामासाठी साठीचे बहुतांश अधिकार काढण्यात आल्याने अशा बांधकामांकडे लक्ष देणे त्यांनीही टाकून दिले आहे. अनियमीतता होत
असल्याचा डंका पीटत ग्रामपंचायतींना याबाबत पॉवर लेस करून काही प्रमाणात असणाऱ्या शिस्तीला बेशिस्त करण्याचं पाताळयंत्री षडयंत्र आहे की काय अशी शंका नागरिकच
उपस्थित करीत आहेत .
बांधकामांसंदर्भात परवानग्यांचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढण्याचा उपद्व्याप प्रशासनाने केले असले तरी बांधकामे मात्र थांबलेली नसून बेसुमार बांधकामे वाढल्याची विपर्यस्त
स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायती या बाबतचे अधिकारच नसल्याचे सांगत अशा बांधकामांकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
चाकण साठी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शिस्तीप्रमाणे नियमाप्रमाणे व कायदेशीर कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे . मोठमोठ्या गृहप्रकल्पांची होत असलेली
बांधकामे ही खऱ्या अर्थाने नगररचनाकाराच्या परवानगीने केली जात आहेत का ? नगररचनाकाराने नकाशा पाहून परवानगी दिली आहे का ? व परवानगीप्रमाणे बांधकामे सुरु आहेत
का ? हे पाहणे चाकण परिसरात महाळुंगे,खराबवाडी ,नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी, या भागात गरजेचे झाले आहे. जर कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे कामे होत नसतील तर ते
रोखण्याचं काम कोणी करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे.
दुर्दैवाने चाकण परिसराचा होत असलेला विकास प्रगती यामुळं प्लॉटच्या किंमती वाढल्या आहेत व वाढलेल्या किंमतीत
बंगले बांधणं हे प्रत्यक्षात परवडणारं नाही, अशा परिस्थितीत इंच इंच जागा लढवण्याचं काम धंदेवाईक पद्धतीने कांही मंडळी करत आहेत. मोठ्या प्रमाणात घरे पाडा आणि फ्लॅट बांधा
असा धडाका सुरु असून बांधकामे करत असतांना व मूळात बांधकामाला परवानगी देत असतांना नगररचनाकारांनी नगराची रचनाचा विचार करुन नियम व कायदे पाहून बांधकामाला
परवानगी द्यायला हवी. ज्यात एफएसआय किती असायला पाहिजे, प्रत्यक्षात मोकळी जागा आहे का ? की फेस टू फेस बांधकाम सुरु आहे. याचाही विचार करायचा का ? हे संबंधित
अधिकाऱ्यांच असतांना मूळात कांही अधिकारी बिल्डर लोकांशी मैत्री करुन चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन अरुंद रस्त्यावर पार्कींग होईल अशा प्रकारचेच बांधकामे करतांना डोळेझाक
करत आहेत. मुळात वरीष्ठ स्तरावरील जे अधिकारी बड्या बिल्डर विकासकांच्या चुकीच्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देतात, त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी अशी
नागरिकांची भावना आहे . पण वरीष्ठ स्तरावरून बांधकाम परवानगी देणारी मंडळी , त्यावर देखरेख करणारी मंडळी , जनहित, लोकहित किंवा स्थानिक हित पाहण्याच्या ऐवजी
'आपण सारे भाऊ ,मिळून सारे खाऊ ' या भूमिकेतून या उद्योग परिसराला बकाल करण्याचं पाप जाणीवपूर्वक करत असल्याची भावना सामन्यांमधून व्यक्त केली जात आहे.
इंडस्ट्रीयल बेल्टच्या भागातील ग्रामपंचायतींना या परवानग्या देण्या घेण्याच्या प्रकारांमधून बाहेर करण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्राच्या हितासाठी नगररचनाकारानी नगराचा
आकार, नगराची रचना व नगराच्या रचनेप्रमाणे दिले जाणारे बांधकाम परवाने पहायला हवेत. जर परवानगी आहे म्हणून कोणी बळाचा वापर करुन, कोणी अर्थपूर्ण व्यवहार करुन
जर मनमानी करणार असतील तर संबंधित प्रशासनाने या भागात फेरफटका मारायला हवा. चुकीच्या गोष्टी रोखायला हव्यात .येथील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत रहदारीला
अडथळा करणारी बड्या बड्या धेंडांच्या कामांची तपासणी करून कामे थांबवायला हवीत. एखादा बेकायदा बांधकामाचा विषय ऐरणीवर आला तरी त्याला राजकीय वादाची
पार्श्वभूमी पहावयास मिळते. चाकण सारख्या भागात लवकरच नगरपालीकेसारखे प्रशासन अस्तित्वात येणार आहे .
त्यामुळे येणाऱ्या काळात सुंदर चाकण , स्वच्छ चाकण , हरित चाकण हे स्वप्न साकार करण्यासाठी रस्त्यावर झाडे लावण्यासाठी जागा राहील. हरीत पट्ट्याचे रक्षण होईल.
त्यासाठी या परिसराच्या रचनेला विचित्र आकार देणाऱ्या बेजबाबदार मोठ्या बाहुबलींच्या विरोधात कडक कार्यवाही अनिवार्य झाली असली तरी ती कुणी करायची हा प्रश्न अनुत्तरीतच
आहे .
गरिबांच्या शेतजमिनींवर धनिकांचे इमले :
गोर गरिबांच्या भूमिहीनांच्या जमिनी साम दाम दंड भेद या मार्गे बळकावून आलिशान बांधकामे या भागात सर्रास सुरू आहेत. गरिबांच्या जमिनी लाटणाऱ्या या गरिबांपेक्षाही गरीब ?
असणाऱ्या मंडळींना राजकारणी आणि प्रशासन अर्थपूर्ण सहकार्य करीत आहे . फसवणुकीतून मिळविलेल्या गोरगरीब आदिवासींच्या अनेक जमिनी प्रशासन वापरून नावावर केल्या जात
आहेत. बळकावलेल्या या जमिनींवर धनदांडगे येथे अनेक भागात "इमले' उभे करीत आहेत.
-------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा