कारखानदारीमुळे टेकड्यांचे अस्तित्वच धोक्‍यात


कारखानदारीमुळे टेकड्यांचे अस्तित्वच धोक्‍यात
चाकण मध्ये टेकड्यांची सफाई मोहीम

-----------------------------------------

औद्योगिक वसाहत असणाऱ्या चाकण लगतच्या भागातील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने टेकड्यांची राजरोस "सफाई' मोहीम सुरू आहे. तीस ते पन्नास
फूट खोलीपर्यंत या टेकड्या खोदून निघणाऱ्या मुरूम, दगडांची विक्रीही होत आहे .आणि डोंगर ,टेकड्या यावरील मोठ मोठे दगड कातळ खिळखिळे करून जमीन
दोस्त करून टेकडय़ा फोडून पाडण्यात येणाऱ्या भूखंडा मुळे टेकड्यांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे.

चाकण च्या पश्चिमेकडे टेकड्या, डोंगर यांच्या रांगा आहेत. येथील टेकड्या आणि डोंगरांना इतिहास आहे.मात्र काही उद्योजक ,विकसक,बिल्डर मंडळींनी
या डोंगरांना साफ करून या भागाच्या सपाटीकरणाचा विडाच उचलला आहे. कारखान्यांच्या लगतच्या भागात असलेल्या टेकड्यांची सध्या जोरात "सफाई'
मोहीम सुरू आहे.या टेकड्या खोदताना जवळपास वीस ते तीस फुटांपर्यंत खोल नेण्यात येत आहेत. त्यामुळे जेसीबी यंत्राद्वारे उकरलेल्या या मुरुमाचा सगळे
नियम धाब्यावर बसवून अन्य बांधकामाच्या भरावासाठी राजरोस उपयोग केला जातो.

कितीतरी टेकड्या आणि लहान मोठ्या डोंगरांचं याभागात पूर्वी पासून अस्तित्व होतं. पावसाळ्यात हिरव्यागार झालेल्या या डोंगरांकडे पाहिलं की लोकांना ग्रामीण
वातावरणाची आठवण व्हायची. कालांतराने अनेक कारखानदारांच्या आगमनाने चाकण सह या लगतच्या गावांची भरमसाठ वाढ झाली. वाढत्या कारखानदारी
पुढे डोंगर खुजे वाटू लागले. वाढत्या कारखानदारीला जागेची कारखान्यांतील कामगारांना घरांची गरज भासू लागली. मोठे प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजक ,विकसक ,
बिल्डरांची नजर वेध घेऊ लागली. त्यांच्या नजरेत डोंगरआणि टेकड्या आल्या , आणि या टेकड्यांना जणू नजरच लागली. तेव्हापासून
टेकड्यांचा अस्त सुरू झाला. कारखानदारीसाठी येथे जागा नाही का, डोंगर न फोडता दुसरा काय पर्याय असू शकेल, डोंगर,टेकड्या नामशेष झाले तर पर्यावरणाचं
काय, कारखाने उभे राहिले, पण ज्यांना गरज आहे अशा भूमिपुत्र वर्गाला खरोखर लाभ झाला का? की, फक्त धनिकांच्या प्रॉपटीर्त आणखी भर पडली,
अशा प्रश्नांची साखळी भूमिपुत्रांच्या मनात सुरु आहे .येथील डोंगरांचे टेकड्यांचे अस्तित्व आणि त्याला जोडून आलेल्या इतर मुद्यांवर गांभीर्याने विचार
करण्याची वेळ आता आली आहे............................अविनाश दुधवडे ,चाकण, ९९२२४५७४७५, ९७६५५६६९०८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)