नगरपालिकेच्या ना हरकतीला जिल्हा परिषदेने घेतली तीन वर्षे
नगरपालिकेच्या ना हरकतीला जिल्हा परिषदेने घेतली तीन वर्षे
चाकण ,राजगुरुनगर नगरपालिका
---------------------------------------
चाकण ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंगळवारी अखेर मंजुरी दिली.यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल
तीन वर्षाहून अधिक कालावधी घेतला .येथील वाढत्या लोकसंखेच्या पार्श्वभूमीवर किमान नागरी सुविधांची वानवा झाल्याचे चित्र येथे निर्माण झाले होते .
चाकण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह येथील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ग्रामविकास मंत्रालय ,जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषद ,
यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
येथील खेड तालुका युवक कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते निलेश कड पाटील यांनी यासाठी युवकांच्या मदतीने चाकण आणि राजगुरुनगर येथे नगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी
गेल्या दोन वर्षां पासून पाठपुरावा केला होता. निलेश कड पाटील यांनी याबाबत सांगितले की,जिल्ह्यातील नवीन नगरपालिकांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य
सरकारकडे पाठविण्यासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची शिफारस असणे गरजेचे असते. खेड पंचायत
समितीच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेने याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे या दोन्ही नगरपालिकांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचा मार्ग मोकळा
झाला आहे.चाकण व राजगुरुनगर या दोन ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव केला होता. या दोन्ही ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर खेड पंचायत समितीने
याबाबतचा ठराव मंजूर केला होता. त्या ठरावानुसार खेडच्या गट विकास अधिकाऱ्यांनी याबाबत शिफारस करण्याची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा परिषद
प्रशासनाकडे पाठविला होता.जिल्हा परिषदेच्या ठरावाची प्रत आता पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे पाठविली जाणार आहे.
या बाबत जिल्हाधीकार्यांना येथील वाढलेल्या लोकसंखेने उदभवलेली स्थिती आणि नगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले
असल्याचे कड पाटील यांनी सांगितले..........................................अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा