धडाडीचे युवा कार्यकर्ते संदीप सोमवंशी

हाडाचा सच्चा कार्यकर्ता संदीप सोमवंशी
चाकण:
   सर्वसामान्य कष्टकरी शेतकरीशेतमजुर व्यापारी कामगार व युवक हे सार्वजनिक जीवनात केंद्गबिंदु मानून त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांच्या संस्कृतीत्यांची जीवनशैलीत्यांचे प्रश्न दैनंदिन संसारातील अडीअडचणीसुख-दुःखसणवारयात्राउत्सवहरिनाम सप्ताहलग्न व इतर समारंभ या सर्व गोष्टीमध्ये न चुकता व हिरीरीने भाग घेणारे ,राजकारणातील मित्र व जेष्ठ कार्यकर्ते यांचे प्रेम जपण्याचे कामकाम अविरत पणे करणारे भाजपचे धडाडीचे युवा कार्यकर्ते संदीप सोमवंशी यांनी चाकण- नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकी साठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. 
   खेड तालुक्यातील कुठल्याही गावाची यात्रा असोया भागातील गणेशोत्सव असो किंवा विविध गावांचा  गावचा हरिनाम सप्ताह असो संदीप सोमवंशी सर्व मित्रांसह सहभागी होणारच अशी त्यांची येथे ख्याती आहे. सर्वांना आपलेसे करण्याचा सोमवंशी यांचा स्वभाव आहे. हे सर्व करीत असतांना आपण समाजाशी बांधील आहोत व समाजाचे देणे लागतोत्यातुन उतराई होतांना सामन्यासाठी आंदोलने करण्याचा प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचा लोकोपयोगासाठी वापर करण्याचा त्यांचा अभ्यासू स्वभावही सर्वाना माहिती आहे. राजकारणाच्या रोजच्या एवढ्या व्यापातही रक्तदान शिबीरे मोफत सर्वरोग निदान शिबीरे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे  सामाजिक उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवीत आहेत.  सर्व गोष्टीत सामाजिक बांधीलकी ठेवुनसोमवंशी यांनी कधीही राजकारण आणले नाही.  समाजातील विविध  घटकांना त्यांच्या सामाजिक उत्साहात सहभागी होऊन त्यांना आपलेसे करणारा व लोकसंग्रहातुन लोकमान्यता मिळविणारा सर्वसामान्यांचा असामान्य नेता म्हणुन त्यांचेकडे पाहिले जात असून मागील पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या पत्नी क्रांती सोमवंशी यांचा निसटता पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागल्याने या जिल्हा परिषदेच्या या पोट निवडणुकीत त्यांना यश मिळेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. 
-----------------
     अविनाश दुधवडे,चाकण 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)