राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न

राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न
सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
Displaying mantri dilip kamble.jpg
   मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून विशेष  प्रयत्न करण्यात येत आहेत. विकासापासून वंचित असलेल्या  समाजाला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन अधिक स्वाभिमानी व स्वावलंबी बनविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  दिलीप कांबळे यांनी खराबवाडी (ता.खेड) येथे सांगितले.
    भाजपचे शिरूर लोकसभा संघटक संदीप सोमवंशी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री कांबळे यांनी हि माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितले कि,  मागासवर्गीयांना अन्नवस्त्रनिवारारोजगारशिक्षण आदी मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचा आपला प्रयत्न आहे. अनेक जुन्या योजनांमध्ये नावीन्यपूर्ण बदल करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे.  महामंडळाच्या कर्जवाटपात होत असलेल्या वशिलेबाजीला लगाम लावण्यासाठी लावून  खऱ्या पात्र लाभार्थ्यांची गरज भागविली जाणार आहे.   गरीबमागासवर्गीयअपंगदुर्लक्षित समाजबांधवांना अधिक स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी आपली धडपड सुरू असल्याचेही सामाजिक न्यायमंत्री  दिलीप कांबळे  यांनी सांगितले. भाजप महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा क्रांती सोमवंशी यांच्यासह महिलांनी मंत्री कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे शिरूर लोकसभा संघटक संदीप सोमवंशी,   पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरीराजन परदेशीदिलीप वाळके ,संजय घुंडरे ,पांडुरंग ठाकुर ,रामहरी आवटे ,ओबीसी सेलचे रवींद्र धाडगेबाळासाहेब नाणेकरआदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
----------
 अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)