पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाने वीज वितरणला धक्का
पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाने वीज वितरणला धक्का
तीन तासात उपोषण मागे
*वेगळ्या फिडर वरून आणखी एक वीज जोड देणार
*एक्सप्रेस फिडर साठी वितरण कंपनी करणार प्रयत्न
--------------------------------------------------------------
वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्या मुळे चाकण च्या पाणी पुरवठा योजनेवर परिणाम होऊन विस्कळीत पाणी पुरवठ्याची
समस्या गंभीर झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आज (दि.9) सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा धसका घेतलेल्या वीज वितरणच्या
अधिकाऱ्यांनी चाकण च्या पाणी पुरवठा योजनेला आंबेठाण फिडर वरून आणखी एक वीज जोड देण्याचे आणि एक्सप्रेस फिडरचे कनेक्शन साठी वरिष्ठ कार्यालयात
अहवाल पाठविण्याचे ठोस आश्वासन दिल्याने अवघ्या तीन तासांच्या उपोषणानंतर पुढील आठ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
चाकण ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच साजिद सिकीलकर ,यांच्या सह पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती धनंजय कदम ,सदस्य दतात्रेय जाधव
,सुनील शेवकरी,दतात्रेय फुलवरे,,उमेश आगरकर,जहीर शेख ,माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन साळुंके,आरपीआय चे संतोष जाधव,सतीश आगळे,
नितीन जगताप,नवयुग मंडळाचे राजेंद्र राऊत,आदींसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी आज (दि.9)येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता
यांच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले होते.
खुद्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच उपोषण सरू केल्याने हललेल्या वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी पोहचत पदाधिकाऱ्यांची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला.मात्र सततच्या या समस्येने त्रासलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा अक्षरशः घाम
काढला. वीज वितरणचे अधिकारी ए.जी.पाटील,मंगेश सोनावणे, गारगोटे आदींनी या समस्येबाबत नागरिकाशी चर्चा केली आणि विविध उपाय सुचविण्याचा
प्रयत्न केला .
मात्र याबाबत यशस्वी शिष्टाई करीत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता एच.ए.पिसे यांनी चाकण च्या पाणी पुरवठा योजनेला आंबेठाण फिडर वरून
आणखी एक वीज जोड देण्याचे आणि एक्सप्रेस फिडरचे कनेक्शन साठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्याचे ठोस आश्वासन देत याबाबत कायम स्वरूपी योजना
करण्याचे आश्वासन दिल्याने या बाबत चाकण ग्रामपंचायत आणि वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात रास्ता पेठ येथे बैठकीचे आयोजन केल्याने
पुढील आठ दिवसांपर्यंत हे आंदोलन स्थगित करीत असल्याने सरपंच गोरे व उपसरपंच सिकीलकर यांनी जहीर केले.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाकण करांचा
हा प्रश्न न सोडविल्यास वीज वितरणच्या रास्ता पेठ कार्यालया समोर उपोषण करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
*एक्सप्रेस फिडर कनेक्शन साठी हवेत तीन कोटी :
चाकणच्या पाणी पुरवठा योजनेला अखंडित पाणी पुरवठा करणार का? असा एक मुखी प्रश्न सर्वांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला मात्र तांत्रिक बिघाडामुळे
वीज पुरवठा खंडीत होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.आणि वीज पुरवठा खंडीत होऊच नये यासाठी एक्सप्रेस फिडर चा खर्च सुमारे अडीच ते तीन कोटी
रुपये असल्याचे सांगितले.त्यामुळे सद्यस्थितीत वेगळ्या लाईन वरून आणखी एक वीज जोड या पाणी पुरवठा योजनेला आंबेठाण फिडर वरून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी
सांगितले.व त्यासाठीही सुमारे बारा ते तेरा लाख रुपये ग्रामपंचायतीला मोजावे लागणार आहेत.
अविनाश दुधवडे,९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा