युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद ;पंतप्रधान मोदी

युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद ;पंतप्रधान मोदी
चाकण मध्ये जीईच्या प्रकल्पाचे उद्घाटन

Displaying GE1.jpg
चाकण : 
  भारतातील युवा शक्ती मध्ये प्रचंड कौशल्य असून त्याच्याच आधारे जगातील उद्योगांना भारताकडे आकर्षित करून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद येथील युवा शक्तीत आहे. केंद्र सरकारने मेक इन इंडिया’ अभियानाला विशेष महत्त्व दिले असल्याने भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने जगातील कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी समोर येण्याचे आवाहन करताना  भारतात व्यापार उद्योग करणे अधिकाधिक सोपे करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथे स्पष्ट केले.
  इलेक्ट्रिक उपकरणांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीच्या चाकण मधील प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल विद्यासागर रावमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापटखासदार शिवाजीराव आढळरावजीई कंपनीचे व्हाईस चेअरमन जॉन जी. राईस आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
  पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले किभारत हि एक अशी भूमी आहे कि जेथे उपलब्ध असणाऱ्या  संधीमुळे  जगातील अनेक उद्योग आणखी ताकदीने उभे राहू शकतीलमागील काही वर्षात संपूर्ण जगभरात भारताच्या वेगवान आर्थिक विकासाची चर्चा होत होती. प्रत्यक्षात येथे गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून एकविसावे शतक आशियाई खंडाचे असेल आणि त्यात भारताची भूमिका महत्वाची असेल असे स्पष्ट केले. आर्थिक सुधारणा परदेशी गुंतवणूक जीडीपी वाढ यामुळे भारताची ओळख सर्वात वेगवान अर्थव्यवस्था अशी असून त्यात आणखी वाढ करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
  पुढे बोलताना ते म्हणाले किएखाद्या हिंदी चित्रपटासाठी जेवढा खर्च येतो अवघा तेवढा खर्च करून भारतीय युवकांनी  मंगळयान मोहिमे यशस्वी करीत आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. शासनाच्या स्पष्ट भूमिका तेंव्हा लोक विश्वास ठेवतात. सरकारने मेक इन इंडिया’ अभियानाला विशेष महत्त्व दिले असून निरनिरळे उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या शंभर सव्वाशे परवानग्या घेताना मेटाकुटीस येणारे गुंतवणूक दार यांना सोयीचे व्हावे यासाठी या परवानग्या कमीत कमी करून २० पर्यंत आणण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सरकारनेही अशीच भूमिका घेतल्या बद्दल पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. पर्यटन शिपबिल्डींगडिफेन्सरेल्वे आदी क्षेत्रातही सुधारणा करण्याचा शासनाचा प्रयत्न असून उद्योगांनी या क्षेत्रातही गुंतवणूक करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करताना शेतीसेवा व निर्मिती या तिन्ही क्षेत्रात वाढ करण्याचा मनोदय व्यक्त केला व पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून हेच पुणे आता भारताचे डेट्रॉइट म्हणून उभे राहत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. व जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीच्या येथील गुंतवणुकीसाठी आणि आणखी गुंतवणूक करण्याच्या घोषणेचेही त्यांनी आपल्या सतरा मिनिटांच्या भाषणात जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले कि, ‘महाराष्ट्रात व्यवसाय करणे सुकर’ व्हावे व  औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्य शासन करत आहे. ,पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर आम्ही मेक इन महाराष्ट्र साठी प्रयत्न शील आहोत . येथील उद्योग व्यवसायांना लागणाऱ्या अनेक जाचक अटी आणि परवानग्या कमी करण्यात आल्या असून त्यांची संख्या आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  जीई कंपनीचे व्हाईस चेअरमन जॉन जी. राईस म्हणाले कि भारतात जीई साठी हा गौरवाचा क्षण आहे जीई ने या माध्यमातून नाविन्यपूर्ण पाउल या भागात टाकले आहे. स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेत टिकून राहून भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आणि या भागात आणखी गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी खेडचे आमदार सुरेश गोरेमावळचे आमदार संजय (बाळा) भेगडेचिंचवडचे आमदार लक्ष्मण जगतापशिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे आदींसह विविध उद्योजक उपस्थित होते.
Displaying GE 2.jpg
Displaying CHAKAN PM NARENDR MODI.jpgDisplaying CHAKAN PM.jpg
अनुभवली कडक सुरक्षा यंत्रणा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार  असल्याने पोलीस प्रशासन गेल्या पंधरा  दिवसांपासून कामाला लागले होते. तसेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप एसआयटी पुणे ग्रामीण पोलीस यांच्या  मार्फत सभेच्या ठिकाणी कडक सुरक्षा यंत्रणा होती . मोजक्याच उद्योजक आणि प्रतिनिधीना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले होते. अनेक भाजपच्या बड्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना येथे सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आले. तर अनेकांना जिकीरीचे प्रयत्न करूनही पासेसच मिळाले नाहीत. आज (दि.१४) कंपनीत येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी होत होती. त्यानुळे या भागात प्रथमच कडक सुरक्षा यंत्रणेचा अनुभव सर्वांनाच आला. 
----------------------------------
अविनाश दुधवडे चाकण, ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)