चाकण ला कांद्याची 40 हजार क्विंटल आवक


चाकण ला कांद्याची 40 हजार क्विंटल आवक
*कांद्याला प्रतीक्विंटलला अवघा ४६० रुपयांचा भाव


------------------------------
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये कांद्याची आवक भरपूर होऊन भावात प्रती क्विंटलला अवघी 10 रुपयांची
वाढ झाली , कांद्याची आवक मागील आठवड्या पेक्षाही 2 हजार क्विंटलने वाढली .पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक स्थिर राहूनही भावात मात्र
चांगलीच वाढ झाली.फरशी,पावटा,शेवगा,गाजर या फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही.

बटाट्याच्या आवक काहीशी घटली ,आणि भावात 150 रुपयांची घट झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि पालक यांची आवक चांगलीच वाढली .
कांद्याची एकूण आवक तब्बल 40 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 2 हजार क्विंटल ने वाढली .व कमाल भावात
अवघी 10 रुपयांची वाढ झाली.
कांद्याचे कमालभाव 450 रुपयांवरून 460 रुपयांवर स्थिरावले . बटाट्याची एकूण आवक 1 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक
224 क्विंटलने घटली . व कमाल भावात 150 रुपयांची घट झाली.बटाट्याचे कमाल भाव 850 रुपयांवरून 700 रुपयांवर स्थिरावले . जळगाव
भुईमुग शेंगांची आवक स्थिरच राहिली .या शेंगांची आवक 33 क्विंटल झाली ,व कमाल भावात 1500 रुपयांची घट झाली .
या शेंगांना 4 हजार 500 रुपये कमाल भाव मिळाला. बंदूक भुईमुग शेंगांची आवक 30 क्विंटल झाली , मागील शनिवार पेक्षा ही आवक 8क्विंटल
ने वाढून कमालभावा मध्ये 500 रुपयांची वाढ झाली. या शेंगांचे कमाल भाव 5 हजार रुपयांवरून 5 हजार 500 रुपयांवर स्थिरावले.
लसणाची या आठवड्यात 3 क्विंटल आवक झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटल ने घटली व 400 रुपये भाव मिळाला.
हिरव्या मिरचीची आवक 280 क्विंटल झाली , गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 40 क्विंटल ने घटली.व भावात किरकोळ वाढ झाली,
या मिरचीला 200 ते 250 रुपये इतका कमाल भाव मिळाला.

शेती मालाची एकूण आवक व मिळालेले भाव पुढील प्रमाणे :

कांदा : एकूण आवक 40 हजार क्विंटल झाली , भाव क्रमांक 1 -460 रुपये , भाव क्रमांक 2 - 380 रुपये, भाव क्रमांक 3- 300 रुपये
बटाटा :एकूण आवक 1000 क्विंटल झाली ,भाव क्रमांक 1- 700 रुपये , भाव क्रमांक 2 - 550 रुपये ,भाव क्रमांक 3 - 400 रुपये,

*फळभाज्या :

फळभाज्यांची एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोम्याटो (13 0 पेट्या) 100 ते 120 रुपये , कोबी ( 235 पोती) 60 ते 80 रुपये, फ्लॉवर (190 पोती) 60 ते 80 रुपये,
वांगी (60 पोती) 180 ते 200 रुपये, भेंडी ( 45 पोती )350 ते 400 रुपये, दोडकी( 30 पोती) 280 ते 300 रुपये, कारली
( 50 पोती)260 ते 280 रुपये, दुधी भोपळा (40 पोती ) 100 ते 120 रुपये , काकडी ( 90 पोती) 280 ते 300 रुपये ,
गवार (15 पोती) 450 ते 500 रुपये ,वाटाणा (110 पोती )200 ते 250 रुपये,


*पालेभाज्या :

पालेभाज्यांची आवक जुड्यांमध्ये व प्रतीशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी: एकूण आवक 13हजार 200 जुड्या (100 ते 300 रुपये ),
कोथिंबीर :एकूण आवक 14 हजार 700 जुड्या (100 ते 300 रुपये ),
शेपू : एकूण आवक 9 हजार 300 जुड्या(100 ते 200रुपये
पालक : एकूण आवक 7 हजार 600 जुड्या(100 ते 200 रुपये)


*जनावरे :

चाकण मधील जनावरांच्या बाजारात 22जर्शी गाईं पैकी 10 गाईंची विक्री विक्री होऊन 10 हजार रुपयांपासून 30 हजार
रुपयां पर्यंत भाव मिळाले . 390 बैलांपैकी 165 बैलांची विक्री झाली व 10,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत भाव मिळाले
120 म्हशींपैकी 65 म्हशींची विक्री होऊन 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले ,9 हजार 550 शेळ्या मेंढ्या पैकी
8320 शेळ्या मेंढ्याची विक्री होऊन 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाले. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 50लाख
रुपयांची उलाढाल झाली ;तर चाकण च्या बाजारामध्ये एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची उलाढाल झाली.
------------------------------

*चाकण बाजार विशेष *
*कांद्याच्या आवकेत वाढ;भावात घसरण सुरूच
*कांद्याची आवक 40 हजार क्विंटल
*फळभाज्यांच्या आवक भावात वाढ
*पालेभाज्याची आवक किंचित घटली ; भाव स्थिरच
*शेळ्या मेंढ्यांची संख्या प्रचंड वाढली
*एकुण उलाढाल 3 कोटी 40 लाख रुपये ..
-----------------------------------------------------------------------------

अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)