उद्योगनगरी चाकण मध्ये अनेक असुविधा









------------------------------------------

उद्योगनगरी चाकण मध्ये अनेक असुविधा

महाराष्ट्राचा
औद्योगिक विकास करताना चाकण येथे १९८३ साली ग्रामपंचायत पातळीवरील महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत येथे छोट्या स्वरुपात स्थापन
करण्यात आली होती चाकण च्या औद्योगिक विकासाला मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या पाच सात वर्षांमध्ये जागतिक कीर्तीचे वाहन उद्योगाशी संबंधित कारखाने या
भागात आल्यानंतर व चाकण च्या एम आय डी सी तून प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर वाहने उत्पादित होऊ लागल्या नंतर या भागाची तुलना थेट अमेरिकेतील डेट्रॉइट शी
होऊ लागली असली तरी येथे कारखानदारीची मुहूर्त मेढ 1983 सालीच झाली होती.1979 साली असलेले मुख्यमंत्री शरद पवार यांनी शिरूरच्या एका सभेत पुणे जिल्ह्य़ातील
चाकण येथे ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत आणणार अशी घोषणा केली होती .त्या नंतर 1983 साली पश्चिम
महाराष्ट्र विकास महामंडळाच्या (डब्लू एम डी सी) माध्यमातून औद्योगिक वसाहत सुरू करून औद्योगिक वाटचालीस प्रारंभ केला.मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सुसाट वाढलेल्या
कारखान दारीने व त्या पाठोपाठ आलेल्या लोकसंख्येने येथे अनेक असुविधा निर्माण झाल्या असून शासना बरोबरच कारखानदार व त्यांची संघटना असलेली चाकण इंडस्ट्रीज
असोशियन यांनीही चाकण च्या परिसरात सोई सुविधा ठोस स्वरुपात देण्यासाठी काहीच केले नसल्याची सल आता सर्वच जन व्यक्त करीत आहेत .

औद्योगिक विकास झाल्यानंतर चाकण शहर व परिसराचे स्वरूप बदलले. परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे नागरी सुविधा अपुऱ्या पडून अनेक
समस्या निर्माण झाल्या आहेत.वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या गृहप्रकल्पांमुळे चाकण शहराला दिवसेंदिवस पाण्याची समस्या भेडसावत आहे काहींना भरपूर पाणी
मिळते, तर काहींना पाणी मिळत नाही. मिळालेच तर कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे काही प्रभागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाणीप्रश्‍नावरून
ग्रामसभेत वारंवार महिला संताप व्यक्त करत असतात. औद्योगीकरण झाल्यामुळे चाकण ला लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याने एकमेकांशी संबंधित समस्यांच्या
शृंखलेत शहर पुरते अडकून पडले.येथील ग्रामसभेत चाकणला नगरपालिका करण्यात यावी, असा ठराव पुन्हा पुन्हा सर्वानुमते ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे
याबाबत ग्रामपंचायतीने विशेष सभा घ्यावी, असे आदेशपत्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर झालेल्या गामसभेत या विषयावर चर्चा होऊन
ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. औद्योगिकीकरणामुळे चाकणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या दोन लाखावर पोचली आहे.
त्यामुळे येथे रस्ते, वीज, पाणी, अशा अनेक पायाभूत समस्या सातत्याने वाढत आहेत. एकीकडे कारखानदारी थाटायची आणि हजारो कोटी रुपयांचे कर रूपी उत्पन्न
मिळवायचे मात्र सुविधा द्यायच्या नाहीत शिवाय नगर पालिके सारखे शासनाचा मोठा निधी असणारे प्रशासनही येथे राजकीय सोई साठी येऊ द्यायचे नाही ,त्यासाठी
टाळाटाळ करायची असे अप्रामाणिक धोरण घ्यायचे यामुळे नागरिकही मेटाकुटीस आले आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रातिल कारखानदारांच्या चाकण इंडस्ट्रीज असोशियन
(सी आय ए)या संघटनेने कारखानदारांच्या मदतीने शहराच्या समस्या विशेषतः पाणी प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

*अशक्त सी आय ए ने सशक्त होण्याची गरज :
अगदी स्थापने पासून प्रत्यक्ष उद्योजकांचा निर्णय प्रक्रियेत फारसा सहभाग नसल्याने धुसफुस आणि कुरघोडीची सुरू झालेली परंपरा आजतागायत कायम असल्याची
विपर्यस्त स्थिती चाकण औद्योगिक क्षेत्रातिल कारखानदारांच्या चाकण इंडस्ट्रीज असोशियन (सी आय ए)या संघटनेत पहावयास मिळत आहे. कारखानदारांकडून
चाकण शहराच्या व परिसराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका असतानाही संबंधित संघटनेच्या उदासीनतेमुळे शहराच्या व परिसराच्या समस्या विशेषतः पाणी प्रश्न
सोडविण्यासाठी ,विकासासाठी फारशा ठोस उपाय योजना राबल्याच नसल्याची सल नागरिकांप्रमाणेच राजकीय पदाधिकारीही व्यक्त करीत आहेत.
1999 साली चाकण इंडस्ट्रीज असोशियन (सी आय ए) या संघटनेची स्थापना झाली. मात्र या संघटनेत निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष उद्योजकांचा फारसा सहभाग
कधीही राहिला नाही. केवळ खेड चे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुढाकाराने सी आय ए ची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेक वर्षे रेंगाळलेली 'चाकण औद्योगिक वसाहत
व लगतची एकोणीस गावे' ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास ही आली व कार्यान्वित ही झाली.
चाकण इंडस्ट्रीज असोशियन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांची सुमारे 24 कोटी रुपये इतकी या योजनेसाठी मंजूर किंमत आहे. चाकण व लगतची भांबोली,
करंजविहिरे, वराळे, आंबेठाण, शिंदे, सावरदरी, वासुली, महाळुंगे, खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, रासे, भोसे, कडाचीवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कोरेगाव खुर्द
ही 19 गावे या योजनेत समाविष्ट आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील ग्राहक व कारखानदारांना प्रति एक हजार लिटरसाठी या योजनेच्या पाण्याला एकवीस रुपये मोजावे लागणार आहेत तर घरगुती ग्राहकांना प्रति एक
हजार लिटरसाठी आठ रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय ज्या गावांना हा पाण्याचा स्रोत मिळणार आहे, त्यांना जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या यांचा मोठा
भार पाणी हवे असल्यास पदरमोड करून सोसावा लागणार असल्याने या योजनेचा लाभ किती गावांना मिळणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
सध्या या योजनेच्या पाण्याला औद्योगिक क्षेत्रातून 7.09 दशलक्ष लिटर इतकी औद्योगिक क्षेत्रातून तर 6.19 दशलक्ष लिटर घरगुती ग्राहकांकडून मागणी असल्याचे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खर्चाच्या मर्यादेने दोन-दोन निविदा काढाव्या लागल्याने करंजविहिरे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम मागील रेंगाळले
होते , मात्र हे काम आता अंतिम टप्प्यात असून मार्च 2012 पर्यंत हे काम पूर्ण होणार असून संपूर्ण पणे शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकण शहराला या योजनेचा स्रोत गृहीत धरण्यात आला होता. चाकण डब्यू एम डी सी भागातून चाकण ला पाणी घेऊन जावे लागणार असून त्या साठी एमजेपी ने
काढलेल्या अंदाज पत्रकानुसार अंदाजे पंचवीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समजते.त्याच्या दहा टक्के रक्कम चाकण ग्रामपंचायतीला अदा करावी लागणार आहे.
या योजनेतून चाकण करांना दरडोई प्रती दिवशी सत्तर लिटर्स पाणी मिळू शकणार असून त्यासाठी प्रत्येक एक हजार लिटर्स करिता आठ रुपये मोजावे लागणार आहेत.
या योजनेची यशस्विता केवळ कोट्यावधी रुपयांचा निधी उभा राहणार यावर अवलंबून आहे. चाकण ग्रामपंचायतीला ही रक्कम देता येणे शक्य नसल्याने
कारखानदारांनी यासाठी मदतीचे हात पुढे करण्याची मागणी होत आहे.

**ती रक्कमही चाकण च्या पाणीपुरवठ्या साठी वापरावी :
चाकण इंडस्ट्रीज असोशिएशन ने चाकण औद्योगिक क्षेत्रातिल कारखानदारांसाठी पाणी पुरवठा योजना उभी करताना कारखानदारांकडून उभारलेल्या
सुरुवातीच्या निधी (कॅपिटल कॉस्ट) पैकी शिलकीतील कोट्यावधी रुपयांच्या निधीचा सदुपयोग चाकणची पाणी योजना सुरु करण्यासाठी दहा टक्के निधी म्हणून करावा अशी मागणी
नागरिकांसह काही सामाजिक संघटनांकडून होत आहे.
सी आय ए कडून समस्यांचे निराकरण होत नसल्याचा आक्षेप घेत रस्ते,व अन्य समस्यांसाठी नाणेकर वाडी ,कुरुळी भागातील कारखानदार आपले वेगळे अस्तित्व
करून वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.बजाज सारख्या बड्या कंपन्यांनी आपल्या या भागातील पुरवठा दारांसाठी
व्हेंडर असोशिएन सारखी संघटना काढल्याने मूळच्या सी आय ए पासून काही जन फारकत घेत असल्याचीही चर्चा होत असून याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याची
गरज निर्माण झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातिल एकजूट टिकवून परिसराच्या समस्या निराकरणासाठी सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे, जे करून याभागातील
नागरिकांसह याच कारखान्यां मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या कामगारांना सुसह्य जीवन जगता येईल.
------------------- अविनाश दुधवडे,९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)