..म्हणूनच डाऊची भारतातूनही पळण्याची झाली मानसिकता


...म्हणूनच डाऊची भारतातूनही पळण्याची झाली मानसिकता

------------------------

स्थानिकांच्या प्रचंड कडवट विरोधा बरोबरच सुप्रीम कोर्टाने भोपाळ वायू दुर्घटना ही फाईल पुन्हा खोलण्याचा आदेश दिल्यानेच बहुराष्ट्रीय कंपनी डाऊ केमिकलने चाकण एमआयडीसी
तील प्रकल्पासाठी घेतलेली जमीन शासनाला परत करून चक्क भारतातीलही आपला सर्व कारभार गुंडाळण्याची मानसिकता केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णया नंतर डाऊ ने शोध व विकास केंद्रासाठी (आर एन डी ) म्हणून चाकणच्या औद्योगिक क्षेत्रा मधील घेतलेली जमीन परत केली आहे.
त्यांनी या बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) सुरुवातीला एक पत्र पाठविल्याचे सांगितले जात होते .
चाकणमध्ये जागतिक दर्जाच्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील असंख्य कंपन्या आल्या असल्यानेच डाऊ केमिकल येथे शोध व विकास केंद्र स्थापन करणार होती .
असे त्यात नमूद केले होते. स्थानिकांचा कडवा विरोध हे डाऊ च्या चाकण भागातील पलायनाचे कारण असले तरी भारतातून पळ काढण्या मागे सुप्रीम कोर्टाने भोपाळ वायू दुर्घटना
ही केस पुन्हा खोलण्याचा दिलेला आदेश हे डाऊ च्या संपूर्ण भारतातून पोबारा करण्याच्या प्रयत्नांचे कारण असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयातून या बाबत सांगण्यात आले की ,डाऊ ने ती संपूर्ण जमीन परत दिली आहे.सुमारे साडेचार वर्षांपूर्वी 48 कोटी रुपयांना
डाऊ केमिकल्स ने ही मोक्याची जमीन एमआयडीसी कडून मिळविली होती .एमआईडीसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले कि ,
डाऊ केमिकल ने एमआयडीसी ला पत्र पाठविले होते , आणि त्यानुसार डाऊ कंपनीने ही संपूर्ण जमीन परत करण्याचा निर्णय कळविला होता.त्याच आधारे
संबंधित जमीन परत घेऊन डाऊला या जमिनीचे पैसे परत दिले गेले आहेत.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ने 31 ओगस्ट 11 ला सीबीआई च्या विनंती नुसार भोपाळ गैस दुर्घटनेची सुनावणी पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते.
भोपाळ गैस दुर्घटना 23 ओगस्ट 1984 च्या रात्री घडली होती आज वरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक अपघातात यूनियन कार्बाइड च्या प्लांट मध्ये
मिथाइल आइसोसायनेट गैस गळती झाली होती त्या मध्ये 15 हजार लोकांपेक्षा अधिक निरपराध मृत्युच्या दाढेत आले होते , भोपाळ च्या न्यायालयाने या बाबत मागील काही दिवसांपूर्वी
कंपनी चे तत्कालीन चेअरमन केशव महिंद्रा यांच्यासह सात जणांना शिक्षा ठोठावली होती. प्रत्यक्षात सर्वांना तत्काळ जामीनही मिळाले होते. सुप्रीम कोर्टाने 1996
मध्ये सुनावणी दरम्यान या विषयाला सौम्य रूप देत आपराधिक बेजाबदारपणा असे संबोधले होते. त्यामुळे उठलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर
सीबीआई ने सुप्रीम कोर्ट मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती.त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीचे आदेश दिले होते.

असे मानले जाते कि यूनियन कार्बाइड आपल्या अखत्यारीत घेणारी डाऊ केमिकल कंपनीने भोपाळ गैस दुर्घटनेतील बदलत्या घटनाक्रमा मुळे चाकण ची जमीन विकून
केवळ येथूनच नव्हे तर संपूर्ण भारतातूनही पलायनाचा निर्णय पक्का केला आहे, प्रत्यक्षात मात्र स्थानिकांचा पुर्वानुभावरून असलेला भयानक अनुभव आणि स्थानिकांचा कडवा विरोध
हेच प्रमुख कारण पुढे केले जात असले तरी भारतात कुठेही न थांबता त्यांनी केलेली पाळण्याची तयारी हा संपूर्ण प्रश्नच अनेक उत्तरांचा धनी आहे......................................अविनाश दुधवडे , चाकण , ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)