इंद्रायणीचा श्वास गुदमरतोय
इंद्रायणीचा श्वास गुदमरतोय
इंद्रायणी पुन्हा जलपर्णीखाली गडप
----------------------
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पुणे नाशिक महामार्गावरून चाकण कडे येताना मोशी जवळ नदीचे सुमारे तीन ते चार किलोमीटरचे पात्र जलपर्णीने व्यापले असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे.
या नदीची हीच स्थिती अन्यत्र इतर भागातही आहे.दाट जलपर्णी मुळे इंद्रायणीचा श्वास गुदमरत असून नदी पात्राला हिरव्यागार मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या जलपर्णी मुळे नदीपात्रालगच्या रहिवाशांना डासांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. . कुदळवाडी, चिखली येथे उद्योगांचे विनाप्रक्रिया केलेले
रसायनमिश्रित पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने तेथील पाणी धोकादायक बनले आहे. प्रदूषणाच्या जोडीने आता मोशीसारख्या भागात नदीकिनाऱ्यावर अतिक्रमण होऊ लागल्याने पात्र
अरुंद होण्यास सुरवात झाली आहे. धार्मिक व विकासात्मक अशा विविध कारणांनी इंद्रायणी मधील प्रदूषणाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. औद्योगिक क्षेत्रातील
सांडपाणी व घरगुती वापरातील सांडपाणी कुठल्याही प्रक्रियेविना सर्रास नद्यांमध्ये मिसळत असल्याने नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणवनस्पती व जलपर्णी
हटविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नदीपात्रातून जलपर्णी काढल्यानंतरही पुन्हा त्यांची वाढ वेगाने होत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणलगत असणाऱ्या मोशीजवळील भागात इंद्रायणी पात्रात पाण्याऐवजी केवळ पाणवनस्पती व जलपर्णीच पाहावयास मिळत आहे.
----------------------------------- अविनाश दुधवडे,९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा