...अन् अपघाताच्या वृत्ताने चाकण परिसर हबकला
...अन् अपघाताच्या वृत्ताने चाकण परिसर हबकला
-----------------------------
इंदोरी (ता.मावळ) येथे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आज(दि.8) पाहटे सव्वा दोन वाजता झालेल्या अपघातात ठार झालेले चार युवक आणि अत्यवस्थ एक युवक असे पाचही
जण चाकण भागातील असल्याने अपघाताचे वृत्त याभागात येऊन थडकताच हा संपूर्ण परिसर हबकून गेला. आणि संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळाच पसरली आहे . यातील ठार झालेले
तीन युवक आणि अत्यवस्थ एक युवक हे चाकण च्या शिवाजी विद्यालयाचे इयत्ता बारावीचे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होते. उद्या त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अखेरचा पेपर होता,
मात्र काळाने त्या पूर्वीच त्यांच्यावर झडप घातली .
अनिल शिवाजी लिंभोरे(वय 18 रा. नाणेकरवाडी ,चाकण,ता.खेड ) सचिन दत्तात्रेय वाहिले (वय 18,रा.वाकी खुर्द ,ता.खेड) अमोल भरत पोकळे (वय 18 सध्या रा. नाणेकरवाडी ,चाकण,
मूळ रा. बीड) अक्षय सुरेश वाहिले (वय 18 ,रा.वाकी खुर्द ,ता.खेड) हे चौघे या दुर्दैवी अपघातात ठार झाले असून अक्षय वाहिले वगळता अन्य तिघे चाकण च्या शिवाजी विद्यालयाचे
इयत्ता बारावीचे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होते. तर गंभीर जखणी असलेला गणेश सतीश नाईकरे (वय 18, सध्या रा. आंबेठाण चौक ,चाकण) ही याच शाळेचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी
आहे.त्याच्यावर पुण्यातील बिर्ला रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अपघाताचे वृत्त समजताच या प्रशालेवर शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी
तत्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली.
हे सर्वजण एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळेच ते बारावीच्या दोन पेपर च्या दरम्यान होळी सणाची सुट्टी असल्याने एकत्र कोकणात होळीचा सन साजरा करण्यासाठी गेले होते .
याबाबत तळेगावदाभाडे (ता.मावळ) पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार मुख्तार शेख यांनी सांगितले कि ,आज (दि.8) पाहटे सव्वा दोन वाजता हे पाच जन कोकणात होळीचा
सन साजरा करून चाकण कडे येत असताना इंदोरी (ता. मावळ) येथे भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळ चाकण तळेगाव रस्त्यावर चाकण कडून कांदा घेऊन वशिला निघालेल्या
ट्रकची (क्रमांक-एम एच 43 इ 7788) आणि या युवकांच्या फोर्ड फियास्टा कारची (क्रमांक- एम एच 14 सी एक्स 485) यांची समोर समोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
या अपघातात कारचा चक्काचूर झाला आणि चौघे जागच्या जागी ठार झाले,तर एक जन गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमी गणेश सतीश नाईकरे यास प्रथम पिंपरीच्या
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात व नंतर तातडीने पुण्यातील बिर्ला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह
तळेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास तळेगाव पोलीस करीत असल्याचेही तळेगावदाभाडे (ता.मावळ) पोलीस
ठाण्याचे ठाणे अंमलदार मुख्तार शेख यांनी सांगितले. हे सर्व विद्यार्थी अभ्यासातही हुशार आणि शांत स्वभावाचे असल्याचे शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य जगदीश जकाते आणि कॉलेज
विभागाचे प्रमुख पी. डी. मावकर यांनी सांगितले.
... त्यांच्या परिवारांनी फोडला हंबरडा ..
अपघाताचे वृत्त समजताच रात्रीच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सकाळी हे अपघाताचे वृत्त वाऱ्या सारखे परिसरात पसरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या विद्यार्थ्याच्या घरा समोर गर्दी केली होती.
अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह तळेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या नंतर मृतदेह संबंधित विद्यार्थ्यांच्या
येथील नाणेकरवाडी ,वाकी खुर्द ,येथील घरी दुपारी येताच नातेवाईक आणि विद्यार्थ्यांना मृतदेह दिसताच एकच गलका होऊन सर्वांनी अक्षरशः हंबरडा फोडला फोडल्याने सर्वच डोळ्यांच्या कडा ओलावल्या .
यातील मयत अमोल पोकळे या मुळचा बीड जिल्ह्यातील असल्याने त्याचा मृतदेह मात्र त्याच्या गावाकडे पाठविण्यात आला आहे।-------------------------------अविनाश दुधवडे, ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा