सत्तेसाठी बहुमत नसताना सौदेबाजी करणे हा लोकशाहीत सरळ-सरळ व्याभिचार
*सत्तेसाठी बहुमत नसताना सौदेबाजी करणे हा लोकशाहीत सरळ-सरळ व्याभिचार
*खेड पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीला साथ दिल्याचा आरोप
*चाकण मधील बैठकीत सेना भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी
---------------------------------
सत्ताधारी म्हणून एक न्याय व सत्ता नाही त्याला दुसरा न्याय. यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून खेड तालुक्यात पोलीस आणि महसूल प्रशासनावरील
सामान्यांचा विश्वास उडून चालला आहे. या निवडणुकीत या प्रशासनाची सत्ताधाऱ्यांना कशी सर्वतोपरी मदत झाली याची इत्यंभूत माहिती शिवसेना भाजपा च्या
कार्यकर्त्यांनी चाकण मध्ये पत्रकार परिषदेत दिली.व पक्षाच्या उमेदवाराविरोधात आर्थिक व्यवहार करून मतदान करणाऱ्या खेड पंचायत समिती सदस्य आणि
भाजपाचे तालुकाध्यक्ष अमृत शेवकरी यांचा निषेध करीत आणि तीव्र संताप व्यक्त करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड ,विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख रामदास धनवटे ,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप
सोमवंशी ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील उबाळे,रामदास जाधव,रामहरी आवटे,व पदाधिकारी उपस्थित होते.या बाबत रामदास धनवटे आणि अशोक
खांडेभराड यांनी सांगितले की,खेड तालुक्यात दबावाचे आणि पैशाचे प्रकार असे सर्रास घडू लागले आहे. यापूर्वी असे घडले आहे,आणि या पुढेही घडणार आहे
भाजपा च्या सदस्याच्या पळवापळवी ने खेड तालुका ढवळून निघाला.लोकांनी चाकण सारख्या भागात सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांना संधी दिली त्यांनी अशी खुले आम स्वतःचीच बोली लावून
सभापती उपसभापती च्या निवडणुकीत मतदान केल्याने लोकशाहीचेच धिंडवडे निघाले आहेत.खुद्द शिवसेनेने त्यांचा चाकण पंचायत
समिती गण हा मतदार संघ भाजपला देऊ केला .त्यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव हे करणी भूत ठरले .त्यांच्याच सुचणे वरून हा मतदार
संघ भाजपला मिळाला. मात्र निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी लालचीने किंवा अप्रत्यक्ष दबावाला बळी पडून भाजपच्या सदस्याने मनमानी पणे घेतलेल्या निर्णयाने
स्वतः खासदार आढळराव ,पदाधिकाऱ्यांसह मतदार आणि कार्यकर्ते असा सर्वांचाच विश्वास घात केला आहे .
मुळात संबंधित भाजपा सदस्य राष्ट्रवादी विरोधातील सदस्यांसमवेत सहलीला असताना अचानक पणे बेपत्ता होऊन पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या गोटात सामील
कसा झाला येथूनच अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांवर सत्ताधार्यांचा दबाव कसा आणि किती असतो हे दर्शविण्यासाठी पुरेसा सूचक आहे असेही
पदाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले . पक्षाच्या वरिष्ठांना याबाबचा अहवाल पाठविण्यात येणार असून अमृत शेवकरी यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी
करण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी यांनी या वेळी सांगितले.
*आठाचा फेरा राष्ट्रवादीने केला पुरा :
खेड तालुक्यात आमदार समर्थक राष्ट्रवादीच्या गटाकडे त्यांच्या विरोधानंतर ही निवडून आलेल्या सदस्यांचीही एकूण संख्या जोडल्यास सात तर विरोधात कॉंग्रेस
सेना-भाजपा आणि अपक्ष असे सात सदस्य निवडून आले होते . आणि तेंव्हापासूनच मॅजिक आठच्या आकडय़ासाठी धावाधाव सुरू झाली होती .
खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही गटांनी आप आपले सात-सात सदस्य जुळून जपून ठेवले.मात्र आमदार मोहिते यांनी मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा
करीत भाजपा सदस्याला आपल्या कडे वळविण्यात यश मिळविले.जेव्हा पराभव होतो,स्पष्ट बहुमत मिळत नाही ,तेव्हा तो लोकशाहीत सर्वसाधारण पणे पराभव
मान्य केला जातो. परंतु आमदार मोहिते यांनी येथे अनेकदा अशा काठावरच्या स्थितीतही सत्ता खेचून आणण्याचे कसब अनेकदा दाखविले आहे .त्यामुळे
भाजपा च्या पंचायत समिती सदस्याला गळाला लावीत राष्ट्रवादीने खेड पंचायत समितीवर रोवलेला झेंडा आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधकांना वाकुल्या
दाखवीत असला तरी सत्तेच्या राजकारणात आमदार मोहिते यांनी सर्वांवरच सपशेल मात केली अशीही चर्चा या भागात सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा